in

आपल्या मॄत्यु नंतर ईमेल्स चे काय?

मॄत्यु नंतर?
मॄत्यु नंतर?

तुमच्या पहिले प्रेम ई-पत्र अजुन हि तुम्ही तुमच्या ईनबॉक्स मध्ये ठेवले आहे? तर सावधान, शक्यता आहे कि तुमच्या मॄत्यु नंतर तुमचे सर्व ईमेल्स तुमच्या बायकोला अथवा कुटूंबाला वाचता येऊ शकतील आणि तुम्ही आयुष्यभर जपुन ठेवलेली सर्व सीक्रेट्स तुमच्या परिवारातील सदस्यांना कळतील. कारण ईमेल सर्वीस प्रोवाईडर जसे कि हॉटमेल आणि जी-मेल हे एखाद्याच्या मॄत्यु नंतर त्याच्या ईमेल खात्याचे काय करायचे हे खातेदाराला विचारतच नाहित.

खरं म्हणजे हॉटमेल आणि जी-मेल हे तुमच्या मॄत्यु नंतर हि तुमचे ईमेल्स ठेवु शकतात आणि ते तुमच्या वारसदारास सुपुर्त केले जाउ शकतात. तुमच्या वारसदारास तुमच्या इमेल खाते वापर करण्याची परवानगी दिली जाउ शकते. जी-मेल ७ जीबी पर्यंत ईमेल्स ठेवू शकते म्हणजेच जवळ जवळ ७०,००० ईमेल्स. हॉटमेल तुमचे ईमेल्स डिलीट करेल जर तुमचे खाते हे २७० दिवस वापरात नसेल पण जी-मेल तुमचे खाते किंवा ईमेल्स डिलीट करतच नाहि. याहू मात्र वारसदारास ईमेल खात्याचा कारभार वारसदारास देत नाहि. वारसदार हे तुमचे खाते बंद करा अशी विनंती करु शकतो मात्र तुमचे ईमेल्स पाहु नाहि शकणार. याला अपवाद म्हणचे जर तुम्हि तुमच्या म्रूत्युपत्रात हि गोष्ट नमुद केली असेल तर. तुमच्या मॄत्यु पत्रात तसा स्प्ष्ट उल्लेख हवा.

आणि आता मायस्पेस सुध्दा या गोष्टीचा विचार करत आहे.. कि खातेदाराच्या मॄत्यु नंतर त्याचा वारसदारास मायस्पेस खाते वापरुन देण्यात यावे.

मग तुम्ही काय विचाल केला आहात कि नाहि.. आपल्या मॄत्यु नंतर ईमेल्स चे काय?

आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni)
Author can be reached at: ashish@maharashtramajha.com

7 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कामतृप्तीतही आर्थिक सुबत्ता महत्त्वाची!

जिथे मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे.