Category Archives: मनोरंजन

लव्ह लेटर.. असेहि

क्रिकेट वर्ल्डकप चालु आहे, आपण सर्वजण क्रिकेटच्या मैचेस पाहण्यात मग्न आहोत, मैच पाहणे त्यावर चर्चा करणे यातच सगळा वेळ जात असेल ना तुमचा पण? अश्याच परिस्थीत अडकलेल्या एका बॉयफ्रेंन्ड ने आपल्या गर्लफ्रेंन्ड ला सरळ पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नव्हे सरळ सरळ आपल्या गर्लफ्रेंन्ड साठी नोटिसच काढली आहे. चला वाचुया काय म्हणतोय हा बॉयफ्रेंन्ड आपल्या गर्लफ्रेंन्डला..

प्रती माझी प्रिये:
१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.

२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा …नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.

३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.

४) भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.

५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. ‘आज कोणाची मॅचे..?’ असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.

६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.

७) मी मॅच पाहत असताना फोन करुन ‘रोमॅण्टिक’ गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.

८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ‘ ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?’ असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच ‘स्मार्ट’नेस दाखवायचा नाही.

९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे ‘तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?’ असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.

१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि ( थोडावेळच) बोलणे बंधनकारक आहे.

लव्ह यु, तुझाच…

I Love You Dear... But
I Love You Dear... But

लग्न का करावे?

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला.

क्लायंट च्या म्हणण्यानुसार मी काम करत असताना काही कामानिमित्त मला माझ्या सहकारणीचा संगणक सुरु करावा लागला. तिचा संगणक सुरु केल्या केल्या तिचे जीटौकचे ऑटोमेटिक साईन इन झाले. बहुतेक तसं तीन सेट करून ठेवले असावे. बर मी ते जीटौक बंद करणार तेवढ्यात तीच्या मित्राचा ‘हाय’ चा मेसेज आला. मी तीचे जीटौक बंद केले. घरी येताना बस पकडली. येताना बरेच दुचाकीवाले त्याच्या गर्लफ्रेंडला मागे बसवून फिरायला चाललेले. आता तीच्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ती त्या दुचाकीवाल्याची गर्लफ्रेंड आहे अस म्हटलं आहे. खर तर हे पुण्यात काही नवीन नाही. आणि मी कधीही न पहिली अशीही गोष्ट नाही. पण तरी देखील अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. खर तर येताना मी विचार करत होतो की माझ्या सहकाराणीचा पीसी सुरु आणि तीच्या मित्राचा ‘हाय’, ही काही नवीन गोष्ट नाही. परवा तिचा आणखीन एक मित्र तिला आपण रविवारी दुपारी तीन वाजता भेटायचे का म्हणून चाट वर विचारात होता. बर तो काही तिचा ‘बॉयफ्रेंड ‘ वगैरे नाही. खर तर तिचा बॉयफ्रेंड मुंबईचा पण हिला पुण्यात फिरवणारे काही कमी नाही. तसं म्हणायचं झाल तर त्यांनी हिला फिरावाण्यापेक्षा हीच त्यांना फिरवते अशी शंका येते.

आमच्या शेजारी तर काही विचारू नका. दोघा नवरा बायकोची खूप भांडण होतात. पण जय शेजारच्या बायकोचाच होतो. मी अनेक जण बघितली आहेत. पण लग्न करून सुखी अस कोणीच नाही. माझा बॉस नेहमी कंपनीतून निघताना त्याच्या बायकोचा फोन येतो. की ताबडतोप या म्हणून. आज सुद्धा क्लायंट मध्ये एक लेडीज होती. ती काही म्हणाली की तिचा कलीग ताबडतोप ‘राईट’ म्हणायचा. माझा एक मित्र आहे त्याचे लग्न होऊन साधारणत एक वर्ष झाल असेल त्याला एकदा मी विचारलं होत की ‘कस वाटत लग्न आधी आणि आता?’ त्यावेळी तो म्हणाला होता ‘आपल्याला वाटत की खूप मजा असते म्हणून पण खर तर खूप जबाबदारी असते. एका जीवाचा सांभाळ आणि संरक्षण’. त्याच्याशी चर्चा केल्यावर तो पहिल्यापेक्षा अधिक चिंतेत वाटला होता. माझ्या काका काकूला बघून, मित्र आणि त्याच्या बायकोला बघून, मावशी आणि तिचे मिस्टर बघून, माझ्या बॉस ला बघून अस वाटल नाही की लग्न करून कोणी सुखी झाल आहे. उलट अनेक बंधन आली अस वाटल. बॉसला कंपनीतून निघताना बायकोला मी कंपनीतून निघून घरी येतो आहे अस सांगावं लागत. सहकार्णीच काही विचारू नका. तिचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो. पण मी अस कधी बघितलं नाही की ने स्वताच्या मोबाईल वरून त्याला फोन केला. जाऊ द्या हा विषय वेगळा आहे. तात्पर्य फ़क़्त एकाच लग्न करून मला तरी काही आपण सुखी आनंदी राहू अस वाटत नाही.

म्हणजे विकेंड असला की तीच्या इच्छे खातर कधी मॉल मध्ये जाऊन हजार- दोन हजाराचा चुराडा करायचा. बर ती घेणार काय तर चप्पल किंवा ड्रेस. आणि तो देखील फार फार तर सहा महिने वापरणार. तिथून मग तिची इच्छा हॉटेलमध्ये जेवण करण्याची. झाल ते होऊन देखील कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी जगतो हेच कळत नाही. कंपनीतील नोकरी झाली की बायकोची चाकरी. आता मला याचा काही अनुभव नाही पण मी ज्या ज्या जणांचे लग्न झालेले आहे त्यांना बघून तरी लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?

लेखक: हेमंत आठल्ये

कोणासारखे काय करावं . . ?

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)

जुने दिवस, जुन्या जाहिराती

निरमा वॉशिंग पावडर
निरमा वॉशिंग पावडर

नमस्कार,

आज फेसबूक वरती माझ्या मित्राने माझ्या सोबत एक विडीओ शेअर केला, वॉशिंग पावडर निरमा ची जाहिरात एक मुलगा गिटार वर वाजवत होता. मस्त जाहिरात आहे ना निरमाची? अजुन जशीच्या तशी आठवते, अगदी तोंडपाठ आहे. खुप छान वाटले ती निरमाची ट्युन एकुन. त्या नंतर मला त्या सगळ्या जाहिराती पहायच्या होत्या ज्या मी लहानपणी दुरदर्शन वर पाहत होतो. खाली काहि आपल्या लाडक्या जाहिराती आहेत, तुम्ही पण पहा.

निरमा:
वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दुध सी सफेदी निरमा से आयी…

 

वीको टरमरीकः
देखो कूंदननसी चमके हमारी प्यारी बन्नो, हल्दी और चंदन

लुना:
चल मेरी लुना

सर्फः
ललीताजी

हमारा बजाजः
बुलंद भारत कि बुलंद तस्वीर… हमारा बजाज

धारा:
धारा धारा शुद्ध धारा…. जलेबी?

रसना:
आय लव यु रसना, हि अंकिता तर सगळ्यांच्या घरा घरात पोहचली होती.

फेविकॉलः
येह फेविकॉल का जोड है, तुटेगा नहि.

नेसकेफे:
टेस्ट टु गेट यु स्टार्टेड..

गोल्ड्-स्पॉटः
द झिंग थिंग, हे गोल्ड्-स्पॉट पिलेले मला तर काहि आठवत नाहि, पण या गोल्ड्-स्पॉट च्या बाटल्या पाहिलेले आठवतय.

तुम्हाला कश्या वाटल्या या जाहिराती? तुमच्याहि आवडिच्या काहि जाहिराती असतीलच, त्या कोणत्या आहेत, या जाहिरातींशी काहि आठवणी जोडलेल्या आहेत का आपल्या, काहि जुन्या आठवणी? कळुदे आम्हा सर्वांना.

आशिष कुलकर्णी,
महाराष्ट्र माझा

लिझ्झी…

लिझ्झीची अन माझी ओळख साधारण आठवड्यापुरती मर्यादित होती. खरं सांगायचं तर सुरवाती-सुरवातीला मला तिचं फारसं कौतुक देखील नव्हतं. पण जसजसे मी तिच्या सहवासात दिवस घालवायला लागलो, तसतशी ती मला हळूहळू आवडूं लागली. आणि तसं पाहिलं तर हे साहजिकच होतं.  आपल्या जवळचीं माणसं, आपले नातेवाईक व मित्रमंडळी, आपल्यापासून दूर असली की आपण कुणावर प्रेम करणं किंवा कुणी आपल्यावर प्रेम करणं या गोष्टीचा एक वेगळाच नशा चढायला लागतो. तुम्हां सर्वांबद्दल मी  खात्रीदायक सांगूं शकत नाहीं, पण माझ्या बाबतीत हे खरं ठरलं होतं.
ही गोष्ट साठीच्या सुरवातीची आहे … म्हणजे माझ्या साठीतील नाही, पण १९६०च्या सुरवातीची आहे. मी आर्मीत (Army Service Corps) भरती होऊन आठ महिन्यांचा अवधी लोटला होता. १९६२ मध्यें मी सैन्यात भरती झाल्यापासून घरच्या लोकांपासून दूर रहाण्याचं सुरू झालेलं सत्र केव्हां संपेल हे माझं मलाच माहीत नव्हतं. याआधी मी घराचं सुरक्षाचक्र  सोडून कधीच दूर गेलेलो नव्हतो. फारफार तर दोनचार दिवसांकरितां गेलेलो असेन, पण एवढ्या दीर्घ अवधीकरितां कधीच नाहीं. सगळ्यांकडेच मिळूनमिसळून न रहायच्या सवयीमुळे जवळचे असे मित्र सुद्धां नव्हते. मी नेहमींच माझ्या घराच्या व घरवाल्यांच्या मर्यादित चौकटीत वावरत असायचो. पण —
पण नोव्हेंबर १९६२च्या त्या एका सकाळी कुणालाहि न सांगतां मी आर्मीत भरती झालो व माझ्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरवात झाली. (आतां मी आर्मीत मुळी भरतीच का झालो ही एक वेगळीच कथा आहे !) आणि अगदी पहिल्यांदाच — आणि हे सर्व किती दिवस, महीने किंवा वर्षं चालणार होतं याची मला निदान त्यावेळी तरी किंचितसुद्धां कल्पना नव्हती — मला सर्वांपासून दूर रहावं लागणार होतं. पण या गोष्टीला मी काही एकटाच अपवाद नव्हतों. जसं इतर लोकांच्या बाबतीत घडतं तसं मला सुद्धां असं एकटं रहाण्याची सवय लागत गेली. अर्थातच बर्याच वेळां मला भयंकर एकटं आणि एकाकी वाटायचं.
मी इतर लोकांमध्ये फारसा कधीच मिसळत नव्हतों, पण आसपासच्या छोट्या मित्रमंडळीकडे माझं सूत मस्त जमत गेलं. सुरवातीच्या बेँगलोरमधील (सध्या बंगलुरू असावं बहुतेक!) ट्रेनींगनंतर माझी बदली पुण्याला झाली. मी मनातल्या मनात विचार केला, चला, निदान पुणे बॉंबे (आताचं मुंबई) पासून बरंच जवळ होतं. दुदैर्वाने पुण्यात देखील माझ्या खास ओळखी नव्हत्या. मात्र, लवकरच माझी ओळख कुलकर्णी परिवाराकडे झाली. कुलकर्णी सर आर्मीत (Army Ordinance Corps) मेजरच्या पदवीवर होते. मेजर कुलकर्णी आमच्या सारस्वत समाजातील होते व त्यांनी मला लगेच जवळ करून घेतलं. अर्थांतच माझी जवळीक त्यांच्या मुलांकडे, मुलगा विवेक व मुलगी स्मिता, अधिक होती. मेजर कुलकर्णी दीर्घ काळाकरिता उत्तर भारतात, बर्याच वेळी महिन्याहून जास्त दिवस, बदलीवर असत, त्यामुळे त्यांची व माझी भेट कमीच व्हायची. मी माझा बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायचो. आणि अशाच एका प्रसंगी मी लिझ्झीला पाहिलं. काही दिवसांनी तिच्या विषयी माझ्या मनात एक विचित्र आकर्षण निर्माण झालं. मित्रांनो, हें प्रथमदर्शनी प्रेम होतं अशांतील प्रकार मात्र नव्हता. मी आधीच सांगितल्याप्रमाणॆ जसजसा मी लिझ्झीच्या सहवासात रहात गेलो, तसतसं या आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होत गेलं. कुलकर्णी परिवारात लिझ्झीचा जन्म झालेला नसला तरी त्या सर्वांनी तिला आपल्या परिवारापैकीच एक म्हणून वाढवलं होतं — अगदी ती जन्माला आल्यापासून.
अगदी पहिल्यांदाच मी लिझ्झीच्या घरीं, म्हणजे मेजर कुलकर्णींच्या घरीं गेलो, तेव्हां मी सैन्याचा हिरवा गणवेष परिधान केलेला होता. लिझ्झीने माझा तो ओळखीचा वाटणारा गणवेष पाहिला व ती माझ्याकडे धावत आली. लिझ्झीचं हे विचित्र वागणं विजय व स्मिताला फारसं आवडलेलं दिसलं नाहीं, कारण ती दोघं नेहमी तिच्याचकडे खेळायचीं, आणि त्यांना वाटायचं की लिझ्झीनं फक्त त्यांच्याशीच खेळावं.  पण खरं सांगायचं तर मी त्या क्षणीच लिझ्झीच्या प्रेमात पडलो. मी तिला माझ्या मांडीवर बसवून घेतलं व तिचे लाड करायला लागलो. ती सुद्धां भलतीच खुश झाली व तिने मला अंगभर चाटायला सुरवात केली.
माझ्यावर प्रेम करणारे सगेसोयरे माझ्यापासून दूर असल्याने मला लिझ्झीचे ते चाटणं खूपच रोमांचकारी वाटलं. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हांला? अशा वेळीं एका कुत्र्याचं (लिझ्झीच्या संदर्भात कुत्रीचं) चाटणं रोमांचक वाटणं अगदी साहजिकच होतं. हो मित्रांनो, लिझ्झी कुलकर्णी परिवारातील एक पाळीव कुत्री होती. पण थांबा, हा आमच्या प्रेमकहाणीचा अंत नव्हता. ही सुरवातच होती म्हणा ना. लवकरच मीसुद्धां त्या परिवाराचा एक अविभाज्य हिस्सा बनलॊ, आणि बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायला लागलो. कधीकधी मी रात्री तिथेच झोपायचो आणि सकाळ झाली की लवकर उठून परत बॅरेक्सवर निघून यायचो. वेळेवर  ड्यूटीवर हज़र रहाण्याची खबरदारी घेतली तर एवढं स्वातंत्र्य मला माझ्या वरिष्टांकडून मिळायचं कारण ऑफिसमधे सर्वांनाच माहीत होतं की मी मेजर कुलकर्णींच्या परिवारापैकीच एक होतो.
एका सकाळी तिथं रात्र घालवल्यानंतर नेहमींप्रमाणे मी सकाळी ड्यूटीवर यायला निघालो. चालतांना मला सारखं जाणवत राहिलं की कुणीतरी चपळाईनं माझा पाठलाग करीत होतं. जेव्हां मी अचानक पाठी वळायचो, तेव्हां तो “कुणीतरी” पटकन लपायचा. हा लपंडाव बराच वेळ चालू राहिला. एव्हांपर्यंत त्यांच्या घरापासून बरंच अंतर पार करून मी माझ्या बॅरेक्सच्या जवळ येऊन पोचलॊ होतों. आतां माझ्या लक्षांत आलं होतं की माझा पाठलाग करणारा तो कुणीतरी दुसरातिसरा नसून माझी ’मैत्रीण’ लिझ्झीच होती. माझ्या हे लक्षांत येईपर्यंत एव्हांना खूप उशीर झाला होता आणि मागे वळून तिला परत घरी घेऊन जाणं मला मुळींच परवडलं नसतं. लिझ्झी इतकी चाणाक्ष होती की तिच्या मागावर मला वळलेलं पहातांच ती कुठंतरी लपली असती.
मी तिला माझ्यामागून बॅरेक्सपर्यंत येऊं दिलं. एका कुत्र्याला, सॉरी, कुत्रीला,  बॅरेक्सवर ठेवणं आर्मीच्या कायद्याविरुद्ध व शिस्तीविरुद्ध ठरलं असतं, पण माझा अगदीच नाईलाज होता. मी दुसरं कांहीसुद्धां करणं म्हणजे लिझ्झीला गमावण्यासारखं होतं. माझ्या इतर सहकार्यांनी लिझ्झीला खायला घालण्यात व तिच्यासाठी उबदार पलंग तयार करण्यात मला बरीच मदत केली. लिझ्झीच्या गायब होण्याने कुलकर्णींच्या घरी जो कांही गोंधळ माजला असेल त्याची मला संपूर्ण कल्पना नसली तरी एवढं नक्कीच माहीत होतं की लिझ्झीच्या गायब होण्याने सर्वजण काळजीत असतील.
दुसर्या दिवशी भल्या पहाटेच बॅरेक्समधून मी लिझ्झीला घेऊन तिला तिच्या हक्काच्या घरी सोडायला निघालो. आदल्या रात्रीं तिनं केवढी भयंकर भानगड करून ठेवली होती याची थॊडीशी कल्पना एव्हांना लिझ्झीला देखील आली असावी. त्यांच्या घराजवळ पोचतांक्षणींच लिझ्झीनं जोरजोरांत भुंकायला सुरवात केली. तिचं भुंकणं ऐकून विजय व स्मिता बाहेर धावत आले आणि त्यांना पाहता क्षणीच लिझ्झीनं त्यांच्या अंगावर उडी मारून त्यांना प्रेमानं चाटायला सुरवात केली. विजय आणि स्मिताचे डोळे खुशीच्या आसवांनी भरलेले होते. सौ. कुलकर्णी म्हणाल्या की आदल्या रात्री त्यांच्यापैकी कुणाचाहि डोळा लागला नव्हता. बहुतेक त्यांना अंधुकशी कल्पना आली होती, माझा गणवेष पाहून लिझ्झीला वाटलं असावं की ती आपल्या मालकाचाच पाठलाग करीत असावी. पण जेव्हां लिझ्झीला आपली चूक कळाली तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. असो, म्हटलंच आहे ना, “ज्याचा शेवट गोड असतो …
या प्रसंगाला बरीच वर्षं लोटली आहेत. विजय व स्मिताची लग्नं झाली असतील. त्यांची मुलंसुद्धां आतां मोठी झाली असतील. मी आर्मी सोडून बरीच वर्षं झालीयत व शक्य आहे कुलकर्णी परिवार मला विसरला देखील असेल. त्यांच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल-नसेल, मला माहीत नाहीं. पाळीव प्राणी माणसाचा मानसिक त्राण कमी करायला उपयुक्त ठरतात असं मानसशास्त्रांत मानलं जातं. पण माझ्या बाबतीत याचं प्रात्यक्षिक मला दिलं होतं लिझ्झीनं !

लक्ष्मीनारायण हटंगडी
(suneelhattangadi@gmail.com)