निवडणुका आल्या म्हणजे उम्मेदवार आले, उम्मेदवार आले कि अपेक्षा आल्या, आणि आमच्या मताला कधी नव्हे ती किम्मत आली, आणि बरे वाटु लागले. पाच वर्षे न दिसणारे चेहरे दिसु लागले. आणि मला हि प्रश्न पडला कि आपला उम्मेदवार हा असावा तरी कसा? पुणे हि देशाची ज्ञानपंढरी त्यामुळे इथला उम्मेदवार हा अति उच्चशिक्षित नसला तरि किमान पदवीधर तरी असलाच पाहिजे. शिक्षण क्षेत्रात प्रगती हि साधायचीच आहे पण त्याच प्रमाणे पुण्याचा बाकि सर्व अंगानेही विकास करायचा आहे जसे कि आय.टी उद्योग आणि इथल्या पायाभुत सुविधा. मतदार संघा मध्ये प्रत्यक्ष फ़िरणरा ना आकाशातुन घिरट्या घालणारा असावा.
आज आपण २१व्या शतकात आहोत, हे शतक ज्ञानाचे शतक आहे. त्यामुळे आपल्या कडे असलेल्या ’रीसोर्सेस’चा पुर्णपणे अर्थ समजु शकणारा आणि त्यांचा योग्य ठिकाणी वापर करु शकणारा असा हा माझा उम्मेदवार स्मार्ट हवा. रस्ते बांधतो, पाणि देतो, वीज देतो असे नुसते देतो म्हणणारा नव्हे तर हे सर्व मी दिले असे ’दिले’ हे म्हणु शकणारा कार्यकुशल असा माझा उम्मेदवार हवा. शहराला लागलेली बेशिस्तीची लागण आणि त्यातून आलेला बकालपणा यांना पुर्ण ताकतीने भिडणारा असा कणखर माझा उम्मेदवार हवा. आज अगदी १००% भ्रष्टाचार मुक्त कारभार देणे मुश्कील आहे पण माझा उम्मेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नसावेत. वरुन आलेला जास्तीत जास्त पैसा हा जनतेच्या कामात खर्च करणारा असावा. मी हि पैसे खाणार नाहि आणि तुलाहि खाऊ देणार नाहि हि त्याची कामा बद्दल निष्ठा हवी. निष्ठेने काम करायचे असेल तर बुद्धिने त्याच प्रमाणे तब्येतीने साथ हि दिलीच पाहिजे त्यामुळे उम्मेदवार हा तरुण असेल आणि सर्व अनुभवी ज्येष्ठांना आपल्या सोबत घेऊन वाटचाल करणारा असावा. त्याची आपल्या कार्यकर्त्यांवर, मतदार संघावर पकड जबरदस्त असावी. त्याचे शरीर कमी आणि शब्द जास्त वजनदार असावेत.
जनतेशी असलेला संपर्क हा चांगलाच हवा आणि जनतेला हि आपल्या खासदाराला संपर्क करणे सोपे असावे, म्हणजेच जनसंपर्काचा मार्ग हा एकेरी नसावा. जर गरजु माणसाने हाकेचा आवाज दिलाच तर त्याला मदतीचा खासदारा कडुन सरकारी यंत्रणेकडुन मदतीसाठी होकार ऐकु आला पाहिजे. एखादे काम जर त्याच्या कडे घेऊन गेले तर लोकांना पुन्हा पुन्हा बोलवुन परत पाठवणारा नसावा तर जमत असेल तर होय, नसेल तर नाही असा रोखठोक बोलणारा माझा उम्मेदवार असावा. आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त प्रश्न लोकसभेत मांडुन मुद्द्याना लवकरात लवकर मार्गी लावणारा असावा. म्हणजेच आपल्या मतदार संघात नक्की कोणते प्रश्न आहेत याची जाण त्याला हवी, ते समजुन घेण्याची बौद्धिक कुवत त्या मध्ये असावी. सरकार कडुन येणारा पैसा योग्य ठिकाणी योग्य तेवढाच खर्च व्हावा. सरकारी योजनांचा जास्तित जास्त फ़ायदा घेऊ शकणारा असा माझा उम्मेदवार हवा. गरिब ’आम आदमीला’ किमान रस्ते, पाणि, वीज यांसारख्या ’ऐतिहासिक’ समस्यांना तोंड द्यावे लागणार नाहि याची काळजी घेणारा माझा उम्मेदवार हाव. प्रश्न सोडवायाचा म्हणजे तो सोडवायचाच, कधी द्रवीड च्या कसोटी फ़लंदाजी प्रमाणे संयमी तर प्रसंगी धोणीच्या टी-ट्वेन्टी स्टाईलने सोडवणारा.
खासदार म्हणजे विचारांमध्ये स्पष्टता हवीच त्याच प्रमाणे निर्णय घेणेही आलेच. त्यामुळे कठीण निर्णय हे त्याच कठोरतेने घेणारा आणि वज्र ताकतीने ते पुर्णत्वास नेहणारा असा माझा उम्मेदवार हवा. निर्णय घेतानाही त्या मध्ये दुरद्रूष्टीने घेणारा असा माझा उम्मेदवार द्रष्टा हवा. अगदी भारताच्या ’विजन २०२०’ मध्ये माझा जास्तीत जास्त कसा सहभाग राहील आणि माझा मतदार संघ कसा अधिकाधिक प्रगत राहिल आणि त्याच वेळि सर्व गरिब, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय, श्रीमंत या सर्वाना आपण या मतदार संघाच्या पर्य
matdar jagruteeche he mahattvache kam kelyabaddal abhinandan.
atishay uttam wichar aaplya yenarya pratinidhi babat namud kele aahet ……. keep it up……
niwadnuka hotat umedwar niwadun yeo urto to phakt samnya manus t ah etithech asto