माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात […] More