in

कोणासारखे काय करावं . . ?

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व ‘ग्रेसफुल’ असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
( सौजन्य- शिरीष कणेकर यांचा ‘सामना’ मधील लेख)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जेम्स लेन आणि आपण.

सोशल मिडिया: नोकरि कशी शोधायची?