Tag Archives: नमो

गुजरात एक्के “मोदी”. गुजरात दोनी “मोदी”….

  गुजरात एक्के “मोदी”. गुजरात दोनी “मोदी”….

नमस्कार,
नुकताच गुजरात राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्यांचे निकाल हाती आले. निकाल अगदी अपेक्षे प्रमाणे लागले काय असतील ते दोन-तीन जागांचे हिशोब चुकले एवढेच. मोदींना १२० जागा मिळ्तील असा आमचा अंदाज होता पण ११७ हा आकडा हि ’एकछत्री’ सत्ता कायम ठेवण्यासाठी खुप आहे.

या इलेक्शन्स मुळे ’एक्झिट पोल्स’ नी मात्र आता एक्झिट घ्यावी असा एक निरोप संपुर्ण हिन्दुस्तानात धाडला. पत्रकारिता हि कशी एक तर्फ़ी असु शकते अथवा कशी एकतर्फ़ी असते हे उघड केले. मोदी म्हणजे काय राक्षसच जन्माला आलाय आणि त्याला गाडायलाच आपला जन्म झालाय या अवतारातच पत्रकारकांकडुन बातम्या दिल्या गेल्या दाखवल्या गेल्या. या लोकांच्या चॅनल्सवर मोदीं च्या सभेला गर्दीच होत नाही पण राहुल बाबाच्या भाषण ’वाचण्याच्या’ रटाळ कार्य्रक्रमाला मात्र हे तोबा गर्दी. आता या लोकांनाही आपल्या ’त्याच्यात’ (म्हणजे गिरेबान वागैरे) पाहण्याची वेळ आली…काही शिल्लक आहे का नाही बघुन घेतलेले बरे.

Congress ने हि या वेळी झिंकणारच हा राणाप्रतापी वज्रनिर्धार केला. झिंकण्यासाठी वाट्टेल ते करु. सगळि ताकत पणाला लाऊ पण या वेळि गुजरात आमचाच… इति गुजरात कोन्ग्रेस. तुम्हि भले असाल भाजप चे आमदार पण आमच्या तिकीटावर लढा रे सिट तेवढ्या द्या रे झिंकुन..असे म्हणत २६ बंडखोरांना तिकिटे दिली. पण काहि उपयोग नाही एक ही आमदार झाला नाही. २६ च्या २६ जणं आपटली तोंडावर (त्यांच्याच).

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नोवेंबर मध्ये सभागॄह भरवण्यात आले. सगळे मंत्री आपआपली कामे सोडुन गुजरातेत गेली कोन्ग्रेस चा प्रचार करायला. ज्यांना आपण पुन्हा निवडुन येवु का नाही हे माहीत नाही अश्यांना कुणा विरुध्ध ऊभे केले तर मोदींच्या..(हा ही एक राजकीय विनोद). म्हणे गुजरात मधल्या मराठी टक्क्याला कोन्ग्रेस कडे वळवण्या साठी. त्यानीही मतपेट्यातुन सांगुन दिले…लावली तुम्ही वाट महाराष्ट्राची पण इथे मात्र आम्ही असे होऊ देणार नाही..चला पळा येथुन.

मोदींनी काम केलेय त्या कामाची पोचपावती दिलीये गुजरातच्या जनतेने. गेली ६० वर्षे कोन्ग्रेसच्या वायद्यात एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे आम्ही रस्ते, विज आणि पाणी देऊ. पण मोदींनी हे खरे करुन दाखवले. जनतेला रस्ते दिले..पाणि दिले..२४तास विज आज गुजरातेत असते याचे कारण मोदीं चे नेतृत्व. का म्हणुन असे सरकार पडावे?

हा विजय जेवढा मोदींचा तेवढाच गुजरातच्या जनतेचा. हायकमांड आले होते. भाषणात उल्लेख आतंकवाद्याचा आणि वरती प्रश्न का मारले त्याला? मारणारे चुकिचे..मारणारे ’मौत के सौदागर’. काहि नाही या अश्या आतंकवाद्याना ठोकलेच पाहिजे. आज जे लोके “आतंकवादी हि माणसे आहेत आणि त्यांना हि जगण्याचा अधिकार आहे” अशी मुक्ताफ़ळे उधळतायत ना..जेंव्हा त्यांच्याच ढुंगणाखाली बॉम्ब फ़ुटेल ना तेंव्हा येतील अपोआप लाईनवर. गोळि चे उत्तर ’पांढरा झेंडा’ हे मानणार्यांचे हे क्षेत्रच नव्हे.

महाराष्ट्रातल्या जनतेनेही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. तु मुसलमान म्हणुन हे पद घे. तु दलित म्हणुन हे पद घे म्हणणाऱ्या Congress च्या मागे का आणि किती उभारहायचे हे ठरवा आता. आणि हिच लोकं स्व:ताह ला निर्ल्लजपणे सेक्युलर म्हणवुन घेतात .किती हि रसातळाला जाऊदे माझा महाराष्ट्र, पण माझ्या जात वाल्याला पद दिले..अरे विचार करा..ज्याला पद दिले तो मोठा झाला..ज्याला मत दिले तो मोठा झाला पण आपले काय? आपण अजुन ’…नाम पे देदे बाबा’.

आता महाराष्ट्रात हि सत्तांतर व्हावेच लागणार नव्हे ते होणारच. या साठि तमाम शिवसैनिकांनी आता पासुनच कामाला लागावे. हिन्दुत्वाचा गजर ऊभ्या महाराष्ट्रात गर्जावा. या हिन्दुत्वातच जाती-पाती च्या भिंती फ़ोडण्याचे सामर्थ्य आहे. तर या वेळि तमाम जागृत जनतेने मतदाना दिवशी बाहेर पडुन महाराष्ट्रात ही गुजराते प्रमाणे हिन्दुत्वाचा भगवा विधानभवनावर फ़डकवावा.

हिन्दुत्वाचा भगवा विधानभवनावर फ़डकावा हिच माई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

तुर्त मि आशिष थांबतो…….जय महाराष्ट्र.