in

महाराष्ट्राचा “कंदिलराव”

मी राहतो सध्या पुण्यात, पुणे म्हणजे काय एकदम भारी. पुण्यात काय कमी आहे ते सांगा. पुण्यात आल्यावर मीटर मध्ये गोची करुन फ़सवणारे रिक्षावाले आहेत. ’चकचकित’ रस्ते आहेत, काय तो अपवाद असेल तो असेल, दर शंभर मीटरला पाच-दहा खड्डे म्हणजे काय विशेष? भरगच्च भरुन खळखळत वाहणारि पीएमटी आहे (आता याला पीएमपीएल म्हणतात). चालायला काहि रस्त्यांवरती तर चक्क फ़ुटपाथ आहेत. दर दोन मिनीटांनी एक मिनिट थांबवुन ठेवणारे सिग्नल्स आहेत. अगदि श्वासाश्वासात पुणे वसावे म्हणुन रस्त्यांवरती धुळिचे साम्राज्य आहे. सकाळि जाउन संध्याकाळि घरी आले कि कसे अगदि छाती मध्ये अर्धा-एक किलो ’पुणे’ असतेच. सगळे कसे अगदि सुरळित चालु आहे. एकदम फ़ॉरेन मध्ये राहिल्या सारखे वाटतेय.
पण अचानक हे काय घडले? पुण्यात भारनियमनाच्या बाता? दिड तास पुण्यात वीज जाणार म्हणे. हे ऐकल्यावर आपण एकदम महाराष्ट्रात राहतोय कि काय असेच वाटायला लागलयं. काय ती पुण्याची शान आणि तिथे आता भारनियमन लागु करणार?
खरं सांगु मनात कुठेतरी बरेचं वाटले कि आता पुण्यात हि भारनियमन होणार. महाराष्ट्रातली खेडी १६-१८ तास भारनियमाने ग्रस्त असताना पुण्यात जाहिरीतांच्या होर्डिंग्जवर होणारी दिव्यांची उंदंड उधळपट्टी बघुन उगीचच वाईट वाटायचे. एकिकडे विहिरीत पाणि असुन ते वीज नसल्यामुळे पिकांना पाणि न पाजु शकणारा, कोरड्या शेतीकडे हताशपणे पाहत बसणारा माझा शेतकरी तर इकडे.. आमच्यात सेल आहे आमच्या कडे या म्हणुन घसा कोरडे करणारे जाहिरातीचे जंबो फ़लक. हा विरोधाभास कुठे तरी थांबवलाच पाहिजे होता.
पुण्यात अनेक उद्योग आहेत, त्यावर अनेक पोटे भरतात म्हणुन इथे भारनियमन नाहि. खेड्यात राहणार्यांना मग काय पोटच नाहि काय? अरे दुकान उघडु कधि हा इथल्या दुकानदांरांना पडणारा प्रश्न. आता तर उन्हाळा येतोय. लहान लेकरांचं रडुन रडुन आता हाल बेहाल होतील, कारण डोक्यावर पंखा आहे पण तो चालु करायला वीजचं नाहि.
काय तो माझा एकवेळचा महाराष्ट्र आणि काय त्याचे आज हाल करुन ठेवले. अरे रोज १०-१२ तास लोके बिना वीज ठेवता तुम्हि? संध्याकाळि सर्वत्र अंधारचे साम्राज्य. संध्याकाळि कुठे बाहेर फ़िरायला जाणे झालयं मुश्किल. गेल्या आठ वर्षे महाराष्ट्राचा कारभार करता तुम्ही आणि आज महाराष्ट्राची हालत काय तर सगळा महाराष्ट्र अंधारात. अरे लाजा कश्या वाटत नाहि असला कारभार करुन वर उजळ माथ्याने फ़िरताना. लोंकाच्या मनात हि आता एवढा राग आहे कि एकदा आमच्या महाराष्ट्राचे हे ’कंदिल मंत्र’ लोकाना भेटायला म्हणुन आपल्या ताफ़्या सह गेले होते. तिथल्या लोकांनी एकदम ऐतिहासक स्वागत केले यांचे. सडके टॉमेटो, अंडि, दगडं आणि चपला हाणल्या डोक्यात. या ’कंदिलरावांच्या’ गाडिवर दगडफ़ेक. कंदिलराव एवढे घाबरले कि आपला ताफ़ा वगैरे सगळे सोडुन पोलिसांच्या जिप मधुन तिथुन पळ काढला. तर अशी हि आमच्या आदरणीय मंत्र्याची अवस्था. लोकांना तोंड पण दाखवायची आता यांची उरली नाहि.
जमत नाहि आपल्याला एखाद्या खात्याचा कारभार तर सरळ लोकहिता साठि सोडुनद्यावाना कारभार. बसवावे या जागेवर एखाद्या लायक माणसाला का एकदा चिकटले कि सोडायचेच नाहि. किमान अंडि-टोम्याटोंचा आहेर तरी मिळाला नसता. फ़ेविकॉलने या मंत्र्यांना आपला ब्रॅंड अंब्यासिडर म्हणुन घ्यावे. यांचा खप दुपटिने काय तिपटिने वाढेल. कारण हि वांगी एकदा खुर्चिला चिकटली कि हा जोड तोडणे ’मुश्किल हि नहि नामुमकिन है’ हे सगळे जग पाहतच आहे.
आज महाराष्ट्राची अवस्था बिकट आहे. आपल्या राज्याचा विकास अगदि बैलगाडिच्या वेगाने होत आहे. केवळ मुंबई-पुणे-नाशिक हा पट्टाच म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र खुप मोठा आहे. विकास महाराष्ट्राच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचला पाहिजे. विकासासाठि काहि गोष्टि अश्या आहेत कि त

6 Comments

Leave a Reply
  1. खरच महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राच्या कोपर्या कोपर्या पर्यंत पोहचला पाहिजे.

  2. खरोखरीच हा असा लेख लिहिने फार आवश्यक होते. पुण्याच्या नेते लोकानी भ्रष्टाचाराचा भस्मासुर एवढा मोठा केला आहे की आम्ही पुण्याचे आहोत हे सांगायला लाज वाटते. पुण्यातील रस्ते आणि पाणी हा अत्यन्त ज्वलंत प्रश्न आहे आणि नेते लोकाना त्याची कसलीच चाड नाही. बेशरमपनाचा जिवंत नमूना आपल्या पुण्याशिवाय कोठेच बघायला मिलनार नाही. लोकंच्याकडून एवढा दाम्दुप्पट कर वसूल करून सुद्धा त्यांना काहीही सुविधा न देण्याची प्रवृत्ति आपल्या नेत्यांशिवाय कोठेही सापडनार नाही. हे पुण्याच्या मतदारानो आतातरी जागे व्हा. ह्यांच्या कोणत्याही भूलथापाना बली पडू नका. नेते लोकाना पैसे कमावायाचे आहेत. त्यांचे प्रयत्न हानून पाडा.sunil Yadav

  3. लय भारी लिहीता तुम्ही राव. पुन्याले तुम्हि लयच आब्जर्व केला वाटते. अरं पुन्यात काय काय हाय ते तुमचा आर्टिकल का काय मन्तेत ते वाचुन कळला. लयच झ्याक.दिनेश.http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बाळ केशव ठाकरे

झंझावताची ४२ वर्षे..