Tag Archives: काँग्रेस

हाताला घड्याळ,.. कानाला फोन. जेंव्हा साहेब दिल्लीस फोन करतात…

स्थळः बारामती
वेळः अभद्र

सहायकः साहेब ‘मॅडम’ ना फोन लागला, मॅडम इज ऑन-लाईन.

साहेबः दे इकडे!

साहेबः मॅडम नमस्ते, सुना है बोहत खुष हो आप

मॅडमः खुष तो होंगे हि हम, आपने बोला वैसे हि जो हुआ है

साहेबः मॅडम महाराष्ट्र मे अब हम हि तो बचे हुए जो इन बच्चोंको अच्छे से पेहचानते है, कौन कितना पानी मे है ये सब पेहचानते है

मॅडमः चलो, अब ना युती का टेन्शन ना महायुती का झंझट, अब तो महाराष्ट्र फिरसे हमारा हि होगा, बाकि आपने कहा बोहत हि खुब था, हम लढे जैसा करे मार युती वाले खाये, न जाने ये बच्चे बडे कब होंगे…

साहेबः अब युती तो खतम, मैने कहा था ना, इनको इस बार इलेक्शन मे हराना मुमकिन नहि, इनको जंग के मैदान के बाहर हि ढेर करना पडेगा. जैसे हि उनको पता चला कि हम अलग लढ सकते है, बच्चे तो आपस मे हि लढ पडे, पुरि दुश्मन पार्टि मैदान मे उतरनेसे पेहले हि आधी खतम कर दी… (कुत्सीक पणे हसत)

मॅडमः चलो, अब आप दिल्ली आ जाओ, एक चाय पिते है और सबको बता देते है कि ये इलेक्शन काँग्रेस और राष्ट्रवादी साथ मे हि लढने वाले है… हां और साथ मे वो राज ठाकरे के खिलाफ अर्रेस्ट वॉरंट निकालना न भुलियेगा.. वो बच्चा भी अपने बोहत काम का है…

साहेबः उसका खयाल तो मै बोहत अच्छे से रख रहा हु मॅडम, बंदा वो मेहनत करे.. मिठाई इस बार भी हम हि खाये…

मॅडमः Grazie a dio .. tutto è sotto controllo… अरे, इतनी हिन्दी मे बात करने कि आदत है नहि ना.. ईटालीयन हि निकल गया मुह से..

साहेबः noi vinceremo (आपण जिंकणारच), आपके लिये तो हमने कबसे ईटालीयन भाषा सिखनी चालु कर दि थी…

मॅडमः वा, वा, वा… दिल्ली आजाईये.. परसो प्रेस कॉन्फरन्स रखी है दोपहर १२ बजे

साहेबः vederti madam, सी यु सुन, वो मेरा स्वीस अकांऊट का मॅटर जरा…

मॅडमः आपने महायुती मे सेंध लगा दि, खतम करवा दी.. फाईल्स खतम मैं करवा दुंगी, जब मंत्रालय मे आग लग सगती है तो ये सीबीआय का ऑफिस क्या चीज है…

दोघे हि जणे फोन ठेवतात..
साहेबः चल रे, दिल्ली ला निघायची तयारी कर, अजित ला सांग चार पत्रकारांना बोलव व सांग, महाराष्ट्राच्या हिता आड राष्ट्रवादी कधीच येणार नाहि, प्रसंगी मनाचा मोठ्ठे पणा दाखवु पण महाराष्ट्राच्या भावनेचा व अस्मितेचा आदर राखु.

सहायकः होय साहेब, बाहेर गाडि उभी आहेच, बालराजेंना फोन दोन मिनीटात जाईल.

भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?

हा लेख महाराष्ट्र माझा साठी मा.ना. बासरकर यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा.

आज पर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार?
आज पर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार?

२जी च्या घोटाळ्यामुळे श्री. राजा यांना पायऊतार व्हावे लागले आणि त्यांच्या जागी श्री. कपिल सिब्बल यांना मनमोहन सिंग यांनी स्थानापन्न केले. श्री कपिल सिब्बल टेलिकॉम मिनिस्टर यांनी नुकतेच सी.ए.जी. च्या अहवाला बद्दल वक्तव्य केले त्या वरून असे दॄष्टिस येते कि काँग्रेस मधला आत्मविश्वास ढासळत आहे. त्यांच्या सरकारवरच्या भ्रष्टाचारच्या  आरोपानां सामोरे जाण्याचे सोडून घोटाळा उघडकीस आणलेल्या सी.ए.जी. यांच्या अहवालावर टिप्पणी करणे म्हणजे जनते मधील  असंतोष निवळण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे.
खरे तर असे वक्तव्य केल्यामुळे मनमोहनसिंग सरकारचे काम अजून कठीण होत आहे. ऑडिटर जनरलच्या अहवाला नुसार ३९०० करोडचा तोटा २जी च्या सौद्यातून झाला, पण कपिल यांच्या म्हण्यानुसार सी.ए.जी. ने मुळ तोटा वाढवून अहवालात नोंदी केल्या आहेत. पी. ए.सी. (Public Account Committee ) श्री. सिब्बल यांच्या या वक्तव्याची गंभीर पणे दखल घेऊन कपिल सिब्बल यांच्या विरुद्ध ” Breach  Of  Privilage Motion ‘ पार्लीमेंट मध्ये आणण्याच्या विचारात आहेत.

कपिल सिब्बल यांनी जें भाष्य केले ते काहीं त्यांच्या स्वत:चे नाही हे निश्चित. त्यांचा बोलिवता धनी कोणी तरी वरचा आहे. हा जो प्रयत्न चालला आहे तो श्री. राजा यांना वाचवण्यासाठी नाही तर मित्रपक्ष DMK ला भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटण्यासाठी व त्या योगे आपले सरकार टिकविण्यासाठीची चाललेली केविलवाणी धडपड आहे.

श्री. मनमोहन सिंग यांनी सभाग्रहात कबुल केले कि ते स्वतहा पी.ए.सी. (P.A.C ) समोर सर्व आरोपांचे उत्तर देतील , पण सिब्बल यांच्या वक्तव्या वरून असे वाटते कि काँग्रेस पार्टी सी. ए. जी. चा अहवाल व त्यातील दाखवलेल्या चुकांकडे गांभिर्याने न बघता नुसते आरोप कोणा तरी  दुसर्याच्या माथी मारीत आहेत. सी.ए.जी. चा रिपोर्टच चुकीचा आहे असे म्हणणे योग्य नाही. अश्या प्रकारच्या अयोग्य हालचाली मुळे शेवटी हें सर्व काँग्रेस च्या अंगलट येईल अशी चिंन्हे दिसत आहेत.

नुकतेच श्री. सिद्धार्थ वरदराजन नि  “The  Hindu ”  मध्ये अशाच प्रकारची काँग्रेस बद्दल भीती व्यक्त केली. “If  the UPA Govt . continues to remain in denial , it  will pay a heavy political price.”

आता जवळ जवळ एक वर्ष होत आहे व नवं वर्ष पण आलं तरी भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी रोज रखानेच्या रखाने वर्तमान पत्रांत भरले जात आहेत.  पुढे येणार्या बजेट सेशन मध्ये विरोधी पार्टी ह्या  विषयावर बराच गोंधळ घालणार व जाब विचारणार तेव्हां यु.पी.ये. सरकार अडचणीत येणार.

श्री मनमोहन सिंगनी देलेल्या आश्वासना  प्रमाणे भ्रष्टाचाराचे मुळ शोधून त्या वर उपाय योजना करावी अन्यथा पुढच्या वेळी सरकार येणे कठीणच जाईल. जर का असेच कोणी ना कोणी त्यांच्या पक्षातील नेते मंडळी उलट सुलट विधाने करतच राहिली व त्यास पायबंद घातला नाही तर ज्वलंत आगीत तेल ओतल्या सारखे होईल. आग विझविण्यासाठी  केलेल्या  उपाय योजना मुळे आग अधिकच भडकेल असे होऊ नये म्हणजे झाले.

मा.ना. बासरकर
“देवाण-घेवाण” http://mnbasarkar.blogspot.com

आपल्याला काय वाटते? भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा खणीत आहे का?

आप्त ! (ब्रिटिश नंदी)

ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदी

– आप्त म्हंजे काय रे भाऊ?

– अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात!

– हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ?

– छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात!

– म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ?

– नव्हे नव्हे रे! छे, आता मात्र मी… तुझ्यापुढे हातच टेकले! अरे, आप्त म्हंजे मित्र आणि नातलग!

– म्हंजे आपलं आघाडी सरकार का रे भाऊ?

– नाही नाही रे! सरकार ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती एक आपोआप चालणारी यंत्रण असते!

– म्हंजे घड्याळ का रे भाऊ?

– छे बुवा! अरे, इतका कसा तु मठ्ठ? जाऊ दे. मी तुला आता एक उधारण देतो. आपल्या मामाचे दर उन्हाळ्याला सुटीत पत्र एते. मी अमुक अमुक तारखेला एत आहे, असे त्याने कळवलेले असते. त्याला आपले बाबा लगीच पत्र टाकतात की आम्हीच बाहेरगावी जात असून तुम्ही एऊ नका!!

– हो रे हो! तसे पत्र मी वाचले आहे!

– असे पत्र लिहुन एखाद्याचा मामा करणारास आप्त असे म्हणतात!

– हा हा! आप्त म्हंजे शत्रु का रे भाऊ?

– नव्हे रे! आप्त हे आपल्याच घरातले किंवा पक्षातले असतात! पण आपल्या विरोधात असतात!

– हां हां, आता कळले! आप्त म्हंजे विरोधक!! बरोबर ना!

– रे, तुला अजुन पुर्ण समजलेले दिसत नाही! आप्त हे एकमेकांबरोबरच असतात, पण तेव्हाच विरोधकही असतात!

– म्हंजे शिवसेना आणि भाजप का रे भाऊ?

– नव्हे नव्हे रे! पुन्हा एक उधारण देतो. आपले बाबा रात्री उशिरा खूप पिऊन आले, की आपली आई काय करते?

– दार बंद करुन खूप शिव्या देते!

– नव्हे रे, बाबांना काय प्यायला देते?

– ताक!

– बरोब्बर! त्याला उतारा असे म्हणतात! आप्त हा एक उताराच असतो व नेहमी उशिरा घरी येणारांना पाजावा लागतो!

– हां, आता कळले मला सारे भाऊ!

– काय कळले?

– हेच की मी तुझा भाऊ असुन आप्तही आहे!!

— ब्रिटिश नंदी