आजकाल आपण आपले मत मांडण्या साठी अनेक माध्यमांचा वपर करतो. काहिजण वॄत्तपत्र संपादकांस ईमेल पाठवता, काहि जणे लेख लिहितात, तर काहि जणे ब्लॉग्स लिहितात. पण सोशल नेटवर्किंग साईट्स जसे कि ऑर्कुट आणि फ़ेसबुक यांचा हि जोरात वापर होतो. प्रत्येक जण इथे आपले मत बिंधास्त पणे मांडु शकतो. आणि आज हजारो नव्हे लाखो लोके या साईट्स चा वापर करुन आपले मत मांडतात. प्रत्येकाला मांडलेले मत पटेलच असे नाहि. तुमच्या मांडलेल्या मताला अनेकदा विरोध हि होतो.
पण हल्ली एक विषय मात्र एकदम हॉट आहे.. तो म्हणजे उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात झालेले विभाजन आणि त्याचा राजकिय, सामाजीक, वैचारिक वगैर वगैरे गोष्टींवर होणारा परिणाम. कोणतिही कम्युनीटी असुदे तिथे हा विषय चघळला जातोच आहे. आणि चित्र काय दिसतय तर मराठी माणुस एकमेकात नुसता भांडतच आहे. जर चांगली चर्चा होत असेल तर त्याचे कोणिही स्वागतच करेल पण निव्वळ भांडणच? आणि याचे कारण काय तर दोन भावंडे एकमेकात भांडत आहेत हे. अरे ते भांडतायत तर तुम्ही सुध्दा त्यांना सामिल होताय? तो अफ़जल खान त्याच्या कबरित पडुन हसत असेल आपल्यावर जोर जोरात आणि म्हणत असेल बघा मराठा फ़ुटला, एकेमेकाला भिडला. हे किती वेळ असेच चालणार.. का आता या दोन भावंडाच्या नादात आपण एकमेकांना भिडणार?
याच ऑर्कुट वर कम्युनिटि आहे.. बाळासाहेब ठाकरे यांचा Fan Club आहे, अहो मीच चालु केलेली कम्युनिटी आहे. तिथे पण हेच.. तोच मुद्दा आणि तोच भांडणारा मराठी माणुस. हे थांबवायला तर हवेच होते मग सरळ सरळ एक फ़तवाच काढला कि ’या कम्युनिटीवर मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे’. भाषा काहि जणांना पटेल काहि जणांना नाहि पटणार पण संदेश स्पष्ट पणे दिला कि ईथे एकमेकात भांडलेले चालणार नाहि. हे करणे आवश्यकच होते आणि फ़क्त कम्युनिटीज मध्ये नव्हे तर हा संदेश सर्व मराठी माणसांमध्ये जाणे आज आवश्यक आहे.
माझी हि माझ्या तमाम मराठीजनास विनंती आहे कि एकमेकात अजिबात भांडुन आपली ताकत वाया घालवु नका एक रहा एकिची वज्रमुठ कायम राहुद्या. दुश्मन किती हि बलाढ्य असला तरि त्याला आपण आपल्या एकिच्या ताकतीवर आसमान दाखवू शकतो पण जर आपणच एक नसु तर बलाढ्य शत्रु कश्याला छाटछूट कोणिही येईल आणि आपल्याला आडवे करुन जाईल.
या कम्युनिटीवर मी संदेश देऊ शकलो पण प्रत्येका पर्यंत हा संदेश घेऊन तुम्ही जावा आणि आपल्या एकिची वज्रमुठ कायम ठेवा, हिच विनंती करतो आणि थांबतो.
(मी माझा संदेश मला पटेल त्या भाषेत सांगीतला. तुम्हाला काय वाटते हे मला हि कळुदे. आपण कंमेंट्स देऊ शकता)
जय महाराष्ट्र.
आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni)
Pan what do u exactly mean by ‘Bhandan’ ?would u call two persons talking over differences in their openions a Bhandan?By if we can not understand what is the openion of the othe person how can we unite.I agree Bhandan is bad,but we need to understand where to draw line between discussion and bhandan.
jai maharastra
maharastratil maza shiv bandhuno .kharya artha ne tumchi jarurat aamha belgav chya marathi mansala aahe tumhi jar aap aap apsat bhand rahun aamchi sutka karayla visarlat kay? aaka maratyavar sampurn kannadig tutun padtat aamhala karnataki magarmithi tun mukt kara,belgav ha maharastracha tukda ahe,karnataki kutrya ne to lachka todla aahe tyachi jan theva.SMS KARA 09341234821
aamhi 25lac marathi bandhav karnatakachya muthit tadfadat aahot
aamhala aaplya sarkhya mard marathya kadun aasha aahet,rajkarnya kadun nahi JAI MAHARASTRA
Lots of folks blog about this issue but you wrote down some true words.