तडफड झाली होती तेव्हा
साखर वेचून जळले कोण
स्वर्गातून पडल्यावर कळले
चूक कोणती, चळले कोण
वीज घेवूनी कुठे चालली
अंधाराची तान्ही पोर
जागोजागी टपल्या वाटा
घेऊनिया हाताशी चोर
वादळ सरता क्षितीजालाही
चैतन्याचा आला कोंब
ठरले नव्हते आनंदाचे
परिस्थितीची झाली बोंब
उलट्या पूलट्या संसाराला
शिवण घातली चंदेरी
गूढ राहू दे तुझे वागणे
अबोध असू दे कुणीतरी
” ‘मी का तू?’ पेक्षाही अवघड ”
अस्तित्वाचा अंगारा
मी मालक फुटक्या कवड्यांचा
तो स्वप्नांचा गुंगारा
— नचिकेत जोग
3 Comments
Leave a Reply