डियर माँमा,
गुजरातमधल्या करेली नावाच्या एका लाऊजी व्हिलेजमधुन मी तुला लिहित आहे. (हँन्डरिटन…फ्यू…!) माँमा, माँमा! व्हाय व्हाय यु डिड धिस टु मी? व्हाँटा हाँरिबल एक्सपिरियन्स! माझ्या पायाला चालुन चालुन फोड आले आहेत! खूप शँबी पाँडस मधुन चालत जावं लागलं. मही नावाची आख्खी रिव्हर क्राँस करावी लागली. रिव्हरला फार वॉटर नव्हते पण होते ते खुप फिल्दी होते. माँम! मी म्हटलं, नथिंग डुईंग, आधी टँकरभर डेटाँल ओता रिव्हरमध्ये, मगच मी पाऊल टाकीन! मग एक काँग्रेस कार्यकर्ता बाटलीभर डेटाँल घेऊन आला. (बाटली वाईनची होती, माँम! गुजरातमध्ये लिकर बँन आहे ना, माँम?) तो चार थेंब डेटाँल टाकायचा; मग मी पाऊल टाकायचो! शेवटी कंटाळून मी होडीतच बसलो! काय ती होडी!! जस्ट वुडन स्क्रँप, नो फोम!
सलग दीड किलोमीटर चाललो. मला डिहायड्रेशन होईल अशी भीती शीलाआँटीला वाटत होती. माझ्या पाठीमागे बिस्लेरीचे तीन टेम्पो, कोकचे चार कँरियर्स, कँडबरी चाँकलेटस भरलेला मिनीट्रक वगैरे अनेक खाद्यपदार्थ भरलेला होते. सुसज्ज अँब्युलन्ससुद्धा होत्या. मी म्हटलं, व्हाट रबिश! मला काय कुकुलं बाळ समजता काय! डँम इट! आय कँन वाँक होल आँफ डँन्डी वाँक! आफ्टर आँल माय सरनेम इज गँधी!! अँम आय राइट माँमा?
व्हिलेजम्ध्ये गेल्यावर कोणीतरी मला आग्रह केला की, पुअर व्हिलेजर्स खुप इग्नरंट आहेत. त्यांना डँन्डीयात्रेबद्दल काही सांगा! सो, आय गेव वन नाईस स्पीच. गँधीसम, ट्रुथ अँन्ड नाँन-व्हायलन्स, वगैरे बरंच बोललो. डँन्डीयात्रेचा इम्पार्टन्स त्यांना एक्स्प्लेन केला. माँम! दे लाइक्ड माय स्पीच! त्यांनी खुपदा टाळ्या वाजवल्या!!एक व्हिलेजर माझ्याकडे येऊन म्हणाला की, ग्रेट! यु नो सो मच अबाऊट गांधीजी! असं स्पीच आम्ही गेल्या पंचावन्न वर्षात ऐकलं नाही!! या कार्यक्रमानंतर मी पार टायर्ड झालो! माँम! काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे माझे पाय चेपण्यासाठी धडपडत होते. शेवटी एका स्वच्छ माणसाला मी अलाऊ केलं.
माँम, इतकं चालायचं आणि साँल्ट उचलुन परत आपल्या घरी जायचं, हा इव्हेंट मला साँलिड अँब्सर्ड वाटतो! उन्हातुन एवढं चालायचं आणि साँल्ट उचलायचं? बास??? नो बँश, नो म्युझिक, नो ग्राइन्ड!! इतकं छान बीच असताना साँल्टशी खेळत बसणं मला फार मिडीआँकर वाटतं! जाऊ दे!
माँम, तुझा आतला आवाज आम्हाला महागात पडतो तो असा! दार्जिलिंग किंवा डेहराडुनला वगैरे पाठवलं असतंस तर काय बिघडलं असतं? मी काय सुनिल दत्त किंवा पृथ्वीराज चव्हाणांसारखा एमपी आहे का? माँम, खुप भूक लागली आहे. तुझ्या हातचा पास्ता खावासा वाटतो आहे. हेलिकँप्टर आलं की निघेनच.
सी यु सून,
वि.सू. दांडीयात्रेच्या मार्गावरील कनकपुरा या गावी आम्हास हे निनावी पत्र सापदले. सही नसली तरी ते खासदार राहुल गांधी यांनी म्याडमना पाठवण्यसाठी लिहिले असावे, असे वाटते! आपल्या माहितीसाठी.
– ब्रिटीश नंदी