Tag Archives: कविता

असेल कुणीतरी…

असेल कुणीतरी, जी माझ्यासाठी देवाने बनवली असेल,

असेल कुणीतरी, जी माझी वाट बघत असेल,

असेल कुणीतरी, जी नेहमी माझाच विचार करत असेल,

असेल कुणीतरी, जी स्वप्नात सुद्धा मलाच शोधत असेल,

असेल कुणीतरी, जी चेहऱ्याने सुंदर नसली तरी मनाने सुंदर असेल,

असेल कुणीतरी, जी थोडीशी नाजूक, थोडीशी भावूक आणि थोडीशी लेझी असेल,

असेल कुणीतरी, जी चांद ताऱ्यांमध्ये देखील मला शोधत असेल,

असेल कुणीतरी, जी जीवाला जीव देणारी असेल,

असेल कुणीतरी, जी दिवसात सुद्धा स्वप्नं बघत असेल,

असेल कुणीतरी,

जी आपल्यावरती रागवेल आणि त्या रागात सुद्धा आपल्यावरती प्रेम करणारी असेल,

असेल कुणीतरी, जी आपण कितीही रागावलो तरी प्रेमाने मनवणारी असेल,

असेल कुणीतरी, जी मनात माझा विचार करून गालातल्या गालात हसणारी असेल,

असेल कुणीतरी, जी माझ्या सुखात आणि दु:खात आयुष्यभर मला साथ देणारी असेल,

असेल कुणीतरी, जी फक्त माझ्यावर फक्त माझ्यावर मरे पर्यंत प्रेम करणारी असेल,

असेल का अशी कुणीतरी, जी माझ्यासारखाच विचार करणारी असेल.

– समीर पेंडुरकर (घाडी)

नवर्या साठी न बायको साठी…

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे”

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”
“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”

कवी: अज्ञात (माहित असल्यास आमच्याशी संपर्क साधा)

मी मालक फुटक्या कवड्यांचा

तडफड झाली होती तेव्हा
साखर वेचून जळले कोण
स्वर्गातून पडल्यावर कळले
चूक कोणती, चळले कोण

वीज घेवूनी कुठे चालली
अंधाराची तान्ही पोर
जागोजागी टपल्या वाटा
घेऊनिया हाताशी चोर

वादळ सरता क्षितीजालाही
चैतन्याचा आला कोंब
ठरले नव्हते आनंदाचे
परिस्थितीची झाली बोंब

उलट्या पूलट्या संसाराला
शिवण घातली चंदेरी
गूढ राहू दे तुझे वागणे
अबोध असू दे कुणीतरी

” ‘मी का तू?’ पेक्षाही अवघड ”
अस्तित्वाचा अंगारा
मी मालक फुटक्या कवड्यांचा
तो स्वप्नांचा गुंगारा

— नचिकेत जोग

प्रेमाचे बारा महिने …

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत ” ती ” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये ” ती ” माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली …!
मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं
सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
” बारा महिने एकत्र फिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या , आता नविन बॉयफ्रेंड ,
नविन वर्ष नाही का आलं ?”
मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं !!

कवी अज्ञात

प्रेमाचे बारा महिने
प्रेमाचे बारा महिने

आई फ़क्त तुझ्यासाठी…

आई फ़क्त तुझ्यासाठी.
आई फ़क्त तुझ्यासाठी.

बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी…….

कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा

एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं…
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं…

प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो…..
थांबवून हुंदका कसाबसा मी..
बैलन्स संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस…
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस…

इथे रोज पिझ्झा आणि बर्गर खाताना…
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते…

ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
“आई चहा दे गं ” अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच…
घर अगदी भकास भकास वाटू लागतं…
चहा पिण्याची इच्छा जाते मरून…

सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा…गोंजारणारा हात शोधत राहतं…
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी…

कवी: अनामिक