Tag Archives: बाळ ठाकरे

फोटोज.. हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.

Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.

Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.

Copy Paste this Code in Orkut Scrap book or FaceBook Wall.

बाळ केशव ठाकरे

हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट

तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोंडात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.

बाळ ठाकरे

एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि गप्प बसावे कि आवाज उचलावा. तो माणुस सामान्य नव्हता त्याने शांत बसणे हा विचार कधीच केला नाहि आणि फ़ुंकली तुतारि मराठि अस्मितेसाठी कारण तो होता बाळ ठाकरे. बाळने आपला तोफ़खाना उघडला. बघता बघता मावळे जमु लागले, ताकद वाढु लागली. पण नक्कि करु काय हा प्रश्न होताच. इथेच वडिलांनी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..

“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काहि नाव सुचतय का संघटने साठी?”

बाळ उत्तरला..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…”

मि सांगतो नाव…..शिवसेना

१९ जुन १९६६..शिवाजी पार्क..हजारोंनि जमलेला मराठी माणुस. आणि स्थापन झाली शिवसेना. गर्दी आणि ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये. नव्वदिचा काळ, राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य “राम मंदिर”. शिवसेनेनेहि हिंदूत्वाचा अंगार हातात घेतलेला. शेवटि ते झालेच. बाबरी मस्जिद आडवी केली गेली. त्या नंतर उसळला तो एकच दंगा. मि मि म्हणणारे आणि स्वतःला हिंदूचे नेते म्हणवुन घेणार्यांचे हि परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळसोट जवाबदारी नाकारली. यात आम्हि नव्हतो. यात आमचा एकही माणुस नव्हता असतील तर ते असतील “शिवसैनिक“. त्या वेळि बाळासाहेबांना विचारले गेले..

“काय हे तुमचे शिवसैनिक होते?” या वेळि बाळासाहेब सहज म्हणुन गेले असते कि हे आमचे कोणच नव्हेत… पण छे.. शिवसैनिकांना एकटे टाकुन देणारा हा नेताच नव्हे. त्याने संपुर्णपणे शिवसैनिकांची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले..
हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.” (हे असे ’स्टेटमेंट्’ द्यायचे धाडस कोण्या नेत्यात असेल?)
हा हिन्दुत्वाचा अंगार भल्याभल्यांना पेलवला नाही अपवाद केवळ एकच.. बाळासाहेब ठाकरे.

मुंबईत दंगल उसळलि होती ९३ साली. त्या वेळि केवळ आणि केवळ शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली होती. सगळी बाळासाहेंची कडवट शिस्त, बुलंद हिन्दुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना. जे कोणताही नेता जाहिर पणे बोलणार नाहि तेच हा नेता अगदी सहज पणे बोलुन जातो. कारण एकच ’आहे खरे तर का बोलु नये?’ आणि विचार एकल्यावर कोणीही म्हणेल..अगदि माझ्या मनातले बोलला. काहि सरकारि कामे होत नाहित नुसत्या फ़ाईली गोळा होतात..काम कोण करणार? कामं का होत नाहित? या वेळि या नेत्याने सांगितले अरे या फ़ायली नुसत्या गोळा करुन काय ठेवताय मंत्रालयात. जर या फ़ायली मंत्रालयात नुसत्या पडुन राहणार असतील तर आग लावीन मंत्रालयाला. भुकंप झाला होता भुकंप या ’स्टेटमेंट’वर.

पाकिस्तानच्या आतंकवादि कारवाया खुपच वाढल्या होत्या. नुसती घुसखोरी होत होती. आणि या सरकारचे काय चालु होते तर पाकिस्तानच्या टिम ला क्रिकेट खेळायला बोलवायचे, बाळासाहेबांचा रोखठोक सवाल..अरे या देशाच्या एवढ्या आतंकवादि कारवाया वाढल्या असताना कसल्या क्रिकेट खेळण्याच्या बाता करता? हे होता कामा नये. आणि बाळासाहेबांनी एकदाच सांगीतले

मी मुंबईत पाकिस्तानच्या टिमला खेळुन देणार नाहि.”

त्या वेळे पासुन ते आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान टिमने मुंबईत पाऊल ठेवलेले नाहि, अरे धाडसच नाहि, कोण या अंगाराशी खेळणार?

या बाळासाहेबांनि अनेक पिढ्या पाहिल्या घडवल्या, शिवसैनिक घडवले. हे शिवसैनिक बाळासाहेबांसाठि जिव हि द्यायला तयार. केवळ बाळासाहेबांचा आदेश आहे म्हणुन आपल्या जिवाची फ़िकीर न करता अनेक शिवसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटि. जिवाला जिव देणारि लाखो माणसे.
“केवळ एक आदेश द्या साहेब जिवाचीही पर्वा करणार नाहि” हा शब्द आहे शिवसैनिकाचा.

बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो. एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवतो “शिवसेना”. आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो. एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-“शिवतिर्थ” खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.

मराठि अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठि माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.

जय महाराष्ट्र.

आशिष कुलकर्णी

 

शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी …

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे

शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी….

महाराष्ट्रातील काहि सेकुलर लोकानी शिवसेना प्रमुखाना अटकेची मागणी केली आहे. या लोकाचे असे म्हणणे आहे कि शिवसेना प्रमुखानी लोकाना (हिन्दु बर का) भडकवले आणि दन्गल घडवल्या…

आणि हे मागणी करणारे तर कोण..तर जे ए़खाद्या अल्पसन्ख्याक समाजाचे सार्खे चोचले पुरवतात त्याना सार्खे भडकवतात्..यान्चे म्हणणे आहे कि महाराष्ट्र पोलिस हि सेना प्रमुखाना पकडत नाहिये..महाराष्ट्र सरकार हि सेना प्रमुखाना पाठिशी घालत आहे.

अरे घालणारच ना पाठिशी..कशी हात लावेल सेना प्रमुखाना? अरे हिन्दु आले रस्त्यावर्ती का? तर इस्लाम खतरेमे म्हणत या लोकानी उतरवल ना त्यान्च्या काही लोकाना….सुटले होते कापत. त्या वेळी हिन्दु उतरला रस्त्या वरती स्वःतहला वाचण्यासाठी..या लोकानी पहिला हात उचलला काय? नाही तर त्याच्यावर ज्यानी हात उचलला त्यन्चा फक्त तोडला आणि तो हि स्व:रक्षणा करता..याला कसले भड्कवणे म्हणायचे..? अरे हे तर सेना प्रमुखाचे उपकार आहेत हिन्दुवरती.

ज्या वेळी सेना प्रमुखाना कोणी अट्क्-फट्क वगैरे नावा खाली कोणी त्रास देइल त्या वेळी….खरे सागतो आग लागेल महाराष्ट्राला….पुन्हा दन्गली होतील्..आणि या मध्ये भरडला जाइल साधारण गरिब माणुस. तुझ्या माझ्या सारखा.

म्हणुनच मि सागतो सेना प्रमुखाना कोणी हि हात लावु शकणार नाही. ज्या माणसाने आपले पुर्ण आयुष्य हिन्दुत्वासाठी अर्पण केले त्या माणसाचे आता आराम करायचे दिवस आहेत. त्यानी आपणाला प्रोटेक्ट केले आता हिन्दुच त्याना देतील प्रोटेक्शन्……त्या मुळे सेना प्रमुखा कडे कोणी हि वाकड्या नजरेने बघु नये हेच शहाणपण.

जय महाराष्ट्र …
आशिष कुलकर्णी