in

सुविचार

सुविचार
– पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
– दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
– त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
– युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
– जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
– जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
– लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
– आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
– सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
– माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
– दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
– आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
– सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
– उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
– जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
– संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
– ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
– शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
– कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
– मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
– अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
– चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
– काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
– कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
– उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
– कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
– पवित्र असावे पण पतित होऊ नये.
– त्याग करावा पण ताठा नसावा.
– स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
– आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
– स्वतंत्र असावे पण स्वै नसावे.
– घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
– माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
– सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर…परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
– मानवी संबंध धावणा-या आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
– श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
– ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.


महिला समिती, ब्राम्हण सभा, डोंबिवली, पूर्व.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उद्धवसाहेब ठाकरेंचे मतदारांना खुले पत्र..

तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?