in

स्त्री शक्ती

स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय.
प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान मिळते. याला कारण भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे.
स्त्री ही विश्वाची जननी म्हणतात तरी सुद्धा  हीच संस्कृती स्त्रीत्वाचा सन्मान करण्यास मात्र विसरली आहे. आजही बहुसंख्य स्त्रियांच्या प्रगतीच्या मार्गात सर्वांत महत्त्वाचा अडसर म्हणजे त्यांचा नवरा ,त्यांची संसारातील कर्तव्ये .स्त्रीला ही मन आहे हे विसरूनच जातात ही मंडळी.
पूर्वी बाईनं चूल आणि मूल सांभाळावं अशी अपेक्षा केली जायची, पण आज अनेक मराठी कुटुंबांत आणि विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांत स्त्रिया नोकरी करताना दिसतात. अर्थात त्या नोकरी करतात तो केवळ घराला आíथक हातभार लागावा म्हणून. खूपच कमी घरांत आपल्या बायकोनं आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपावं, ते फुलवावं, आपल्यात असलेल्या साऱ्या शक्यता अजमाव्यात म्हणून तिला स्वत:च्या मनासारखं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. या अशा मानसिकतेमुळे अनेक स्त्रियांमध्ये असलेली प्रतिभा, कला, बुद्धी मारली जाते.
लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्या क्षणापासून या गोष्टी तिला आपल्या मनात कुठं तरी मागे सरकून ठेवाव्या लागतात किंवा या गोष्टी मनाच्या एका कप्प्यात ठेवून तो कायमचा बंद करावा लागतो.पण आता थोडा समाज बदलतोय . स्त्रीला तिच्यातील सप्तगुणांची ओळख झाली आणि ती व्यक्त  होऊ लागली आहे. तिला तुमच्या मानसिक आधाराची, पाठिंब्याची गरज आहे.
स्त्रीला व्यक्त होऊ द्या. तिच्या मनात दडलेल्या अनेक गोष्टींना वाट करून द्या, आपले छंद झोपासण्याचा तिला देखील अधिकार असून, एक माणूस म्हणून तिलादेखील स्वच्छंदी जगू द्या !
अरे मानव स्त्रीला जर मुक्त होऊ दे,
तिच्या पंखांना बळ दे तू,
उत्तुंग भरारी घेईल ‘ती’
एकदा विश्वास दाखव तू,
विश्वासाला खरी उतरेल ‘ती’,
पाठीवर मायेची थाप दे
मेहनतीचं चीज करेल ‘ती’,
अरे ती स्वतः आहे स्वयंसिद्धा
सर्व जग जिंकिंल ती
सौ.अनिता गुजर

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शंभू महादेव

भारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या