Category Archives: तंत्रज्ञान

हे “ट्विटर” म्हणजे काय हो? (Twitter)

हे “ट्विटर” म्हणजे काय हो?

What is twitter, Maharashtra Majha, Author: Ashish Kulkarni
What is twitter, Maharashtra Majha, Author: Ashish Kulkarni

ट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि.
जेंव्हा मी ट्विटर बद्दल माझ्या मिंत्रांना किंवा परिवारातील एखाद्या सदस्याला विचारतो हि उत्तरे मला अनेक वेळा मिळतात. आणि जेंव्हा मी विचारतो कि तु ट्विटर वापरतोस का, तर त्याचे ऊतर असते कि मि का वापरु?

ट्विटर म्हणजे ‘मायक्रो-ब्लॉगींग’:
मायक्रो-ब्लॉगींग म्हणजे अतिशय कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे आपल्या बद्दल अपडेट करणे. खरे म्हणजे हि तर फेसबुक ची खासियत पण याला खरे नावरूप मिळवुन दिले ते ट्विटरनेच. मला ब्लॉगींग कराय्चे आहे पण वेळ नाहिए, किंवा जास्त लिहु शकत नाहिए काळजी नको मायक्रो-ब्लॉगींग आहे ना. एक तास पुर्ण बसुन जे ब्लॉगवर एक लेख लिहु शकणार नाहित ते फक्त अपडेट देऊ शकतात जसे कि.. “आज लिहायचा कंटाळा आला आहे.. आज सुट्टी घेणार आहे” अथवा “ति मला खुपच आवडते मी काय करु?”

 

 

या मुळे इतर लोके आपल्या बद्दल अपडेटेड राहतातच तसेस कमीत कमी शब्दात आपण आपले म्हणने हि मांडु शकतो. जसे कि आपल्या शशी थरुर साहेबांनी आपले मत मांडलेना.. इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे म्हणजे “cattle class” ने प्रवास करणे.

ट्विटर म्हणजे ‘सोशल मेसेजींग’:
ट्विटर चा अपेक्षीत उपयोग म्हणजे मायक्रो-ब्लॉगींग पण तेवढ्यावर मर्यादीत न राहता आता ट्विटर म्हणजे एक सोशल मेसेजींग टुल झाले आहे. आपण ट्विटर वापरुन सर्वांपर्यंत एकच संदेश एकाच वेळी पोहचवु शकता. ‘फॉलोअर्स’ आणि ‘फॉलो’ यामुळे ट्विटर हे एक मित्रांचे जाळे म्हणुन सुद्धा वापरु शकता. बघा तुम्हि किती फॉलोअर्स मिळवु शकता ते.

ट्विटर म्हणजे बातमीदारः

कोणतीहि वॄत्तवाहिनी चालू करा. खाली तुम्हाला संक्षीप्त बातम्या एका ओळित फिरताना दिसतील. तश्या संक्षीप्त बातम्या म्हणजे ट्विटर. तुम्ही अत्ता काय करत आहात? या प्रश्नाचे उत्तर फक्त देण्या ऐवजी लोकं इथे आपल्या आजुबाजुच्या घडामोडि सुद्धा नोंदवतात, जसे कि या या जागेच्या इमारतीला आग लागली. इकडे भु़कंप जाणवला इत्यादी इत्यादी. ट्विटर वापरुन एकाच वेळि अनेक जणांना बातमी पोहचवता येते. मग आपल्या भागातल्या घडामोडी पोहचवणार ना आता जगाच्या कानाकोपर्यात?

ट्विटर म्हणजे मार्केटिंगः

मार्केटिंग जगतात ट्विटर खुपच आवडिचे माध्यम होऊ लागले आहे. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश पोहचण्याचा हा अगदी स्वस्त आणि नवीन पर्याय आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड्-बॉलीवुड जगतातील सितारे असोत कि थेट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत यांनी वेळोवेळी ट्विटरचा सहारा घेतला आहे.

ट्विटर हे वेगवेगळ्या लोकांसांठी वेगवेगळा अर्थ घेऊन वापरता येते. कुणासाठी हे कुटूंबाच्या संपर्कात राहण्याचे माध्यम आहे, व्यावसायीक लोकांसाठी हे व्यवसाय वाढवण्याचे तंत्र आहे तर लेखकांसाठी आपल्या वाचकांशी जोडणारा दुवा आहे.

मग आता तरी चालु करताय ना ट्विटर वापरणे?
Follow ME on Twitter.

आपलाच मित्र,
आशिष कुलकर्णी
Author: Ashish Kulkarni
What is twitter? learn Twitter

 

 

ब्लॉग माझा..स्टार माझा..महाराष्ट्र माझा

नमस्कार,

Maharashtra Majha
मझ्या मराठी प्रेमी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. ‘स्टार माझा’ या मराठी वॄत्त वाहिनीने ‘ब्लॉग माझा’ नामक एक मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा आयोजीत केलेली आहे. आज पर्यंत आपण BloggersChoice किंवा मायक्रोसॉफ्ट ब्लॉगस्टार या स्पर्धा पाहिल्या ऐकल्या पण मागच्या वर्षी पहिल्यांदाच स्टार माझा ने मराठी ब्लॉगर्स साठि स्पर्धा आयोजीत केली. आता या वर्षी पुन्हा हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. फक्त ब्लॉगींग करु नका तर आपला ब्लॉग सर्वांपर्यंत पोहचवा. आणि किंवा हा ब्लॉग हा सगळ्यात भारी असे मिरवण्याची संधीच आलिए म्हणाना.

काय करावे लागेल या स्पर्धेत सहभागी होण्याकरता? आपण आपल्या ब्लॉग ची लिंक blogmajha@starnews.co.in या ईमेल वर कळवा. सोबत आपले नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काहि अटी:

१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी unicode)
२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं
३. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २००९
अधिक माहिती

बक्षिसे-
१. निवडलेल्या सर्वोत्कृष्ट तीन ब्लॉगर्सना प्रत्येकी प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येईल.
२. दहा उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात येतील.
३. विजेत्या आणि उत्तेजनार्थ ब्लॉग्जची ओळख ‘स्टार माझा’च्या एपिसोडमध्ये करून देण्यात येईल. तसेच, या ब्लॉग्जची लिंक ww.starmajha.com या वेबसाईटवरही देण्यात येईल
४. सर्व विजेत्यांचा सत्कार ‘स्टार माझा’च्या विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

ब्लॉग माझा हि स्पर्धा प्रथम ३१ ऑगस्ट २००८ साली घोषीत करण्यात आली होती, या स्पर्धेची अधिक माहिती जाणुन घेण्यासाठि मी या स्पर्धेचे जनक प्रसन्न जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि मिळालेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी या स्पर्धेत एकुण ६० ब्लॉगर्स नी सहभाग नॉदवला होता. आणि यांच्या मधुन तीन स्पर्धक हे विजयी घोषित करण्यात आले होते. विजयी स्पर्धक निवडण्या करता कोणत्या गोष्टी पाहण्यात आल्या होत्या? तर ब्लॉग वरील उपल्ब्ध माहिती, मल्टिमेडिआ चा वापर, भाषेचा वापर, विषयाचे महत्त्व, लेख लिहिण्याची वारंवारता, तुमची ब्लॉगची आणि विषयाची मांडणी, आकर्षकता. हे सर्व मुद्दे गॄहित धरुन १० पैकी गुण देण्यात आले आणि तज्ञ लोकां मार्फत विजयी ब्लॉगर्स निवडण्यात आले.

मागच्या वर्षीच्या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावलेले ब्लॉगर्स-
१. निमिश साने, अमेरिका-(प्रथम क्रमांक)- www.asanemanthinks.blogspot.com
२. नंदन होडावरकर, कॅलिफोर्निया, अमेरिका-(द्वितीय)- http://marathisahitya.blogspot.com/
३. विश्वनाथ खांदारे, मुंबई- (तृतीय)- http://pandharpurinfo.blogspot.com/

Maharashtra Majhaउत्तेजनार्थ-
माधवी ठाकूरदेसाई, मुंबई- madhavithakurdesai.blogspot.com
पराग सहस्रबुद्धये- अटलांटा, अमेरिका- parag-blog.blogspot.com
पूनम छत्रे, पुणे- kathapournima.blogspot.com
दिलीप बिरूटे, औरंगाबाद- dilipbirute.wordpress.com/
सुमेधा क्षीरसागर, बेलमाँट, अमेरिका- aapula-samwad.blogspot.com/
अभिजीत पेंढारकर, पुणे- abhipendharkar.blogspot.com/
संदीप चित्रे, न्यू जर्सी, अमेरिका- atakmatak.blogspot.com
धोंडोपंत आपटे, मुंबई- dhondopant.blogspot.com
आशिष चांदोरकर, पुणे- ashishchandorkar.blogspot.com
प्रशांत रोटवदकर, नाशिक- swatantrasamar1857cha.blogspot.com/

ब्लॉग माझा या स्पर्धेला फक्त महाराष्ट्र / हिन्दुस्तान नव्हे तर जगाच्या निरनिराळ्या कोपर्यातुन मराठी ब्लॉगर्सनी प्रतिसाद दिला आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपला ब्लॉग या स्पर्धेसाठी पाठवा. अधिक माहिती साठी इथे क्लिक करा. मी ह

मुख्यमंत्र्यांचा खासगी ‘ई-मेल’!

अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक

चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे.

जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना मुख्यमंत्र्यांना थेट पाठविता याव्यात यासाठी अशोक चव्हाण यांनी नवा ई-मेल जाहीर केला आहे. ashokchavanmind@rediffmail.com असा पत्ता त्यांनी आज प्रसारमाध्यमांमार्फत महाराष्ट्रातील जनतेसाठी पाठवला. मुळात सरकारी साइटवर मुख्यमंत्र्यांचा chiefminister@maharashtra.gov.in हा अधिकृत ईमेल पत्ता असताना , चव्हाण यांनी ‘ रेडिफ ’ या खासगी कंपनीवर विश्वास दाखवला आहे.

महाराष्ट्र शासनाची http://maharashtra.gov.in/ ही स्वतःची अधिकृत वेबसाइट असून , त्यावर ‘ महा आयटी राष्ट्र ‘ असे कौतुक मिरवले आहे. पण आयटीचा एवढा उदोउदो करणा-या या साइटवर अविश्वास दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपला खासगी ई-मेल लोकांसाठी खुला केला आहे.
त्यांचे हे वागणे चुकीचे आहे , असेही म्हणायला नको. कारण महा-आयटी-राष्ट्राच्या या अधिकृत साइटने अजून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून मान्यताच दिलेली नाही. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे जगभरातून महाराष्ट्रातील सरकारकडे लक्ष असताना या ग्लोबल एडिशनला नवा मुख्यमंत्रीच माहित नाही. त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लिंकवर आजही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असून , बाकीचे मंत्रीही तसेच आहेत.

आर. आर. पाटील गृहखात्यातून पायउतार होऊन आठवडा उलटून गेला , तरी या महा-आयटी-राष्ट्राच्या साइटसाठी ते गृहमंत्रीच आहेत. त्यांच्या चीनच्या दौ-याचे फोटो झळकवीत त्यांच्याच डोक्यावर गृहमंत्रीपदाचा मुकुट ठेवण्यात , या साइटला धन्यता वाटते. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांचे चुकले की या सरकारी साइटचे हे या महा-आयटी-राष्ट्रालाच ठरवावे लागेल.

‘सुपरफास्ट’ कॉम्प्युटर

तुम्ही अजूनही पेंटिअम सिरिजचे कॉम्प्युटर वापरता का ? तर तुम्ही अजुनही मागच्या जगात वावरता आहात.. कारण पेंटिअम सिरिजनंतर आलेले ‘ कोअर टू ड्युओ ‘ देखिल आता जुना झाला… त्यांच्या जागी इंटेलने आपला सर्वात फास्ट असा ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर लॉंच केला. हा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर असल्याचा इंटेलचा दावा आहे.

आज देशात वापरल्या जाणा-या बहुतांशी कॉम्प्युटरमध्ये इंटेल प्रोसेसर वापरले जातात. तसेच कॉम्प्युटरचा वापरही आता प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेट सर्फिंग, विडिओ एडिटिंग, गेमिंग आणि रेग्युलर कॉम्पयुझिंगसाठी ‘ हाय स्पीड ‘ ही गरज बनली आहे. त्यासाठीच इंटेलने ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा नवा प्रोसेसर बाजारात आणालाय, असे इंटेलचे मार्केटिंग डायरेक्टर प्रकाश बगरी यांनी सांगितले.

कॉम्पयुझरच्या नव्या गरजा लक्षात घेऊन ‘ नेहलम प्रोसेसर ‘ या नव्या मालिकेअंतर्गत इंटेलने आणलेला ‘ कोअर आय सेव्हन ‘ हा पहिलाच प्रोसेसर आहे. ९६५, ९४० आणि ९२० या तीन सिरीजमध्ये आणलेले हे प्रोसेसर जे अनुक्रमे ३.२० गिगाहर्टझ, २.९३ गिगाहर्टझ आणि २.६६ गिगाहर्टझ या क्लॉकस्पीडमध्ये बाजारात उपलब्ध असतील. हे प्रोसेसर डीडीआर३-१०६६ मेमरीला सपोर्ट करतील. त्यामुळे हे प्रोसेसर भन्नाट स्पीडचा अनुभव देतील, असे इंटेलचे म्हणणे आहे.

‘ कोअर टू ड्युओ ‘ मध्ये नसलेले सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे टर्बो बुस्ट टेक्नोलॉजी. या तंत्रामुळे गेमिंग, सर्फिंग सारख्या हायस्पीड गरजा पूर्ण करणे सोपे होईल. तसेच या तंत्रामुळे वीजेचा अतिरिक्त वापर टळून कॉम्प्युटर चांगला वेग देऊ शकतो. तसेच सर्व्हर टेक्नॉलॉजीसाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरेल, असा इंटेलने स्पष्ट केले आहे .

संत ’गुगल’बाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान.

संत ’गुगल’बाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान.

नमस्कार..google-maharashtra-majha
ऑर्कुट हे नाव जो कोणी हि नेट वापरत असेल त्याला माहितच आहे. तुम्ही हि या ब्लॉग वर कदाचित ऑर्कुटवरुनच आला असाल. या ऑर्कुट मुळे अनेक म्हणजे हजारो लाखो मित्र एकमेकांना अनेक वर्षांनन्तर भेटली आहेत. आहेत या ऑर्कुट चे अनेक फ़ायदे आहेत. हे नाकारुन चालणार नाही. पण याच ऑर्कुट मुळे अनेकदा अनेक दंगे हि झाले आहेत.

आज आपण कॉलेज मध्ये एकत्र शिकत असतो..उद्या? प्रत्येकच्या वाटा वेगळ्या. प्रत्येकाला फ़ोन करणे होइलच असे नाही आणि ते परवडेल असे हि नाही. मग अश्या वेळी काय़? तर ऑर्कुट. अनेक मित्र भेटतात, अनेक मित्र बनतात. माझेच कितीतरी नवीन मित्र या ऑर्कुट मुळे झालेले आहेत. अनेक कम्युनीटीज आहेत इथे. ज्याची जशी आवड त्या प्रमाणे त्याने ती जॉईन करावी. पण जे चांगले त्याच्यातुन मी काहितरी वाईट करणारच…..हि अशी विकृत मनोवृत्तीची लोके हि या ऑर्कुटवरच आहेत.

एखाद्याच्या भावनेशी खेळने आणि तेहि आपली ओळख लपवुन हे काम इथे फ़ारच सोपे आहे. याच ऑर्कुटवर आपल्या देशाचा, आपल्या शिवरायाचा अपमान केला जातो. बाळासाहेब ठाकरें बद्दल काहि हि लिहले जाते. हि लोके आहेत तरी कोण हो? हि आहेत दळभद्रि लोके ज्याना एखादे चांगले बघवतच नाही. हि असतात विकृत मनोवृत्तीची लोकें. यांना पकडणे शक्य आहे? आहे पण फ़ारच अवघड आहे ते.

मग यांना ऑर्कुट नावाचे मैदान मोकळेच आहे का? कि या काय करायचे ते करा..या आमच्या देशाचा, आमच्या शिवरायाचा, आमच्या साहेबांचा अपमान करा. नाहि हे असे नाही, हे असे होऊ दिले जाणार नाहि. या लोकांना हुडकणे फ़ार अवघड आहे पण याना वठणीवर आणणे काही जास्त अवघड नाहि. आणि यांना वठणीवर आणायचेच. आपण सर्वांनी मिळुन आपण यांना वठणीवर आणायचेच.
ऑर्कुट चा एक नियम आहे. कि जर एखाद्या कम्यु्निटी अथवा युजर वर जर एक हजार युनिक युसर्सनी जर Abuse म्हणुन क्लिक केले तर ती कम्युनिटी अथवा युजर ऑर्कुट वरुन Delete करुन टाकला जातो. पण एक हजार युजर्स पर्यंत हि कम्यु्निटी ज्याला डिलीट करायचे आहे ति पोहचणार कशी, ज्यामुळे हि लोके या कम्युनिटिज वर जाऊन तिथे Abuse म्हणुन क्लिक करतील. या साठी म्हणुन केवळ एक ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे.

काय आहे हा ग्रुप? ऑर्कुट वरिल माजलेल्यांना वटणीवर आणण्या साठी Yahoo! चा वापर करायचा. आपण सर्वांना याहू ग्रुप्स बद्दल माहितच आहे. म्हणुन याहू ला निवडलयं. एका क्लिक वर एक मेल हजारो लाखो मेम्बर्स पर्यंत पोहचतो. या ग्रुप चे नाव आहे रुल-ऑर्कुट (Rule-Orkut). हा ग्रुप तुम्हि जॉइन करायचाच पण आपल्या तमाम मित्रमंडळीस हि जॉइन करण्यास सांगा. हा ग्रुप जेंव्हा तुम्हि जॉइन कराल तेंव्हा आपणास इ-मेल येतील. काय असते या इ-मेल्स मध्ये? कोणत्याही हिरो-हिरोइन्सचे फ़ोटो नसतात तर ज्या कम्युनिटीज ना ऑर्कुट वरुन डिलीट करायचे आहे त्या कम्युनिटीज ची लिंक असते. तुम्हाला फ़क्त त्या कम्युनिटीवर जाऊन Abuse वरती क्लिक करायचे आहे. या ग्रुप मध्ये जेंव्हा १०००+ मेम्बर्स होतील तेंव्हा एखादी क्म्युनिटी जी आपल्या देशाचा, शिवरायाचा आणि बाळासाहेबांचा अपमान करतीये तीला डिलीट करणे हे केवळ काही मिनिटांचे काम असेल.
म्हणुनच माझे असे म्हणणे आहे कि तुम्हि हा ग्रुप जॉइन कराच आणि या ग्रुप चा हेतु सफ़ल करा. हा ग्रुप जॉइन करण्या साठी खालिल लिंक वर क्लिक करा…
http://groups.yahoo.com/groups/ruleorkut

आता ऑर्कुटवर आलतु फ़ालतु कम्युनिटीच शिल्लक ठेवायच्याच नाहित. बघु मग कुणाच्यात एवढी ताकत आहे आपल्या एकजुटी पुढे उभे राहण्याची. आता लिहाच काहि अशे आणि तशे आमच्या हिंन्दुस्ताना बद्दल, आमच्या शिवराया बद्दल आणि आमच्या साहेबांबद्दल, आपल्या अस्मितेशी खेळणारी एक हि कम्युनिटि या ऑर्कुटवर शिल्लक राहता कामा नये. आपणालाच ऑर्कुट स्वच्छ केले पाहिजे.

या अभियानाला म्हणुनच नाव दिले आहे: संत गुगलबाबा ऑर्कुट स्वच्छ्ता अभियान.
Therefore to strengthen the strength Join this group now:http://groups.yahoo.com/groups/ruleorkut

!! जय हिंन्द !!
!! जय महाराष्ट्र !!