in

फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा

जेव्हा मी “Green Tea” शब्द ऐकते तेव्हा माझ्या मनात येणारी एक गोष्ट म्हणजे त्याची चव हि गवत कापणाऱ्या मशीन च्या तळाशी चाटले असता जशी लागेल तशी असेल. परंतु त्याच्या चवीकडे दुर्लक्ष केले असता, हे सिद्ध झाले आहे कि, हरित चहा हा अनेक इतर घटकांसारखा आहे जो आपल्या त्वचेवर विशेषतः ती समस्याग्रस्त असेल तर जादूसारखे काम करतो.

अलीकडेच मी द फेस शॉप जी एक  कोरियन स्किन केअर आणि सौंदर्य कंपनी आहे त्यांचा  ग्रीन टी चा मास्क वापरला. हवामानातील बदल आणि कदाचित प्रचंड प्रदूषणाचा दररोज मारा झाल्यामुळे माझी त्वचा खराब झाली होती, म्हणून मला त्यासाठी काहीतरी करण्याची अतिशय गरज होती.  या पोस्टमध्ये मी, माझे त्या उत्पादनाबद्दल चे विचार आणि त्याचे कार्य कसे झाले याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. जर तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा.

किंमत

हे मास्क नायका येथे 100 रुपयांना विकले गेले आहे.

पॅकेजिंग

हे एका प्लॅस्टिक च्या पिशवीत असते ज्याच्या आत पत्रक दुमडून ठेवले आहे. आपल्या डोळे, नाक आणि तोंडासाठी त्यात काही छिद्र आहेत आणि हे मास्क एका पातळ कपड्यासारख्या पदार्थाने बनवले आहे जे पूर्णपणे सिरम मध्ये भिजवलेले आहे. पॅकेजिंग प्रत्यक्षात खूपच साधे परंतु खूप छान आहे. बाहेरील पॅकेटसाठी चांगली गुणवत्ता असलेल्या प्लॅस्टिकचा वापर केला आहे, त्याला मॅट फिनिश केलेलं आहे आणि प्रवासासाठी नक्कीच उपयुक्त आहे. आपल्या प्रवासाच्या बॅगमध्ये यासारखे अनेक मास्क घेऊन आपण निश्चितपणे प्रवास करू शकता.

ते काय दावा करतात

सीरममध्ये भिजवलेल्या मास्क शीटमुळे पर्यावरणातील घटकांमुळे त्वचेची होणारी आग ग्रीन टी मुळे कमी होते, त्वचेचा ताजेपणा टिकतो आणि पुनरुत्थान होते.

हे कसे काम करते आणि माझे विचार काय आहेत

जेव्हा त्वचेची काळजी हा विषय येतो तेव्हा मला वाटते की के सौंदर्यप्रसाधनामध्ये अशा काही पवित्र उत्पादनांचा समावेश आहे. स्नेल गूप  किंवा सिरम चे मास्क रात्रभर ठेवले तर ते तुमच्या त्वचेवरील डाग घालवण्यास मदत करतात.  तथापि, शीट मास्क हे एक असे उत्पादन आहे जे मला सुंदरतेसाठी थोडेसे अतिरिक्त असल्याचे नेहमीच जाणवत होते. याचा अर्थ असा आहे की विचार करा, आपण त्या उत्पादनासाठी 100 किंवा 150 रुपये द्यावे जे आपण केवळ एकदाच वापरु शकतो आणि आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की विशेषत: जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा एकदा वापरून काहीही उपयोग होत नाही; म्हणून ते मला फार आवडले नाही.

पण अलीकडेच, सततच्या प्रवासामुळे, उन्हात फिरल्यामुळे आणि चुकीच्या अन्न सवयीमुळे माझ्या त्वचेला मदतीची अतिशय गरज होती. दरवेळी आधीपेक्षा जास्त त्रास माझ्या त्वचेला होत होता म्हणूनच मी कोरियन शीट मास्क वापरायचे ठरवले आणि ते माझ्या त्वचेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खरोखरच काहीतरी करू शकेल का ते पाहायचं ठरवलं.

सध्या मी ग्रीन टी पिणाऱ्यांच्या गटाचा भाग नसीन, परंतु मी ते नाकारणार नाही की ग्रीन टी आपल्या त्वचेवर उपचार करण्यासाठी किंवा तिचा दाह कमी करण्यासाठी खरोखर चांगले कार्य करते. म्हणून मी द फेस शॉप चा ग्रीन टी शीट मास्क वापरायला सुरुवात केली, ज्याची किंमत १०० रुपये आहे, जे ठीक आहे असे दिसते. या उत्पादनाचा खरोखरच उपयोग होतो कि नाही हे बघायला मी एक वेळ एवढे पैसे खर्च करायला तयार होते.

मास्क वापरण्याच्या सूचना फार स्पष्ट आहेत. आपला चेहरा प्रथम धुवून कोरडा करण्याची गरज आहे. त्यानंतर चेहऱ्याला शीट मास्क लावा. आपल्याला हवे तितका वेळ मास्क चेहऱ्यावर ठेवा (किमान 20 मिनिटे शिफारसीय आहेत) आणि नंतर ते काढून टाका. आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर उरलेल्या मास्क ने मसाज करा व ते आपल्या त्वचेमध्ये शोषून घेण्यासाठी ठेवा.

हे ग्रीन टी मास्क असल्यामुळे, ह्याचा वास ग्रीन टी सारखा उग्र येईल असे मला वाटत होते, परंतु या उत्पादनाचा सुगंध माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. परंतु तो एखाद्या महाग उत्पादनासारखा होता. सीरममध्ये शीट भिजवल्यामुळे, जेव्हा आपण पॅकमधून मास्क बाहेर काढतो तेव्हा ते गळायला सुरू होते, म्हणून ते लगेच लावण्याची आवश्यकता आहे.  मास्कचा आकार अगदी एकसारखा नाही, म्हणून जेव्हा आपण ते वापरता तेव्हा आपल्या गरजेनुसार विशेषत: नाकाजवळ ते जुळवून घ्या.

आता ह्याच्या कामगिरीकडे  येऊ. जेव्हा मास्क चेहऱ्यावर होता तेव्हा मला थंडगार वाटत होते. आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक चमक दिसली. त्वचेचा ओलावा टिकण्यास मदत झाली तसेच ती रीफ्रेश झाली होती आणि माझ्या फोडांसाठी मी काहीच न करता पुढच्या दिवशी ते अगदी लहान दिसले.

परंतु, ह्या मास्क मुळे माझा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा चमकत होता. ज्या लोकांची त्वचा कोरडी आणि खराब आहे अशांसाठी हा मास्क खूप चांगला आहे. ग्रीन टी मुळे कदाचित आपल्या फोडांवर फरक पडेल जर आपण हा मास्क बऱ्याच वेळा वापरलात. परंतु एक वेळ वापरून, आपण निश्चितपणे चमकणाऱ्या आणि हायड्रेटेड त्वचेची अपेक्षा करू शकता.

साधक आणि बाधक

गुणः

  • प्रवासासाठी अनुकूल पॅकेजिंग
  • परवडणारी किंमत
  • खूप चांगला वास
  • आपली त्वचा चमकते
  • कोरडी त्वचा हायड्रेटेड बनवते.

विसंगत:

  • एक वेळच्या उत्पादन वापरामुळे त्वचेमध्ये कोणतेही कठोर बदल होत नाहीत.

रेटिंग

मी या उत्पादनास 5 पैकी 3.5 गूण देऊ शकेन कारण प्रामुख्याने माझ्या त्वचेला चमक येण्याव्यतिरिक्त ह्या उत्पादनाचा खरोखरीच दुसरा उपयोग झाला नाही. मुख्यतः त्वचेवरील फोड कमी करण्याची मी जास्त अपेक्षा करीत होते, कारण त्यात ग्रीन टी वापरले होते. पण त्या प्रकारचे काहीही खरोखर झाले नाही. परंतु आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमापूर्वी आपली त्वचा उजळण्यास काहीतरी शोधत असाल तर आपण हे शीट मास्क नक्कीच वापरून पहावे.

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मला कळालेले पानिपत !

स्मृती मंधाना – बायो, उंची, वजन, वय, शारीरिक माप आणि चित्रे