in

माणुसकी

कवियत्री सौ. अनिता नरेंद्र गुजर

माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला ||
माणसानं दगडाचा देव कसा घडविला पण माणुसकी धर्म पायदळी तुडविला ||

 

माणसानं दगडाचा
देव कसा घडविला
पण माणुसकी धर्म
पायदळी तुडविला ||

धंदा देवाच्या नावानं
माणसाने ईथे केला
गरीबांचा हा भूखंड
देवळाला दान दिला ||

उंच सोन्याचा कळस
मनोभावे चढविला
गुलालाची उधळण
आभाळात उडविला ||

ज्याने घडवला देव
तोच झालारे दानव
आज आले कळोनिया
कसा असतो मानव ||

ढोल नगारा देवाचा
आज याने बडविला
पण माणुसकी धर्म
पायदळी तुडविला ||

सौ.अनिता नरेंद्र गुजर
डोंबिवली

3 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्मृती मंधाना

स्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे

महा शिवरात्री, मराठी, कविता

शंभू महादेव