संभाषण”कला”

इंग्लिश बोलत येत नाही म्हणून कट्ट्यावरच्या ग्रुपमध्ये कम्फटेर्बल वाटत नाही किंवा इंटरव्ह्यूला जाताना भीती वाटते… तुमचं असं होतं का? मराठी माध्यमातून शिकलेल्या तुमच्यासारख्या अनेकांना ही समस्या सतावते. अक्षरश: झोप उडवते. इतरांइतकंच हुशार आणि कार्यक्षम असूनही केवळ भाषेमुळे मागे पडण्याची किंवा आत्मविश्वास गमावून बसण्याची वेळ येऊ नये म्हणून थोडेसे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तुमच्या मदतीसाठी बाजारात इंग्लिश स्पीकिंगचं मार्गदर्शन करणारी काही दजेर्दार पुस्तकं आहेत.

** ** **

स्पीक वेल इंग्लिश:

प्रकाशन: नवनित

शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तकं आणि गाइड्स प्रकाशित करणाऱ्या नवनित प्रकाशनाचं हे पुस्तक म्हणजे व्याकरणासहित इंग्रजी शिकण्याचं उत्तम साधन. साध्या-सुटसुटीत वाक्यरचनांपासून पुढे म्हणी-वाक्प्रचार आणि अत्यावश्यक संभाषणांचे नमुने या पुस्तकात वाचता येतील. शिवाय विविध मराठी शब्दांना पर्यायी मराठी शब्दांची सूचीही यात देण्यात आली आहे. त्यामुळे शब्दसंग्रह वाढविण्यासही हे पुस्तक मदत करू शकेल.

किंमत: ११५

**********

रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स

प्रकाशन: पुस्तक महल

इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले जाते तसे नेटके वेळापत्रक आखून भाषाज्ञान वाढविण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. साठ दिवसांच्या या वेळापत्रकात दहा दिवसांची एक अशा सहा मोहिमा आहेत. भाषा अवगत करायचीच असा चंग बांधून मोहिमेवरच निघण्याचं आवाहन हे पुस्तक करते. या पुस्तकाबरोबर एक सीडीही मोफत देण्यात आली आहे. त्यामुळे अचूक उच्चार करण्यासाठीही हे फायदेशीर ठरू शकते.

किंमत: १५०

****** ***

इंग्लिश स्पीकिंग कोर्स

प्रकाशन: विद्याथीर् सेवा प्रकाशन

शाळेत अ,आ,ई… शिकताना जसे चित्रमय तक्ते असायचे अगदी तसेच रंगबिरंगी तक्ते या पुस्तकातही आहेत. अगदी बेसिक्सपासून सुरुवात करून संभाषणकलेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.

किंमत: १५०

******* *******

या व्यतिरिक्तही अनेक लहान-मोठी पुस्तकं बाजारात आहेत. मात्र केवळ पुस्तक वाचून भागणार नाही. त्याने फारतर तुमच्या शब्दसंग्रहात भर पडेल. मात्र, व्याकरणशुद्ध वाक्यरचना शिकयची असेल आणि आत्मविश्वासाने अस्खलित इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर त्यासाठी सतत इंग्रजीत बोलणं आवश्यक आहे. कारण ही संभाषणाची कला आहे.

5 thoughts on “संभाषण”कला””

  1. माझी मुलगी अमेरीकेत असते. मला तीच्याशी ईग्रजी मध्ये पत्रव्यव्हार कराव्याचा आहे त्यासाठी कोणते पुस्तक वापरु जेणे करुन मला व्यव्स्थीत लिहता येइल. sudhirkeskar@gmal.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *