१९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी ‘रविवारची जत्रा’ मध्ये एक ओळ यायची ‘शिवसेनेचे सभासद व्हा!’ दर आठवड्याला हजारो लोक शिवसेनेचे सभासद होत होते. सर्व सभासदांना मार्गदर्शन करण्याचे ठरले. सभा कुठे […] More