उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा .. प्रमुख मुद्दे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचार सभा जाणुन घ्या सर्व प्रमुख मुद्दे. आज शिवसेने मुंबई येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.

 • पंकजा राजकारण बाजुला ठेव, कधीहि हाक मार, तुझा भाऊ तुझ्या पाठिशी राहिल.
 • शिवसेना पंकजा मुंडेंशी लढणार नाहि.
 • निजाम शहा होता, कुतुब शहा होता.. अफझल खान आला होता आदिल शहा चा विडा घेऊन
 • उम्मेदवारि कुणाला द्यायची कुणाला नाहि? कोण नाराज होते कोंण अपक्ष म्हणुन लढतो
 • उद्धव ठाकरे मुळे युती तुटली नाहि… मी १८ जागा सोडल्या.
 • अपक्षांना अव्हान.. अपक्ष म्हणुन लढु नका.. शिवसेना संपवायला निघालेल्यांना मदत करु नका
 • तुम्हि युती नाहि तर हिन्दुत्वाशी नाते तोडले
 • मोदींशी माझे भांडण नाहिये..
 • शिवसेनेच्या जागा कमी करायच्या व पडक्या जागा शिवसेनेला द्यायच्या…
 • जागा का वाढवुन मागत होता? मुख्यमंत्री पदा साठिच ना?
 • शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवतोच.. दाखवणारच
 • पॄथ्वीराज चव्हाण यांच्यावर चढवला हमला
 • गायरानाची जमीन हि शरद पवारांनी हडप केली
 • सगळी कडे फक्त अत्त्याचार, आश्रम शाळेत मुलीवर अत्याचार
 • मेळघाटामध्ये १२९ मुलांचा कुपोषणाने मॄत्यु
 • चहा वाला सुद्धा नशीब असेल तर प्रधानमंत्री होऊ शकतो ना?
 • पुर्वजांची पुण्याई महारष्ट्राच्या भल्या साठी वापरणार
 • रेसकोर्स हि ओळख फक्त २० दिवसांसाठि, मि इथे उद्यान बनवणार आहे
 • पोलिस करणार तरि काय? सोयी शुन्य, मी पोलिसांना घरे देणार.
 • जागाच पाहिजे ना? पहिला पाकिस्तान ने व्यापलेली, चीन ने व्यापलेली भारताची जागा पहिला आणा
 • कर्नाटकने गिळलेली महाराष्ट्राची जागा आणा.. शिवसेना सर्वच्या सर्व जागा तुम्हाला देऊन टाकेल
 • शिवसेना हि दिल्या वचनाला जागणारी आहे.
 • अनुभव आहे पण ईच्छा नाहि, काय उपयोग?
 •   युती तोडण्याचे यांनी ठरवलेच होते. बाहेरची माणसे शिवसेनेच्या जागेवर घेतली. भुसावळ, गंगापुर, कवठेमहांकाळ
 • गोध्रा आणि अहमदाबाद पेटले होते, मोदी हटाव ची मागणी झाली तेंव्हा शिवसेनाप्रमुखांनी मोदींना पाठिंबा दिला
 •  नर्मदा आंदोलनासाठी मोदी उपोषणाला बसले तेंव्हा बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला होता, उद्धव ठाकरेंना पाठवले होते गुजरातेत
 • तुम्ही तयार् आहात का? शिवसैनिकांचा प्रचंड जयघोषात होकार
 • रामदास आठवलेंना जाहिर आव्हान, परत या
 • सत्तेत आल्यास रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्री पद देणार
 • भाजपने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार व गुजरात मध्ये सपाटुन मार खाला. भ्रमात राहु नका
 • महाराष्ट्रातील शेतकर्यांचे कर्ज माफ करा.. कर्ज मुक्त करा
 • बाळासाहेबांनी दिलेली शपथ घेऊन मैदानात उतरलो आहे. सोबत कोण विरोधात कोण हे सगळे स्पष्ट होणार आहे
 • आजपासुन प्रत्येक क्षण जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होत नाहि तो पर्यंत स्वस्थ बसणार नाहि
 • मुंबईचे डबेवाले.. शिवसेने सोबत
 • निष्ठावंतांचा मान सत्ता आल्यानंतर नाकि ठेवणार
 • अनेक मुस्लीम बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

 

Uddhav Thackeray

हाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…

स्थळः बारामती
वेळः अभद्र

सहायकः साहेब ‘मॅडम’ ना फोन लागला, मॅडम इज ऑन-लाईन.

साहेबः दे इकडे!

साहेबः मॅडम नमस्ते, सुना है बोहत खुष हो आप

मॅडमः खुष तो होंगे हि हम, आपने बोला वैसे हि जो हुआ है

साहेबः मॅडम महाराष्ट्र मे अब हम हि तो बचे हुए जो इन बच्चोंको अच्छे से पेहचानते है, कौन कितना पानी मे है ये सब पेहचानते है

मॅडमः चलो, अब ना युती का टेन्शन ना महायुती का झंझट, अब तो महाराष्ट्र फिरसे हमारा हि होगा, बाकि आपने कहा बोहत हि खुब था, हम लढे जैसा करे मार युती वाले खाये, न जाने ये बच्चे बडे कब होंगे…

साहेबः अब युती तो खतम, मैने कहा था ना, इनको इस बार इलेक्शन मे हराना मुमकिन नहि, इनको जंग के मैदान के बाहर हि ढेर करना पडेगा. जैसे हि उनको पता चला कि हम अलग लढ सकते है, बच्चे तो आपस मे हि लढ पडे, पुरि दुश्मन पार्टि मैदान मे उतरनेसे पेहले हि आधी खतम कर दी… (कुत्सीक पणे हसत)

मॅडमः चलो, अब आप दिल्ली आ जाओ, एक चाय पिते है और सबको बता देते है कि ये इलेक्शन काँग्रेस और राष्ट्रवादी साथ मे हि लढने वाले है… हां और साथ मे वो राज ठाकरे के खिलाफ अर्रेस्ट वॉरंट निकालना न भुलियेगा.. वो बच्चा भी अपने बोहत काम का है…

साहेबः उसका खयाल तो मै बोहत अच्छे से रख रहा हु मॅडम, बंदा वो मेहनत करे.. मिठाई इस बार भी हम हि खाये…

मॅडमः Grazie a dio .. tutto è sotto controllo… अरे, इतनी हिन्दी मे बात करने कि आदत है नहि ना.. ईटालीयन हि निकल गया मुह से..

साहेबः noi vinceremo (आपण जिंकणारच), आपके लिये तो हमने कबसे ईटालीयन भाषा सिखनी चालु कर दि थी…

मॅडमः वा, वा, वा… दिल्ली आजाईये.. परसो प्रेस कॉन्फरन्स रखी है दोपहर १२ बजे

साहेबः vederti madam, सी यु सुन, वो मेरा स्वीस अकांऊट का मॅटर जरा…

मॅडमः आपने महायुती मे सेंध लगा दि, खतम करवा दी.. फाईल्स खतम मैं करवा दुंगी, जब मंत्रालय मे आग लग सगती है तो ये सीबीआय का ऑफिस क्या चीज है…

दोघे हि जणे फोन ठेवतात..
साहेबः चल रे, दिल्ली ला निघायची तयारी कर, अजित ला सांग चार पत्रकारांना बोलव व सांग, महाराष्ट्राच्या हिता आड राष्ट्रवादी कधीच येणार नाहि, प्रसंगी मनाचा मोठ्ठे पणा दाखवु पण महाराष्ट्राच्या भावनेचा व अस्मितेचा आदर राखु.

सहायकः होय साहेब, बाहेर गाडि उभी आहेच, बालराजेंना फोन दोन मिनीटात जाईल.

मराठी सुविचार

मराठी सुविचार

मराठी सुविचार

 1. ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते>
 2. जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात
 3. जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही
 4. मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे
 5. समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे अहंकार, धनाचे गर्व ते काय कामाचे?
 6. समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय
 7. विषयाचे चिंतन हा भोग आहे. इश्वराचे चिंतन हा योग आहे
 8. आईच्या प्रेमळपणाने पाठीवरुन हात फिरवुन केलेला उपदेश सार्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो
 9. आपल्यातुन सर्वत्र आनंदाचा वर्षाव करता आला पाहिजे. आपल्या कार्यातुन तो व्यक्त झाला पाहिजे
 10. अंहकाराचा नाश तेथे सुखाचा वास. तुमच्या चांगल्या – वाईट कॄत्यांची नोंद परमेश्वराजवळ आहे
 11. परोपकारी सज्जन त्यांचा विनाशकाळ आला तरी त्यांचा सस्वभाव सोडत नाहीत. तुटता तुटता चंदन कुर्हाडीलाही सुंगंधीत करते
 12. श्रम, विश्रांती व पुजा या मनवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत, असे प्रत्येक धर्म सांगतो
 13. समाधान म्हणजे मनाची संपत्ती. ज्याला ती गवसली तो सुखी
 14. ज्यावेळी अहंकार नाहिसा होतो, त्यावेळी आत्मा जागृत होतो
 15. आत्मविश्वास हि यशाची गुरुकिल्ली आहे
 16. योग्यता कामावर अवलंबुन नसते, ती काम करणार्यावर व कामावरिल त्याच्या प्रेमावर असते..
 17. क्रोध म्हणजे गांधीलमाशीच्या मोहळावर फेकलेला दगड
 18. मान ज्याने पचवला तो सत्पुरूष झाला
 19. काम थोडे करा किंवा जास्त करा ते कधी फुकट जात नसते, करणार्याची वॄद्धीच होत असते
 20. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे मात्र तो मोबदला जबरदस्त घेतो
 21. माणसाचे मोल डोक्यावरील मुकुटाने आणि गळातल्या जडजवाहिर्यांनी होत नाही, तर त्याच्या अंतःकरणातील माणुसकीत आणि मनगाटातल्या पराक्रमांनी कळते
 22. आपल्या छोट्या घरात सुद्धा सुखामॄत भरलेले असताना बाहेरिल सुखाच्या मॄगजळामागे जो धावतो तो एक मुर्ख होय
 23. सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतु:सुत्री आहे
 24. स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःला कमी लेखणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे होय
 25. कॄतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलासारखे भासतात, काट्यांची मखमल होते
 26. जो नेहमी दुसर्यांवर टिका करतो, तो दु:खीच होतो, ज्याचे मन सदा धर्मरत राहतं, त्याला देव देखील नमस्कार करतो
 27. वाचन हा जसा आचाराचा सारथी, तसा प्रयत्न हा विधीचा म्हणजे दैवाचा सारथी
 28. माता आणि मातॄभूमी यांचा विसर पडू देऊ नका
 29. खोटे बोलण्याने माणुस काही मिळवेलच असे नाहि, पण स्वतःवरिल लोकांचा विश्वास तो गमावून बसतो
 30. गर्विष्ट मनुष्य आपली स्तुती स्वतःच गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते
 31. माणुस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे
 32. ईश्वराचे भय हे सर्व रीतीने मूळ आहे
 33. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते
 34. कोणताही भार आनंदाने उचलला म्हणजे तो हलका होतो
 35. निंदकाची खोड मोडण्यास दुसरे औषध नाही, मात्र उत्तर करू नये व हसण्यावर घालवावे
 36. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाशी गाठ पडलीच

फेसबुक – वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंध

फेसबुक - वयक्तिक आयुष्य आणि आपले नाते संबंधमी स्वत: डिजीटल मार्केटींग मध्ये कार्यरत असल्यामुळे माझा फेसबुकचा वापर जरा जास्तच आहे आणि याच कारणा मुळे माझा अनेक प्रकारच्या व अनेक देशातील फेसबुक वापरणार्या युजर्सशी संपर्क येतो. मि सर्व सोशल मिडीया युजर्स असे संबोधणार नाहि तर हा लेख मी फक्त फेसबुक पुरताच मर्यादीत ठेवणार आहे कारण फेसबुक वरती एखादा सोशल मिडीया युजर सर्वाधिक वेळ खर्च करत असतो. मला सतत हा प्रश्न पडत होता कि फेसबुक वरती एवढा वेळ खर्ची केल्याने माणसाच्या वयक्तीक व व्यावसायिक जीवना मध्ये व त्याच्या नाते संबंधांमध्ये काहि ताण तणाव निर्माण होतात का? फेसबुक हि वेबसाईट माणसांना एकमेकाशी जोडतीये का तोडतीये? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी फेसबुक युजर्सशी बोलायचे ठरवले.

अनेक फेसबुक युसर्सशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर मला आढळुन आले कि फेसबुकच्या अतिवापरा मुळे व खर्याखुर्या जिवनाशी व जिवंत माणसांशी संपर्क कमी झाल्या मुळे खालिल पैकि कोणतीही लक्षणे दिसु शकतात.

 • स्त्रियांचे आजार
 • पालकांच्या तक्रारी
 • शारिरीक व्याधी
 • मानसिक थकवा
 • उतावळेपणा
 • सेक्शुअल अब्युज
 • खाण्याच्या सवई बदलणे
 • वाढलेला ताण
 • नातेसंबंधां मध्ये तणाव
 • घटलेला आत्मसन्मान
 • उगाचच अतिच आत्मसन्मान
 • न्युनगंड
 • अहंता (ईगो)
 • कामात येणार्या तक्रारी

 

तुमचा आणि फेसबुकचा संबंध कसा आहे? तुम्हि फेसबुक जपुनच वापरता कि तुमच्यात हि वरिल पैकि एखादा अवगुण आढळुन आला आहे? तुमचे अनुभव नक्कि आमच्या सोबत वाटा.

पुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे

विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल  तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे आले आहेत त्यांच्या साठी हि एक अतिशय चांगली सुविधा आहे. पुण्यातल्या व पुण्याच्या आसपासच्या अनेक सुंदर, ऐतिहासिक अश्या स्थळांचे दर्शन घडवणारि हि सहल फक्त एका दिवसात पुर्ण होते आणि या मुळेच पर्यटकांच्या वेळेची, पैशाची व ताकतीची बचत होणे शक्य होते.

पुणे दर्शन
पुणे दर्शन (AC Bus)

पुण्याच्या पर्यटन स्थळांमधुन पुण्याची संस्कॄती, वारसा आणि इतिहास झळकतो. समुद्र सपाटी पासुन ५६० मीटर्स उंची वर पुणे वसलेले आहे. सर्वच ऋतुंमध्ये पुणे पाहता येऊ शकते म्हणुनच वर्षाच्या कोणत्याहि महिन्यात आपण पुणे शहर पाहण्यासाठी येऊ शकता. पुण्याने आधुनिकते सोबतच आपली संस्कृतीही जपुन ठेवली आहे हे आपल्याला जाणवते जेंव्हा आपण पुण्यातल्या काहि प्रसिद्ध मंदिरांना भेटी देतो जसे कि – चतुॠंगी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेपती मंदिर, सारसबाग गणपती मंदिर इत्यादी. याच बरोबर दगडांमध्ये काम करुन बनवलेल्या ऐतिहासिक पाताळेश्वर लेण्या व शंकराचे मंदिर, १६ व्या शतकातील शनिवार वाडा, १८९२ मध्ये बांधलेला आगाखान पैलेस यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. पुणे शहरा मध्ये काहि प्रमुख संग्रहालये देखिल आहेत – टिळक संग्रहालय, केळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, ट्रायबल संग्रहालय इत्यादी. पुण्याचा प्रचंड असा ऐतिहासिक वारसा व पुण्याचे महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणी मध्ये असलेले योगदान तुम्हाला पुणे दर्शन मध्ये पाहण्यास मिळेल हे नक्कि.

पुणे दर्शन मध्ये दाखवण्यात येणारी प्रमुख स्थळे:

 • पाताळेश्वर लेण्या
 • पुणे विद्यापीठ
 • चतुॠंगी मंदिर
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय
 • टिळक संग्रहालय
 • शनिवार वाडा
 • लाल महल
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
 • फुलेवाडा
 • सारसबाग गणपती मंदिर
 • पेशवे उद्यान
 • महालक्ष्मी मंदिर
 • स्वामी विवेकानंद संग्रहालय
 • राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज (कात्रज स्नेक पार्क)
 • महादजी शिंदे छत्री (समाधी स्थळ)
 • राष्ट्रिय युद्ध स्मारक
 • पुणे ट्रायबल संग्रहालय
 • ओशो गार्डन
 • आगा खान पैलेस

वरिल ठिकाणी पुणे दर्शनची बस जाते, ट्रिपची सुरवात व अंत पुणे रेल्वे स्टेशन इथुन होतो.

पी.एम.पी.एम.एल आपल्या बसने आपला प्रवास सुखाचा व आनंदाचा होवो या साठी प्रयत्न करतेच. पुणे दर्शनची बस पुण्यातुन दोन ठिकाणांहुन सुटते मोलिदीना स्टैंड (पुणे रेल्वे स्टेशन) आणि डेक्कन जिमखाना (डेक्कन बस स्टैंड). बसेस सकाळी ९.०० ला सुटते व परत संध्याकाळी ५.०० ला येतात. पुणे दर्शनची बस तुम्ही सकाळी ८.०० ते ११.३० व दुपारी ३.०० ते ६.०० या वेळांमध्ये आरक्षित करु शकता. येणारा खर्च अंदाजे १५० रु. प्रती व्यक्ती.

कमीत कमी वेळेत, पैशांत व कष्टांत पुणे पहाण्याचा पुणे दर्शन हा अत्यंत किफायतशीर असा मार्ग आहे. जेंव्हा तुम्हि पुण्यामध्ये येण्याची योजना आखाल त्या वेळी पुणे दर्शनाचा पर्याय नक्कि निवडा.

हे लक्षात असु द्या:

 • फुलेवाडा रविवारी बंद असतो
 • पेशवे उद्यान व राजिव गांधी प्राणि संग्रहालय बुधवारी बंद असतात