Category Archives: कविता

प्रेमाचे बारा महिने …

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली …!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
” बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या , आता नविन बॉयफ्रेंड ,
नविन वर्ष नाही का आलं ?”
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!

कवी अज्ञात

प्रेमाचे बारा महिने
प्रेमाचे बारा महिने

आई फ़क्त तुझ्यासाठी…

आई फ़क्त तुझ्यासाठी.
आई फ़क्त तुझ्यासाठी.

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी…….

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं…
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं…

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो…..
थांबवून हुंदका कसाबसा मी..
बैलन्स संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस…
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस…

इथे रोज पिझ्झा आणि बर्गर खाताना…
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते…

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
“आई चहा दे गं ” अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच…
घर अगदी भकास भकास वाटू लागतं…
चहा पिण्याची इच्छा जाते मरून…

सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा…गोंजारणारा हात शोधत राहतं…
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी…

कवी: अनामिक

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

गणेश राजाराम शिंदे
रा. सावरगाव (गुरवाचे)
ता. पारनेर जि. अहमदनगर.

वरिल कविता गेणेश शिंदे यांनी महाराष्ट्र माझास पाठवली, आपण हि आपले लेख/कविता महाराष्ट्र माझासाठी पाठवु शकता: संपर्क साधा.

उद्धव विरुद्ध राज

उद्धव विरुद्ध राज

राजकीय भांडणातसुद्धा
मराठी बाणा जपायला लागले.
अगदी ठाकरी शैलीमध्येच
एकमेकांना झापायला लागले.

मराठी माणसाच्या नावाखाली उद्धव
वेगवेगळे हेतु आहेत
त्यांचे प्रबोधन कुणी करावे ?
ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत.

सेनापतींच्या बाळकडूमुळेच
हा मार्मिक सामना रंगतो आहे !
चित्र-विचित्र व्यंग पाहून

दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बावळट आणी स्टुप्पिड

तु आमच्या ग्रुप मधे आला
पहाता क्षणीच तु मला खुप आवडला..
तुझे ते विस्कटलेले केस, तुझी ति बा‌इक..
जिन मधुन अर्धवट बाहेर आलेला शर्ट..
अदिदास चे शुज, कायम कसल्या तरी विचारात
पण तु खुप गोड दिसातोस…

पण तुला काहिच कळत नाही
तुझी नोकरी,बा‌ईक,करी‌अर
या पलिकडे तुला कशातच गति नाहि.
आपल्यावर कुणी मरत ,
ते तुला समजत नाहि
तु म्हणजे ना आगदी बावळट आणी स्टुप्पिड आहेस..
तरी पण माझा जिव कि प्राण आहेस.

पण त्या दिवशी
तु मला प्रथमच नांवानी हाक मारली
अन माझ सार विश्वच बदलुन टाकल
त्या रात्री सारा मदहोशीचा आलम होता.
सकाळी उठल्यावर सार अपुर्ण वाटत होत.
अन जाणिव झाली ,तुझ्या नांवा‌आधी
नांव लावल्या शिवाय ते पुर्णत्व येणार

पण मला माहित आहे
तु काहिच करणार नाहिस
मलाच पा‌उल उचलायला हव.
तुझी नोकरी,बा‌ईक,करी‌अर
या पलिकडे तुला कशातच गति नाहि.
कारण तु आगदी बावळट आणि स्टुप्पिड आहेस.
पण म्हणुनच तु मला प्राणाहुन प्रिय आहेस.

अविनाश