रोजचाच ‘आज’ होई
‘उद्या’साठी ‘ काल’ रे
अहम् बेड्या, तोड वेड्या…
स्वतःला सांभाळ रे
‘उद्या’साठी ‘ काल’ रे
अहम् बेड्या, तोड वेड्या…
स्वतःला सांभाळ रे
सोबती आहे जरी,
सौख्य, सत्ता, संपदा…
चिरंतन नक्कीच नाही,
येऊ शकते आपदा
श्वापदांच्या वर्तनाने
माणूसकीचे हाल रे
अहम् बेड्या, तोड वेड्या…
स्वतःला सांभाळ रे
शौर्य आहे,ज्ञान आहे,
तू रुपाचाही धनी
जीर्णतेच्या क्रूर शापातून,
का उरला कुणी ?
फासा उलटा, बदलून जातो
प्राक्तनाची चाल रे
अहम् बेड्या, तोड वेड्या…
स्वतःला सांभाळ रे
जन्मला भगवंत ही
पुनःपुन्हा रे, या ईथे
हव्व्यास नश्वर जीवनाचा
अद्याप कोण ना सुटे
‘ प्रेषीत ‘ तरी… ही, म्हणवून घ्यावे
म्हणजे निव्वळ खूळ रे
अहम् बेड्या, तोड वेड्या…
स्वतःला सांभाळ रे
मंदार चोळकर