in

अरे काहि तरि लिहि कि.. .

अरे काहि तरि लिहि कि.. .
माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो,बरेच दिवस झाले काहि लिहिलेच नाहि. लिहायला विषय तसे बरेच होते. ति मनसेची आंदोलने होती. उद्धव ठाकरेंचे शेतकर्यांसाठिचे दौरे आणि होणारि गर्दि, पवारांचे टोले, हरभजन वरचे माकडि आरोप, असुल-वसुल मंत्र्यांच्या माकड उड्या, हे आणि ते. पण आशिष तु काहिच का लिहित नाहिस? हा प्रश्न मला माझ्या मित्रांनी अगदि फ़ोन करुन विचारला (पैसे खर्च करुन). हो खरे आहे. लिहायला बरेच आहे, बरेच काहि घडतयं, बरच काहि घडणार आहे, सुचत हि आहे पण प्रश्न आहे वेळेचा.
आमचे कॉल्रेज आम्हाला चांगलच पळवतयं. सकाळि सात ते रात्रि सात. एवढा वेळ पळापळ करायची मग उरलेल्या वेळात काहि तरी वहिवर काळे करत बसायचे. त्या असाइन्मेंट्सनी तर झिटच आणलिये. नुसतं पेन घासत बसलोय. बर ब्लॉगवर लिहायचे म्हणजे मराठित टंकलेखन..जरा जास्त वेळ लागतोच. बर पण आता मात्र ठरवलय़ काहिना काहि तरि लिहायचेच. येत्या २९ मार्च ला परिक्षा आहे, त्याचा हि अभ्यास आहेच.
बरं एवढ्या वेळ मि ब्लॉग साठि काय केले हे तर जाणुन घ्या. नविन केलय बरेच काहि.. एक गोष्ट नविन ब्लॉगवर म्हणजे वरच्याबाजुला ’महाराष्ट्र फ़ॅक्ट्स’ म्हणुन एक बॉक्स दिसेल. या मध्ये महराष्ट्राबद्दल काहि गोष्टिं सांगितल्या जातिल/दिसतील. या फ़ॅक्ट्स दर वेळि वेगळ्या दिसतिल कारण या साठी काहि जावास्क्रिप्टींगचा वापर केला आहे मी. याहि वाचत चला.
ब्लॉग चा चेहरा बदललाय. काहितरि आपलं तेचतेच टिपीकल ब्लॉग बघणार्यांना नविन काहि तरि द्यावे म्हटले. म्हणुन स्वत:चा ब्लॉग स्वत:च तयार केला, डिसाईन केला. त्याचा ’अपिअरन्सच’ बदलुन टाकला. हा ब्लॉग दिसतो कसा हे मला तुम्हि नक्कि कळवा.
कळवायचे कसे हा एक बर्याच जणांपुढचा यक्ष प्रश्न. कमेंट तर द्यायची आहे पण कशी देऊ तेच कळत नाहि अश्यांसाठि खास SMS Service चालु केलिये. होय आता तुम्हि तुमच्या कंमेंट्स मला आता SMS नेही पाठवु शकता, आणि तेहि अगदि साध्या SMS च्या दरात. फ़क्त माझ्या ब्लॉगच्या मोबाईल नंबरवर मला SMS पाठवायचा आणि मला कळवायचं लेख/कविता कशी वाटली ते. तुमच्या कमेंट्स वाचुन मलाहि बरे वाटते तुमची मते कळतात आणखि दोन गोष्टी सुचतात. तर कंमेंट्स न विसरता देत जावा, एक तर ब्लॉगवर किंवा SMS मार्फ़त. SMS ने आलेल्या कमेंट्स बाकिच्या तमाम वाचकांशी ’शेअर’ केल्या जातील, केवळ तुमच्या नावाचा उल्लेख होइल. मोबाईल नंबर कुठेहि शेअर केला जाणार नाहि.कमेंट्स SMS ने देताना आपले नाव व ठिकाण न विसरता पाठवत चला.SMS साठि नंबर आहे: ९४ २३ २६ ८५७४ “नाव, ठिकाण, कमेंट” जरुर पाठवा.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे “टेल अ फ़्रेन्ड” आता ’महाराष्ट्र माझा’ ब्लॉग बद्दल तुम्हि तुमच्या मित्रांना केवळ एका क्लिक वर कळवु शकता. फ़क्त यासाठि ब्लॉगवरती ठेवलेल्या लिंक वरती क्लिक करा. नंतर येणार्या वेब-पेज वरती तुम्ही तुमचे नाव आणि ई-मेल पत्ता, आणि मित्राचा ई-मेल लिहा व क्लिक करा. ’महाराष्ट्र माझा’ ची लिंक मित्राला पाठवलि जाईल. एका वेळि तिन मित्रांना तुम्हि ई-मेल करु शकता. जरुन आपल्या मित्रांना कळवा या ब्लॉग बद्दल.
तर हे असे चाललय सगळे. म्हणुन काहि लिहिता आले नाहि या एक महिन्यात. पण आता जसे सांगितलं काहिना काहि तरी लिहायचा प्रयत्न करत राहिनच. केवळ तुमचा अशिर्वाद राहुदे नाहितर आम्हि लिहायचे आणि वाचायला कोणीच नाहि अशी काय तरी अवस्था व्हायची. जरुर ब्लॉग ला भेट देत रहा, प्रेम असचं अखंड राहुद्या.
आपलाच मित्र आशिष.
‘Do You Know This?’, ब्लॉगचा चेहरा, SMS Service, आणि टेल अ फ़्रेन्ड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजे पुन्हा जन्मास या..

बाळ केशव ठाकरे