Tag Archives: पुनर्वसन

पुनरवसन……….मुस्लिमांचे

पुनरवसन……….मुस्लिमांचे

सकाळी सकाळी पेपर उघडला आणि पहिलीच बातमी वाचली..बातमीत काय तर म्हणे दंगलग्रस्त मुसलमानांचे पुनरवसन झालेले नाही. हसु का रडु तेच कळेना..एवढी मोठी ती समीती केवढी मोठी तीची ताकत आणि निष्कर्श काय तर म्हणे पुनरवसन नीट झालेले नाही..अरे या देशात असे कोण आहे की ज्याचे पुनरवसन नीत झालय.

दंगलग्रस्त्…..पुरग्रस्त्…दुश्काळग्रस्त असे सगळे ग्रस्तच ग्रस्त आहेत. समित्यांवर समित्या नेमल्या जातात त्यांचे काय होते?……सगळ्या जगाला माहिती आहे. या ग्रस्त लोकांचे कुठे पुनरवसन होउदे अथवा ना होउदे या समिती वाल्यांचे मात्र नक्की होते पुनरवसन एका छोट्याश्या घरातुन मोठ्या बंगल्यात….मोठ्या बंगल्यातुन त्याहुन मोठ्या बंगल्यात. आमची ग्रस्त लोके मात्र बसतात लुंग्या हलवत आणि टोप्या बदलत.

जर हा प्रश्न एवढा कॉमन आहे…हजारो ला़खो लोके अजुन ही वाट पाहतायत आपल्या पुनरवसनाची तर ही कळकळ फक्त मुस्लीमांसाठीच का? का इथे पण आरक्षण?