in

मन होई पाखरा, धक धकत्या माझ्या हृदया

मन पाखरा सारखा असते म्हणुनच त्याला सर्व भावनांची ओळख असते. सुगंधी फुल हवा हवासा  वाटतो कारण सुखाची आस असते. दुःख जरी आले वाट्याला तरी भरारी नाही थांबत  कारण हा मन पाखरू आहे . तो थांबणार  नाही , तो थकणार  नाही तो फक्त भरारी घेणार सुख दुखान सोबत कारण जगण्याचा आधार आहे तो…

शीर्षक : माझ्या मना…

मन होई पाखरा
धक धकत्या माझ्या हृदया,

तु होई बेधुंद
छेड़े मधुरा माझ्या मना,

तुला पंख सुख दुखाची
घे भरारी माझ्या मना ,

त्या वेदना अंतरी
वाहत्या आसवांच्या धारा माझ्या मना,

तुझ ओढ़ सुखाची
मुखी दिसे खुलते हास्य माझ्या मना,

तुझ्यात घरटे प्रेमाचे
नाती -गोती जपतोस माझ्या मना,

तुझा संभाल आठवनीचा
समाधान भुतकालाचे माझ्या मना,

येती स्वप्ने अनोखी अनोखी
गोड-गोड उद्याचे भविष्य समाधानी माझ्या मना,

आयुष्य जगायचे असेल तर जोड़ पंखाची हवी,
सुख-दुखा सोबत भरारी घेता यायला हवी,

                                        …..रोहित कोरगांवकर

सदरची कविता हि रोहित कोरगांवकर यांनी महाराष्ट्र माझा साठि दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हॅ.दि….हॅ.दि….हॅ.दि….हॅप्प्पी दिवाली

सर्वधर्म ‘सण’भाव