Category Archives: करिअर

सोशल मिडिया: नोकरि कशी शोधायची?

सोशल मिडिया: नोकरि कशी शोधायची?

कॉलेज संपले आता नोकरी शोधली पाहिजे, मला माझ्या नोकरित आता बदल हवाय, मी या नोकरिला वैतागलोय मला नोकरि बदलायची आहे, नोकरि शोधण्याची एक नाहि तर अनेक कारणे. नोकरी आणि तिही योग्य नोकरी शोधणे दिवसन दिवस कठिण होत चाललय, जागा ५ आणि अर्ज ५०० हि सध्याची परिस्थीती. ‘एम्प्ल्यॉयमेंट मार्केट’ हे दिवसागणिक आणखिनच अवघड होत चालले आहे आणि त्या साठीच तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कला या जॉब सर्वांच्या आधि शोधण्या साठी वापराव्या लागणार आहेत. नवीन जागा भरायची आहे तर त्या जागे साठीचा सर्वात पहिला अर्ज हा माझा असला पाहिजे आणि आपण कसे या पदासाठी योग्य आहोत हे संस्थेला सर्वांच्या आधी पटवुन देता आले पाहिजे, आणि इथेच सोशल मेडिया आपल्या मदतीला धावुन येतो.

तर या आहेत काहि सोशल मिडिया टिप्स ज्या तुम्हाला तुमचा नविन आणि ड्रिम जॉब देऊ शकतात.

लिंक्डईन:

लिंक्डईन हि वेबसाईटच मुळी आहे प्रोफेशनल नेटवर्किंग साठी. लिंक्डईन मध्ये आपण आपला प्रोफाईल बनवुन त्या मध्ये आपली व्यवसाया संबधीची माहिती देउ शकता. निट बनवला तर हा प्रोफाईल तुमचा ऑनलाईन बायोडेटाच बनुन जातो. पण बरेच जणे लिंक्डईन चा वापर पुर्ण पणे करत नाहित. लिंक्डईन मध्ये आपला प्रोफाईल हा १००% पुर्ण आहे याची खात्री करा आणि किमान एक तरी ‘रेकमेंडेशन’ आपल्या नावी असु द्या. आपल्या सध्याच्या मित्रांशी आणि सहकार्यांशी लिंक्डईन वर कनेक्टेड रहा.
लिंक्डईन मधे ‘जॉब’ असा एक विभाग आहे, तिथे जाउन तुम्ही तुमच्या स्किलसेट्स ना योग्य होईल अशी नोकरी शोधु शकता. जरी योग्य नोकरी नाहि मिळाली तरी योग्य लोके जरुर मिळतील जे तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत करु शकतील. अशी लोके ओळखा आणि त्यांच्याशी जरुर कनेक्ट व्हा. उदा. एखाद्या संस्थेचा रिक्रुटमेंट हेड अथवा ह्युमन रिसोर्स मधील मंडळी.

ट्विटर:

ट्विटर चा उपयोग हा फक्त काहितरी वाद घालायला किंवा मि सद्ध्या काय करतोय हे सांगण्या पुरता नाहि तर ट्विटर वापरुन तुम्हि तुमची नवीन नोकरि शोधु शकता. ट्विटर वरती अनेक लोकांना फॉलो करण्या आधि आपला स्वतःचा प्रोफाईल निट अपडेट करा. एक योग्य फोटो (अवतार) निवडा आणि मगच लोकांना फॉलो करणे चालु करा. फक्त आपल्या बद्द्लच नव्हे तर आपल्या कार्यक्षेत्रा बद्दल हि ट्विट करत चला. ट्विटर मधे फक्त जॉब नाहि तर व्यक्तिंना शोधा, आजकाल अनेक संस्था आणि रिक्रुटमेंट एजन्सीज ट्विटर वर आहेत. ते नविन जॉब ट्विटर वरती अपडेट करत असतात. यामुळे हा जॉब ट्विट केल्याक्षणिच आपल्याला समजु शकतो. उदा. KPITCummins (@kpitcareers), ADP (@adpcareers).

फेसबुक:

फेसबुकचा तसा थेट नोकरी मिळवण्यात वापर कमी आहे पण फेसबुक मध्ये तुम्हि अनेक लोकांशी अगदी कमी वेळात संपर्क साधु शकता आणि संवाद साधु शकता. त्यामुळे लिंक्डईन आणि ट्विटर मार्फत ज्या व्यक्ती तुम्ही शोधल्या आहेत त्यांच्याशी परिचय वाढवण्या साठी तुम्हि फेसबुक मध्ये त्यांचे मित्र बनु शकता. आणि हो आपला फेसबुक प्रोफाईल अतिशय व्यवस्थितपणे बनवा. तुमच्या आवडीनिवडि, छंद, आवडते खाद्यपदार्थ, पुस्तके, लेखक इत्यादी वयक्तिक स्वरुपाची माहिती ज्या मुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजते, अनेक रिक्रुटर्स एखाद्याला नोकरिवर घेण्या पुर्वी त्याचा फेसबुक प्रोफाईल नक्कि पाहतात. असे होऊ देउ नका कि तुम्ही मुलाखती मध्ये माझा वाचन हा छंद आहे असे सांगाल आणि फेसबुक प्रोफाईल मध्ये वाचन बिलकुल आवडत नाहि असे लिहिलय. तुम्हाला त्वरित खोटारडा ठरवुन बाद केले जाईल. त्या मुळे फेसबुक प्रोफाईल कडेही व्यवस्थित लक्ष असु द्या.

युट्यूब:

सचिन तेंडुलकरची ड्बल सेंचुरी पुन्हा पहायची आहे, पाहिजेल तेंव्हा पाहता येईल. युट्यूब वर अनेक चाहत्यांनी तो विडिओ अपलोड केला आहे ना. पाहिजे तेंव्हा सचिनची सेंचुरी पहा. तसेस पाहिजे तेंव्हा रिक्रुटर्स ना आपली माहिती काहि क्षणात मिळवता आली आणि तिही आपल्याच मुखातुन तर? दर वेळी भेट होईलच असे नाहि या साठी आपला ‘विडिओ रेस्युमे’ बनवुन तो युट्यूब वर अपलोड करुन ठेवा. सध्या विडिओ रेस्युमे चा सर्वात मोठा फायदा म्हणजे अगदि फारच कमी लोकांचा स्वत:चा विडीओ रेस्युमे आहे. अनेकांच्यातुन वेगळे असे काहि आपले असलेले केंव्हाही चांगलेच ना. एक चांगला विडिओ रेस्युमे हा छोटा, आपल्या बद्द्ल माहिती देणारा, आपण संस्थेस कसा फायदा पोहचवुन देऊ शकु हे सांगणारा असावा.

वरिल सोशल मिडीयां सोबतच आपण गुगल अलर्ट्स, फ्रिलांसिंग, ट्विटर सर्च, स्वतःचा ब्लॉग इत्यादि वापरुन हि जॉब शोधु शकता. हे सर्व पर्याय जर एकत्रित पणे व्यवथित नियोजन करुन वापरले तर फक्त आपल्या नजिकच्याच नव्हे तर संपुर्ण जगातील रोजगारसंधी आपणास उपलब्ध होतील, गरज आहे ती फक्त ‘सोशल’ होण्याची.

आशिष कुलकर्णी
लेखकाशी संवाद साधण्या साठी आशिष कुलकर्णी यांचा ट्विटर आय्.डी: http://twitter.com/ashish963

संभाषण”कला”

इंग्लिश बोलत येत नाही म्हणून कट्ट्यावरच्या ग्रुपमध्ये कम्फटेर्बल वाटत नाही किंवा इंटरव्ह्यूला जाताना भीती वाटते… तुमचं असं होतं का? मराठी माध्यमातून शिकलेल्या तुमच्यासारख्या अनेकांना ही समस्या सतावते. अक्षरश: झोप उडवते. इतरांइतकंच हुशार आणि कार्यक्षम असूनही केवळ भाषेमुळे मागे पडण्याची किंवा आत्मविश्वास गमावून बसण्याची वेळ येऊ नये म्हणून थोडेसे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तुमच्या मदतीसाठी बाजारात इंग्लिश स्पीकिंगचं मार्गदर्शन करणारी काही दजेर्दार पुस्तकं आहेत.

** ** **

स्पीक वेल इंग्लिश:

प्रकाशन: नवनित

शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तकं आणि गाइड्स प्रकाशित करणाऱ्या नवनित प्रकाशनाचं हे पुस्तक म्हणजे व्याकरणासहित इंग्रजी शिकण्याचं उत्तम साधन. साध्या-सुटसुटीत वाक्यरचनांपासून पुढे म्हणी-वाक्प्रचार आणि अत्यावश्यक संभाषणांचे नमुने या पुस्तकात वाचता येतील. शिवाय विविध मराठी शब्दांना पर्यायी मराठी शब्दांची सूचीही यात देण्यात आली आहे. त्यामुळे शब्दसंग्रह वाढविण्यासही हे पुस्तक मदत करू शकेल.

किंमत: ११५

**********

रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स

प्रकाशन: पुस्तक महल

इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते तसे नेटके वेळापत्रक आखून भाषाज्ञान वाढविण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. साठ दिवसांच्या या वेळापत्रकात दहा दिवसांची एक अशा सहा मोहिमा आहेत. भाषा अवगत करायचीच असा चंग बांधून मोहिमेवरच निघण्याचं आवाहन हे पुस्तक करते. या पुस्तकाबरोबर एक सीडीही मोफत देण्यात आली आहे. त्यामुळे अचूक उच्चार करण्यासाठीही हे फायदेशीर ठरू शकते.

किंमत: १५०

****** ***

इंग्लिश स्पीकिंग कोर्स

प्रकाशन: विद्याथीर् सेवा प्रकाशन

शाळेत अ,आ,ई… शिकताना जसे चित्रमय तक्ते असायचे अगदी तसेच रंगबिरंगी तक्ते या पुस्तकातही आहेत. अगदी बेसिक्सपासून सुरुवात करून संभाषणकलेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.

किंमत: १५०

******* *******

या व्यतिरिक्तही अनेक लहान-मोठी पुस्तकं बाजारात आहेत. मात्र केवळ पुस्तक वाचून भागणार नाही. त्याने फारतर तुमच्या शब्दसंग्रहात भर पडेल. मात्र, व्याकरणशुद्ध वाक्यरचना शिकयची असेल आणि आत्मविश्वासाने अस्खलित इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी सतत इंग्रजीत बोलणं आवश्यक आहे. कारण ही संभाषणाची कला आहे.

बीपीओ. रोजगाराचा नवा कानमंत्र BPO.

business-process-outsourcing
business-process-outsourcing

माझ्या “गुजरात एक्के “मोदी”. गुजरात दोनी “मोदी“…. ” या लेखाला दिलेल्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद.

आज काल अनेक वॄत्त पत्रांमधुन लेख येतात कि मराठी मुलांनी काय केले पाहिजे आपल्या ’करिअर’ च्या वाटा कश्या निवडाव्यात वगैर वगैर… त्यात आणखिन आशादायक चित्र म्हणजे अगोदर येणार्या सुचना जश्या की
मराठी मुलाने काय करावे…तर आपापले उद्योग चालु करावेत..मराठी मुलाने मेणबत्त्या बनवाव्यात..मराठी मुलाने उदबत्त्या बनवाव्यात..त्या दारोदारी जाउन विकाव्यात कोणतेही काम कमी मानु नये ह्यों करावे अन त्यों करावे..या बंद झालेल्या आहेत. बरं ऊत्सुकते पोटी जाउन जरा माहिती काढावी तर या महाशयांची मुले मात्र आ.टी कंपनीत कामाला. यांना बरे नाही मेणबत्त्या बनवायला बसवले?
पण हां या वॄत्तपत्रां मधुन आज जे काही BPO बद्द्ल लिहलं जातय त्याला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकं आज किमान चर्चा करतायत आपल्या मुलास (लाडाने कार्ट्यास) इथे जॉब मिळु शकतो का या बद्दल चौकश्या होऊ लागल्यात. आम्ही हि एका प्रतिष्टित बीपीओ मध्ये एक वर्ष भर काम केले असल्या मुळे या अश्या चौकश्या आमच्या पाशी तर अनेकदा होतात. पण याचा फ़ायदा माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणास व्हावा म्हणुन आज लेखणि हातात घेतली. (खरं म्हणजे किबोर्ड हातात घेतला).

काय असते हो हे ’बीपीओ’ म्हणजे?सांगतो पण समजावे म्हणुन उदाहारण देऊन सांगतो.
माझी एक मोठी कंपनी आहे, त्यात ५००० कामगार आहेत. मला यांची रोज हजेरी नीट बघुन बरोबर १ तारखेला यांचा पगार द्यायचा असतो. पण हा व्यापच एवढा मोठ्ठा आहे की या पगार व्यवस्थित व्हावा या एका कारणा साठी मला आणखि ५० लोके कामाला ठेवावी लागता भरिस भर म्हणुन जो वेळ मि माझ्या इतर महत्वांच्या कामाला देऊ शकतो तो वेळ या ५० जणांवर खर्च करवा लागतो. काहि समजेना हा वेळ आणि पैसा कसा वाचवावा.
त्याच महिन्यात एक कंपनी मझ्या कडे आली आणि तिने (कंपनीने) मला सांगीतले की हे पगार व्यवस्थापनाचे काम जे तुम्ही तुमचा वेळ व पैसा खर्च करुन करत आहात तेच काम अम्ही तुम्हाला करुन देऊ. आम्ही घेऊ तुमच्या कंपनींच्या एका पुर्ण विभागाची जवाबदारी. तुम्ही काय करायचे तर त्या मोबदल्यात आम्हाला आमची फ़ी द्यायची. कल्पना खुप आवडली.
हिशोब मांडला तर असे लक्षात आले कि यात आपला वेळ हि वाचतोय आणि पैसाही. मग मि काय केले तर मझ्या Payroll Department ची पुर्ण जवाबदारी त्या बाहेरच्या कंपनीस देऊन टाकली. बरं काम अगदी जवाबदारिचे आणि जोखमीचे असल्याने कायदेशीर बाबी हि नीट तपासुन घेतल्या आणि मग मि माझ्या एका डिपार्टमेंट चे काम त्या कंपनीला Outsource केली.
BPO म्हणजे Business Process Outsourcing.
एखादी कंपनी आपल्या एका विभागाचे अथवा जवाबदारिचे काम बाहेर्च्या एका जवाबदार कंपनीस पार पाडायला देते.
बरं या व्यव्हारातुन माझा कसा फ़ायदा झाला बघा………मी जी ५० माणसे कामाला लावली होती ती आता मी Production Supervisor म्हणुन लावली साहजिकच माझे उत्पन्न वाढले. तेहि ५० माणसांना एक्स्ट्रा पगार न देता. वरती माझा पुर्ण वेळ मी मझ्या महत्वांच्या कामांना देऊ शकलो…वेळ हि वाचला पैसा हि वाचला. म्हणुन होते Outsourcing.

हि कामे कोण करतो?
भारतात अनेक बड्या कंपन्या आहेत जी हि कामे करतात. यातील प्रचंड नफ़ा पाहुन इन्फ़ोसिस, विप्रो, सत्यम, आयबिअम अश्या अनेक दिग्गज कंपन्या या क्षेत्रात आल्या आहेत.

फ़ायदा कसा मिळतो?
मुख्यत्वे ज्या कंपन्या आपले काम बाहेरिल कंपनीस देतात त्या असतात बड्या राष्ट्रातील बड्या कंपन्या. ते आपल्याला बिल देतात ते डॉलर मध्ये आणि आपला खर्च होतो रूपया मध्ये..मधल्या मध्ये या कंपन्यांना बरीच रक्क्म फ़ायदा म्हणुन मिळुन जाते.

इथे जॉब कसा मिळेल?
या कंपन्यां मध्ये काम मिळवण्या साठी तुम्हि ग्र्याजुएट (Graduate) असणे आवश्यक आहे. मग तुम्ही कोणत्याही शाखे मधुन असाल. काही ठिकाणी कामाचा अनुभव असतो म्हणुन १२वी पास सुद्धा चालतात. पण हो उगीच मिळतीये नोकरी म्हणुन शिक्षण १२वीत थांबवु नका. Graduate व्हाच.
तुमची इंग्रजी भाषेवरती चांगली पकड असलीच पाहिजे. कारण आपला क्लाएंट हा भारतीय असेलच असे नाही. जर इंग्रजी भाषेवर पकड नसेल तर आधी ती मिळवा व मग इन्टर्व्युह ला निघा. (याला काही अपवाद हि आहेत.)

संगणकाची किमान माहिती असणे ही आवश्यक आहे, काही जास्त नको MS-CIT पुरे आहे. तुम्ही संगणक साक्षर असणे आवश्यक आहे.
कम्युनिकेशन स्किल्स जर मस्त असेल तर मात्र तुमचे काम अर्धे झाले म्हणुन समजा.
व्यवसाय प्रक्रियांचे सखोल अभ्यास. (Process knnowledge ex. Banking, Finance, Insurance, Telecommunications etc.)
एक टीम म्हणुन काम करण्याची तयारि..सांघीक भावना.
आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी.

या काहि किमान स्किल्स तुमच्यात असणे आवश्यक आहेत.

कॉल सेन्टर म्हण्जेच बीपीओ..एक गैरसमज.
कॉल सेन्टर म्हण्जेच बीपीओ हा एक निव्वळ गैरसमज आहे. कॉल सेन्टर हा एक बीपीओ चा एक भाग आहे. पण बीपीओ म्हणजे केवळ कॉल सेन्टर म्हणणे चुकिचे आहे.

नाईट शिफ़्ट्स………..मोठा प्रश्न.
बीपीओ मध्ये आलो म्हणजे आता केवळ नाईट मारायच्या हे काही खरे नाही. शिफ़्ट टाईम ठरतात त्या प्रोसेस कोणती आहे या वरुन. जितके लोक रात्रि काम करतात त्याहुन कितीतरी अधिक जणं दिवसा काम करतात. पण हो आता मराठी तरुणाने हि नाटकं सोडुन कामाला लागावे. मला जमेल की नाही? माझ्या झोपेचे काय? जर इतर लाखो लोकांना जमतय तर तुला का नाही…ते जमणार नाही तुला ते जमवावे लागणारच…………आणि खरे सांगु ते आपोआप जमतं काही करावे लागत नाहि विशेष.

तर मित्रांनो या क्षेत्रात प्रचंड पैसा आहे…जरुरत आहे तर एका जिद्दिची, ताकतीची आणि प्रचंड कष्टाची.
तुम्ही केवळ धाडस जमवुन या क्षेत्रात झेप घ्या यश हे केवळ आणि केवळ आपलेच.

आपले काही आणखी प्रश्न असतील व आपल्याला हा लेख वाचल्यावर काय वाटले हे मला कळवण्या साठी खाली Comments वर क्लिक करा.

आपलाच मित्र,
आशिष कुलकर्णी.