in

आपल्या मॄत्यु नंतर ईमेल्स चे काय?

मॄत्यु नंतर?
मॄत्यु नंतर?

तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील. कारण ईमेल सर्वीस प्रोवाईडर जसे कि हॉटमेल आणि जी-मेल हे एखाद्याच्या मॄत्यु नंतर त्याच्या ईमेल खात्याचे काय करायचे हे खातेदाराला विचारतच नाहित.

खरं म्हणजे हॉटमेल आणि जी-मेल हे तुमच्या मॄत्यु नंतर हि तुमचे ईमेल्स ठेवु शकतात आणि ते तुमच्या वारसदारास सुपुर्त केले जाउ शकतात. तुमच्या वारसदारास तुमच्या इमेल खाते वापर करण्याची परवानगी दिली जाउ शकते. जी-मेल ७ जीबी पर्यंत ईमेल्स ठेवू शकते म्हणजेच जवळ जवळ ७०,००० ईमेल्स. हॉटमेल तुमचे ईमेल्स डिलीट करेल जर तुमचे खाते हे २७० दिवस वापरात नसेल पण जी-मेल तुमचे खाते किंवा ईमेल्स डिलीट करतच नाहि. याहू मात्र वारसदारास ईमेल खात्याचा कारभार वारसदारास देत नाहि. वारसदार हे तुमचे खाते बंद करा अशी विनंती करु शकतो मात्र तुमचे ईमेल्स पाहु नाहि शकणार. याला अपवाद म्हणचे जर तुम्हि तुमच्या म्रूत्युपत्रात हि गोष्ट नमुद केली असेल तर. तुमच्या मॄत्यु पत्रात तसा स्प्ष्ट उल्लेख हवा.

आणि आता मायस्पेस सुध्दा या गोष्टीचा विचार करत आहे.. कि खातेदाराच्या मॄत्यु नंतर त्याचा वारसदारास मायस्पेस खाते वापरुन देण्यात यावे.

मग तुम्ही काय विचाल केला आहात कि नाहि.. आपल्या मॄत्यु नंतर ईमेल्स चे काय?

आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni)
Author can be reached at: ashish@maharashtramajha.com

7 Comments

Leave a Reply
  1. आपल्या मृत्यूनंतर ब‍र्याच गोष्टी घडू शकतात, नाही का? पण आपणच नाही तर आपल्यामागून काय घडतं याचं निदान मला तरी सोयरसुतक नाही. ब‍र्याच वेळा आपल्या हयातीतच आपल्याला वेगळं अस्तित्व नसतं. अशावेळी आपण गेल्यानंतर आपल्या वस्तूंच किंवा आपल्या ई-मेलच काय होतं ते आपल्याल कळणारच नाही. तेव्हा जिवंत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कशाला उगीच मरायचं, नाही का?

  2. आपण हीच तर चूक करतो आयुष्यात, स्वत:ला सामान्य समजून. ईश्वराने प्रत्येकाला एक खास व्यक्तिमत्व देऊन खाली पाठवलेलं असतं. आवश्यकता आहे ती प्रत्येकानं आपल्यातलं तें “खास” व्यक्तिमत्व ओळखण्याची. इतरजण आपल्याकडे कसे वागतात ह्यापेक्षा आपण इतरांकडे कसे वागतो ह्याकडे जास्त लक्ष देणं. हा केवळ उपदेश नव्हे, शाळेत असताना देखील माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी हेंच सांगत आलो. ज्या कुणी हे लक्षात ठेवलं ते आजही माझ्या संपर्कात आहेत, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खूष आहेत. आणि माझा त्यांच्यावर पू‍र्ण विश्वास आहे.

  3. आपला पास वर्ड आपल्या जवलच्या व्यक्तीला द्यावा

  4. लेख वाचला आणी विचारात पडलो खरच आपल्या म्रुत्युनंतर आपल्या ईमेल चे काय हॊणार? विचार करण्यासारखी गोश्ट आहे ्थोडा वेळ हवा.

  5. Mast mi maza bayko sobat mail cha password share kela aahe. Aani aaplya family members aaplyabaddal sagla kahi jantat tevvha aaplya mail la forget password la click kelyavar je (Q) vichartil te family members ans deun new password pan milavu shaktat so jasti vichar karun kahi fayda nahi. Mrutyu nantar emails cha kaay ha aaplya javalchi vyakti tharwel…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कामतृप्तीतही आर्थिक सुबत्ता महत्त्वाची!

जिथे मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे.