Category Archives: कविता

माझे प्रेम

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत – १

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – २

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – ३

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – ४

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – ५

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – ६

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत
आयुष्यात – – प़ेम केल होत – ७

कवी  – संदेश कोळगावकर

राजे पुन्हा जन्मास या..

आपल्या महाराष्ट्र माझा चे नियमित वाचक स्वप्निल देमापुरे (वय २२) यांनी खास महाराष्ट्र माझाच्या वाचकांसाठी शिवजयंती निमित्त लिहिलेली कविता..आपणा साठी.

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या

शिरि शिरपेच हाती समशेर शोभती

अश्वरुढ होई राजा शिवछत्रपती

हे राजे, तुम्हा हिन्दुह्रुदय पुकारती

भगवा धरुन हातात या..राजे पुन्हा जन्मास या. || १ ||

कावा गनिमी करुनी, धर्मरक्षिण्यास

फाडिले अफजल खानास तसा

आज सरकार म्हणे त्यास फासी नको.

फाडण्या पुन्हा खानास या

राजे पुन्हा जन्मास या. || २ ||

नाव घेती तुमचे किती, परी

चरित्र कुणा का ना उलगडे तरी?

राजकारण करी, ती नावावरी,

शिकवण्या धडे राजकारणाचे या

राजे पुन्हा जन्मास या. || ३ ||

पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माणास या

मराठि अस्मिता जागविण्यास या

नको बांधणि किल्ल्याची आम्हा आता

माणुस मराठि एकदा जोडण्यास या

राजे पुन्हा जन्मास या. || ४ ||

जाणत्या राजास ला़ख्-लाख मुजरा असो

स्विकारण्या माझ्या मुजर्यास या

राजे पुन्हा जन्मास या.

जन्म घ्या तुम्हि जन्म घ्या

राजे पुन्हा जन्मास या. || ५ ||

स्वप्निल देमापुरे, यवतमा़ळ