in

राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा

राज ठाकरे
राज ठाकरे

ठाण्याच्या जनतेने शिवसेना-भाजप युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे ठाण्यात विकासाच्या मुद्द्यावर मी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट करून एका वेगळ्या समीकरणाची सुरूवात केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या इच्छेमुळेही मी युतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात गेल्या काही दिवसापासून अपहरण नाट्य आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्यात. सत्तेच्या समीकरणाचा विचार करता युतीच्या महापौरासाठी ६६ जणांनी पाठिंबा देणे गरजेचे होते. त्यामुळे मनसे काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज ठाण्याच सरकारी रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी धक्का दिला. राज यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर होणार हे स्पष्ट झालं आहे.

नाशिकमधील जनादेश माझ्या बाजूने तसाच ठाण्यातील जनादेश हा युतीच्या बाजून आहे. त्यामुळे ठाण्यातील जनतेला वेठीस धरलं जाऊ नये, यासाठी मी युतीला पाठिंबा देत आहे. कल्याण डोंबिवलीच्या वेळीही मला काही पक्षांकडून अपक्षाला महापौर बनविण्याचा प्रस्ताव आला होता. पण, अशा तडजोडी मी कदापि करणार नाही. मी हा पाठिंबा देत आहे, परंतु, त्या मोबदल्यात मला विकास हवा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून कोणाच्या हाताला ‘लोखंड’ लागतंय, कोणाच्या हाताला लाकूड लागतंय, अशी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत अपहरण नाट्यावर टीप्पणी केली. अपहरण कशाचे हो.. पैशाचा खेळ आहे. ते काय लहान मुले आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांना ठाणेकरांचा विकास करायचा आहे, त्यांची तशी इच्छा होती, त्यामुळे मी हा निर्णय घेण्यात असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. परंतु, ही २०१४ ची नांदी नाही, या भूमिकेवरून असे मथळे करू नये, असे पत्रकारांना सांगितले.

ठाण्यात मी पाठिंबा देत आहे, म्हणून सेनेने नाशिकमध्ये पाठिंबा द्यावा, अशी मी अट टाकली नाही. नाशिकच्या बाबतीत युतीने सद्सद्विवेक बुद्धीने विचार करावा, विनाकारण फालतू तडजोडी मी करणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील काह ठळक मुद्दे
– ठाण्याचा निर्णय मी मान्य केला आहे
– या निवडणूकांनी मला काही गोष्टी शिकवल्या
– एप्रिल महिन्यात ठाणे आणि मुंबईत पक्षात साफसफाई करणार
– ठाण्यात पक्षात काही नासके आंबे
– कल्याण डोंबिवलीला अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याचा माझ्याकडे प्रस्ताव होता
– अपक्षाला महापौर करण्याचा प्रस्ताव मी कधी मान्य करणार नाही
– ठाण्यावर नाशिकचा निर्णय अवलंबून या आहे बातम्या
– नाशिकमध्ये जनादेश माझ्या बाजूने
– भाजप आणि छगन भुजबळ यांच्या ठाण्यात बैठका सुरू आहे
– शिवसेना-भाजपला ठाण्यात पाठिंबा- राज, नवीन युतीचे समीकरण
– ठाण्याचा जनादेश शिवसेना- भाजपच्या बाजूने
– कोणाच्या हाताला ‘लोखंड’ लागतंय, कोणाच्या हाताला लाकूड लागतो आहे.
– २०१४ची आखणी सुरू असल्याचे मथळे करू नये
– राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा
– बाळासाहेबांच्या इच्छेमुळे युतीला पाठिंबा
– पाठिंबा दिल्याने युतीची नांदी नाही
– राष्ट्रवादीला जनादेश असते तर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असता
– नाशिकच्या बाबतीत युतीने सद्सद्विवेक बुद्धीने विचार करावा, विनाकारण फालतू तडजोडी मी करणार नाही
– ठाण्याच्या विकासासाठी युतीला बिनशर्त पाठिंबा

 

[youtube F3z_8oD6D0o width=”480″ height=”360″]धन्यवादः
बातमी:झी २४ तास, चलचित्रः स्टार माझा

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवर्या साठी न बायको साठी…

सुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)