in

सु.शिं.च्या अर्पणपत्रिका… Suhas Shirvalkar

आपण वाचनालयातुन पुस्तके आणतो आणि ती वाचायला चालु करतो ते थेट पॄष्ट क्रमांक एक पासुन. पण मी सुहास शिरवळकर यांचे पुस्तक जेंव्हा हातात घेतो तेंव्हा सुरवात करतो ती अर्पण-पत्रिकेपासुन. म्हणजे ते आपल्या इंग्रजी पुस्तकात नसते का… Dedicated to so and so.. अगदी तसेच. या अर्पण पत्रिकांचे वैशिष्ठ म्हणजे या अजिबात मोठ्या आणि लांबलचक नसतात, अगदी मोजक्या ओळित, कमी शब्दात खुप काहि बोलुन जाणार्या. अश्याच काहि अर्पण पत्रिका आपल्या साठी येथे सादर करत आहे.
सुरवातीला पुस्तकाचे नाव दिले आहे आणि नंतर अर्पण पत्रिका.

सु.शिं.च्या अर्पणपत्रिका…

दुनियादारी-१
दिग्या
श्रेयस
उम्या
नितीन
अश्क्या
साईनाथ
प्रीतम
शिरीन
मिनू
डॅडी
रानी माँ
आणि
एम्‌.के.
’दुनियादारी’तली ही पात्रं
ज्यांच्यामुळे निर्माण झाली,
त्या ’कट्टा गँग’ला-

-सुहास शिरवळकर

दुनियादारी -२

’दुनियादारी’ची ही द्वितीयावृत्ती
त्या वाचकांना-
ज्यांनी अक्षरश: कादंबरीची
वीस-वीस पारायणं करुन,
माझ्यावर पत्रांचा वर्षाव करुन,
तिला दुसर्‍या आवृत्तीचं भाग्य
मिळवून दिलं!

-सुहास शिरवळकर

दुनियादारी – ३ री आवृत्ती

त्या सर्व वाचकांना,
ज्यांनी ‘दुनियादारी’
विकत घेतली;
वाचनालयातून वाचली;
मित्राची ढापली;
वाचनालयाची पळवली…
पण ‘दुनियादारी’वर मनापासून प्रेमच केलं!
त्यांनाही,
ज्यांनी ‘दुनियादारी’च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!
आणि….
खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील
तमाम ‘कट्टा-गँग्ज’ना,
ज्या ‘दुनियादारी’ जगल्या….जगतात….जगतील!

-सुहास शिरवळकर

कोवळीक २ री आवृत्ती

चार वर्षांच्या अल्पावधीत
ज्यांनी माझ्यावर
सहस्त्र करांनी
अनुभवांचं विश्व उधळलं-
त्या,
बी.एम्‌.सी.सी. मधल्या
समृद्ध क्षणांना!
– रोल नं, वन-फोर-सेव्हन,
टी.वाय्‌. ‘बी’

-सुहास शिरवळकर

प्रतिकार ३री आवृत्ती
मुझे इन्तजार है-
बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत…
चर्चा होणार नाहीत…
अशा दुर्देवी तरुणीकडे वाईट,
संशयी नजरेनं पाहिलं जाणार नाही…
स्त्रीच्या असाहायतेचा
गैरफायदा घेतला जाणार नाही…
शरमेनं समाज मान खाली घालेल…
आणि,
एक तरी तरुण स्वीकारासाठी
हात पुढे करेल…
कलम नंबर शंभरचा खरा अर्थ
मना-मनातून रुजेल;
त्याचे उद्‌घोष होतील…
-वो सुबह कभी तो आएगी!

-सुहास शिरवळकर

समथिंग
ही कादंबरी मी
तुला अर्पण केलीय
हे लक्षात येतंय,
का आपलं….नाहीच?

आँब्जेक्शन युवर आँनर
सुप्रसिद्ध आंग्ल लेखक
श्री अर्ल स्टँनले गार्डनर
ह्यांना-
ज्यांच्या मानसपुत्रामुळे
अमर विश्वास
हे पात्र निर्माण झालं

– सुहास शिरवळकर

शेडस्‌
कोणत्याही चांगल्या विनोदाला
खदखदून दाद देणाया
आणि रहस्यकथांकडे
गांभीर्याने पाहाणाया
कोणाही रसिक वाचकास-

-सु.शि.

काळंबेरं

माथेरानमधील तीन पावसाळी
दिवस-रात्रींना…..

– सुहास शिरवळकर

मधुचंद्र

‘विश्वामित्र पाहत असताना
‘मेनके’च्या ज्या प्रथम दर्शनाने
मला ही कल्पना सुचली,
त्या दर्शनाला-
अर्थात,
‘भानुप्रिया’ला ही, नि
त्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच
‘विश्वामित्र’ करणाया
सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही!

-सुहास शिरवळकर

हमखास

श्री. शशिकांत अ. ठाकूर सर…
मुख्याध्यापक म्हणून ‘हिरालाल सराफ’ प्रशालेतून
निवृत्त होण्यापूर्वी,
ज्यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळणं,
शिक्षण-खात्याला भूषणावह ठरलं असतं;
आणि, तो न मिळताही,
ते ‘आदर्श शिक्षक’च राहिले!
त्यांच्या कळकळीला…सेवाव्रताला…
आदर

6 Comments

Leave a Reply
  1. शिरवाळकरांची पुस्तकं मी पण वाचलेली आहेत. चिंतामणी लागु आणि सुहास शिरवळकर हे म्हणजे दैवत होते, गुरुनाथ नाइकांच्या आणि बाबुराव अर्नाळकरांच्या नंतरच्या काळात. जुने दिवस आठवले. 🙂

  2. हो, सुहास शिरवळकर यांच्या नंतर मिही ज्यांच्या कादंबर्या वाचायला लागलो त होते बाबा कदम

  3. aashish,
    tula manaapaasun dhanyavad.
    khuup khuup chhaan vatla …. atta mazya ghari hi sarva ani ajun panchvis-ek sushinchi pustake astil pan hi idea bhannat aahe.
    punha ekda thanx.

  4. ashish ji good job ase collection have ch hote karan su.si. chya sahityala kelela manapasuncha salam hyahun vegala nakkich nasel.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे “ट्विटर” म्हणजे काय हो? (Twitter)

शिवसेना प्रचार साहित्य ShivSena Scraps