in

लव्ह लेटर.. असेहि

I Love You Dear... But
I Love You Dear... But

क्रिकेट वर्ल्डकप चालु आहे, आपण सर्वजण क्रिकेटच्या मैचेस पाहण्यात मग्न आहोत, मैच पाहणे त्यावर चर्चा करणे यातच सगळा वेळ जात असेल ना तुमचा पण? अश्याच परिस्थीत अडकलेल्या एका बॉयफ्रेंन्ड ने आपल्या गर्लफ्रेंन्ड ला सरळ पत्र लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नव्हे सरळ सरळ आपल्या गर्लफ्रेंन्ड साठी नोटिसच काढली आहे. चला वाचुया काय म्हणतोय हा बॉयफ्रेंन्ड आपल्या गर्लफ्रेंन्डला..

प्रती माझी प्रिये:
१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.

२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा …नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.

३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.

४) भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.

५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. ‘आज कोणाची मॅचे..?’ असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.

६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.

७) मी मॅच पाहत असताना फोन करुन ‘रोमॅण्टिक’ गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.

८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ‘ ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?’ असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच ‘स्मार्ट’नेस दाखवायचा नाही.

९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे ‘तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?’ असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.

१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि ( थोडावेळच) बोलणे बंधनकारक आहे.

लव्ह यु, तुझाच…

I Love You Dear... But
I Love You Dear... But

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आई फ़क्त तुझ्यासाठी.

आई फ़क्त तुझ्यासाठी…

भारतीय काँग्रेस स्वत:साठी भ्रष्टाचारी खड्डा तर खणीत नाही ना ?