in

लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ

ह्या क्रांतीला मृगजळ म्हणुन संबोधने कितपत योग्य ठरेल हे सांगने कठिण आहे. परंतु तूर्तास तरी ही उपमा देता येईल…

लालक्रांती
लालक्रांती

ह्या क्रांतीला मृगजळ म्हणुन संबोधने कितपत योग्य ठरेल हे सांगने कठिण आहे. परंतु तूर्तास तरी ही उपमा देता येईल, कारण लालक्रांती / लालसलाम हे नाव ऐकताच कितीतरी चेहरे, संघटना, राजकीय पक्ष हे गारा पडल्यासारखे डोक्यात गर्दी करतात.

लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ.
लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ.

भारतातील माओवादी, नक्सली, साम्यवादी, फूटीरतावादी मंडळी कोणत्या पत्यावरलालसूर्याचा लालप्रकाश शोधत हिंडताहेत हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे !  लालक्रांती साठी समाजातील नक्की कोणती आदर्श परिस्थिती ह्या लोकांना अपेक्षित आहे??  ही संकल्पना समाजापुढे स्पष्ट व्हायला हवी. धर्माला अफूची गोळी म्हणुन संबोधणाऱ्या मार्क्सच्या (भारतातील) अनुयायांनी, काश्मिरला भारतासहित “दार-उल-ईस्लाम” बनविण्याची शपथ घेतलेल्या फुटिरतावाद्यांच, पाकपुरस्कृत दहशतवादाचं छूपं समर्थन करुन, जगापुढे काश्मिरी जनतेच्या मानवअधिकाराच्या आणि धर्मविरहीत लोकशाहीच्या गप्पा कराव्यात !  हा परालौकिक विरोधाभास पाहुन तो मार्क्स ढगातल्या ढगात बेरंगी अश्रू गाळीत असावा.

अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी मजुर/कामगारांना ठेउन एक आदर्श आर्थिक प्रारुप ठेवण्याचा प्रयत्न कार्ल मार्क्सने केला. खिळखिळी झालेली नेतृत्वहीन राजसत्ता व पोपच्या धर्मव्यवस्थे विरोधात स्वत:च्या हक्कासाठी उभी राहिलेली जनतेची चळवळ, मार्क्सच्या सामाजिक परिवर्तनाच्या साम्यवादी  विचारसरणीला जन्म देऊन गेली. एव्हाना समाजविकासासाठी, मानवांच्या मूलभूत हक्कांसाठी, सामाजिक समतेसाठी लढणारी मार्क्सची विचारसरणी विशुद्ध स्वरुपात न राहता ‘राजकीय स्वरुपातील हुकुमशाही पुतळ्याच्या साच्याचा आकार घेत होती‘. स्टॅलिन, लेनिन, माओ, फिडेल कॅस्ट्रो यांनी मार्क्सच्या मूळ विचारसरणीला फाटा देऊन स्वत:ची राजकीय ईच्छापुर्ती करण्यासाठी त्या विचारसरणीला हुकुमशाहीच्या अन् घराणेशाहीच्या साच्यात व्यवस्थितपणे उतरवलं आणि त्याला मार्क्सचा मुखवटा बसवुन (वंशपरंपरागत) राजसत्ता उपभोगण्यासाठीचा  “रक्तरंजित  लालरस्ता”  यांत्रिकपणे बनत गेला. कारण बाह्यदर्शनी ही चळवळ मार्क्सचीच आहे,  असे दाखविण्यात येत असले तरीही ह्या चळवळीला वेगळे सुत्रधार मिळालेले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात पाय रोवत असताना (आंबेडकरांच्या चळवळीला स्वत:चा पर्याय दाखविण्यासाठी) काही दशकांपर्यंत कम्यूनिस्ट लोकांनी भारतातील शोषित, मागास असलेला कामगारांचा वर्ग “टार्गेट करण्यासाठी 1930 पासुन प्रयत्न चालविले होते. एवढे वर्ष मेहनत घेउनही कम्यूनिस्टांना अपेक्षित असा कामगार वर्ग भेटत नव्हता. तेंव्हा त्यांना नाईलाजाने आंबेडकरांच्या चळवळीचा आधार घेणे योग्य वाटले.

राजसत्ता मिळविण्यासाठी हूकुमशाही स्विकारतील ते आंबेडकर कसले ?? आंबेडकरांच्या शुद्ध लोकशाही विचारांशी तडजोड करणे कम्यूनिस्टांना परवडण्यासारखे नव्हते. ब्रिटीशांच्या पदरी होऊ घातलेल्या तत्कालिन निवडणुकीत कॉमरेड लोकांनी आंबेडकरांच्या विरोधात केलेला अपप्रचार आणि आंबेडकरांनी काठमांडूच्या भाषणात आपल्या राजकीय ईच्छाशक्तीची फाडलेली लख्तरं तसेच वैचारिक विरोधाने, स्वातंत्र्योत्तर काळातील कॉमरेड जनतेला कळून चुकले की, हूकुमशाहीची धोरणं आता गुंडाळून ठेवावी लागणार आणि हळूच (हूकुमशाहीच्या  साच्यातील ) तथाकथित लोकशाहीवाल्या चळवळीला मार्क्सचा मुखवटा काढून लगेच आंबेडकरांचा मुखवटा चढवला.  तडजोडीनं दलित  आणि आदिवासी समाजाला सुरुवातीला धर्मसत्तेविरुद्ध आणि हळूहळू राजसत्ते विरुद्ध ढकलण्याचे काम सुरु झाले.

 70, 80 च्या दशकात उदयास आलेल्या औद्योगिक क्रांतीने भारतात कामगारांचा एक (बहुप्रतिक्षीत आणि अपेक्षित असलेला बहुसंख्यांक वर्ग हळुहळु तयार होत गेला.  कम्यूनिस्टांनी कामगार वर्गातील दलित समाजाला टार्गेट करण्याकडे आपला मोर्चा वळवला खरा पण दूर्दैवाने (आपल्या सुदैवाने) त्यांना कामगारवर्गाला आणि दलितांना  साम्यवादी  विचारसरणीशी पूर्णत: जोडता आले नाही, अर्थात ते अयशस्वी झाले असेही म्हणता येणार नाही. आंबेडकरांचे गुणगाण गाउन त्यांच्या अनुयायांना हळुहळु टप्याटप्याने  साम्यवादी  बनवले आणि त्यानंतर लोकशाहीच्या विरोधाकडे झुकवायला सुरु केले,  इंग्रजी भाषा साक्षरता अभियानाच्या अभ्यासक्रमाचा समारोप हा “कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो” आणि “दास कॅपिटल” ने झाला. दुर्गम क्षेत्रात, जंगलभागात राहणारे आदिवासी, जनजाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास वर्गातील लोकांना सर्व प्रकारच्या सरकारी सोईसुविधांपासुन वंचित ठेऊन स्वत: कॉमरेड लोकांनी त्याचे श्रेय घेतले स्वत:ला  त्यांचा मसिहा म्हणुन दाखविण्याचा प्रयत्न हा इंदिरा गांधींच्या आणिबाणी नंतर यशस्वी होऊ लागला.  80च्या दशकात गिरणी कामगारांच्या समस्या म्हणजे (हूकुमशाही) राजसत्तेकडे कूच करण्यासाठी जणु गवसलेला एखादा राजमार्गच वाटत होता. भांडवलशाही हळुहळु कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत होती तर कम्यूनिस्ट लोक त्याचा पुरेपुर फायदा उचलत होते. ह्यावेळेसही त्यांना अपेक्षित  यश मिळालं नाही. भांडवलशाहीने गिरणी कामगारांची चळवळ दाबली, सरकारी नियमांमुळे नाईलाजाने त्यांचे अर्धेअधुरे पगार देउन बोळवण केली, आणि कम्यूनिस्टांच्या लेखी गिरणी कामगारांच्या चळवळीचे (राजकीय) महत्व कमी झाले आणि त्यांच्या समस्याही.

एव्हाना कम्यूनिस्ट धार्जिण्या रशियन एजंटांनी वैचारिक बुद्धिभेदाला सुरुवात केली होती. K.G.B. ह्या निमशासकिय रशियन गुप्तहेर कंपनीचा “युरी बेझमेनोव्ह” (Yuri Bezmenov) हा पहिला रशियन एजंट 1963 साली भारतामध्ये आला. तो एजंट म्हणुन नव्हे तर वृत्तपत्राचा संपादक म्हणुन आला आणि त्याने वृत्तपत्राद्वारे धर्मनिरपेक्षतेच्या आड हिंदूत्वावर आणि भारतीय संस्कृतीवर आघात केले, धार्मिक व्यक्तिमत्वांवर प्रश्नचिन्ह उचलले, धर्मग्रंथ काल्पनिक आहेत की नाही अश्या विषयांवर उलटसुलट चर्चा सुरु केली,  शैक्षणिक अभ्यासक्रमात मुघलांचे उदात्तीकरण केले, भारतीय स्वातंत्र्यढ्याचा मर्यादित इतिहासच शिकविण्यास भाग पाडले, हळूहळू धार्मिकविरोधाकडून तो भारतीय संस्कृतीच्या विरोधाकडे वळत होता. योग, आयुर्वेद, भारतीय विचारमूल्य, शास्त्रे, जीवनपद्धती ह्याचा जसाजसा तो सखोल अभ्यास करत गेला तसा तो भारतदेशाच्या प्रेमात पडत गेला, आणि शेवटी त्याला स्वत:च्या चूकिची जाणिव झाली, की त्याने ह्या देशातल्या दोन पिढींचे शैक्षणिक पद्धतीद्वारे ब्रेनवॉशच केले होते. त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्याने How to brainwash a nation हा विषय सांगितला होता, रक्ताचा एकही थेंब ही न सांडता शत्रुराष्ट्राला वैचारिक बुद्धिभेद करुन नामोहरम कसे करावे, त्यावरुनच कम्यूनिस्टांच्या राष्ट्रविरोधी अजेंड्याची कल्पना येते. विवीध प्रकारचे समवैचारिक N.G.O., संघटणा ह्या मानवतावादी, लोकशाही विचारांचा मुखवटा घालुन महाविद्यालय, विद्यापीठ परिसरात कार्यरत असतात, विद्यार्थ्यांमधील व्यवस्थेविरोधात चिड ओळखुन त्यांना विद्रोहाकडे झुकवतात, आणि विद्रोह हा टोकाला गेला की तो हिसंक रूप घेत असतो, ह्याचेच उदाहरण म्हणजेच नक्षलवाद.  ज्याला सशस्त्र विद्रोह म्हणता येईल. ह्या परिस्थितीचे बळी पडलेल्यांची अनेक उदाहरणं देता येतील.

जून 2016 च्या “लोकमुद्रा”  मासिकात  कबिर कला मंच  च्या ‘सचिन माळी ने आर्थर रोडच्या तुरुंगात असताना  “जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान”  हे पुस्तक लिहीले होते. ह्या पुस्तकाविषयी माहितीपर लेख त्या मासिकात छापला होता. नक्षलवादाचा आरोप असलेल्या सचिनला हे देखिल माहित नव्हते की त्याचे गांभिर्य काय आहे ?  त्याला झालेला पश्चाताप आणि लालपहाट चा भ्रमनिरास त्याने पुस्तकात लिहून काढलाय. आंबेडकरी चळवळीतील एक सामान्य तरुण विद्रोह करता करता नक्षलवादाकडे कसा झुकला हे विचार करण्यासारखे अन त्यातुन बोध घेण्यासारखे आहे.

रक्तरंजित वाटेवर धावणारे हे लालक्रांतीचे मृगजळ सचिन सारख्या अजुन किती तरुणांचे आयुष्य बरबाद करणार  आहे ??

माहिती संकलन आणि लेखन : सत्यम अवधूतवार.

One Comment

Leave a Reply
  1. हे सगळ सामान्य माणसापर्यंत , विद्यार्थ्यांपर्यंत क्रांतिकारी रूपाने पोहचायला हवं, कारण आज लोकशाही मुखवटे धारण करून त्यामागील छुपे षड्यंत्री कम्युनिस्टि नक्सलवादि विचारसरणी ह्या देशात, ह्या मातीत, ह्या साध्या भोळ्या लोकांच्या डोक्यात, जीवनात, संस्कृती प्रवाहात झपाट्याने रुजतात, वाढताना दिसते आहे… ह्यावर वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे, आणि महाविद्यालयीन युवकांनी असल्या ढोंगी कम्युनिस्ट नक्सलवादी विचारा विरुद्ध उभे राहणे आणि त्यांचा ढोंगी मुखवटा चिरडून फाडनेच भारतीय लोकशाही संस्कृतीला वाचण्याची शपथ असेल….
    सध्याच्या राजकीय आणि वैचारिक द्वंद्व माजवणाऱ्या परिस्थितीवर अतिशय सखोल अभ्यास करून ,त्याचे यथोचित प्रकटीकरण करणारा संम्जूतदारबुद्धीचा उत्तम लेख…
    मला तर वाटतं की ह्या लेखाचे, आणि लेखांचे,.. सगळ्या माध्यमांनी प्रकाशन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नाटकार रा. ग. गडकरि

राज संन्यास – नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड?

मला कळालेले पानिपत !