in

आपला पासवर्ड सुरक्षित कसा ठेवाल?

passwordआपला पासवर्ड सुरक्षित कसा ठेवाल?

आज संपुर्ण जगा मध्ये ज्या एका गोष्टिची प्रंचंड काळजी घेतली जाते ती म्हणजे आपला पासवर्ड. जर एक पासवर्ड जर कुठे ‘लिक’ झाला तर किती गहजब होउ शकतो. आपले सगळे ईमेल्स लोकांना कळतील. आपल्या सगळ्या खाजगी गोष्टी दुसर्यांना समजतील. आपले क्रेडिट कार्ड नंबर्स, व्ययक्तीक फोटो, आपली ओळखच चोरीला जाऊ शकते.

हे सगळे होऊ नये म्हणुन हजारो कोटींचा रिसर्च केला जातोय, नवनवीन संगणक प्रणाली विकसित केल्या जातात. साहजिकच त्यां विकत घ्यायच्या असतील तर आपल्याला खर्च हि तेवढाच करावा लागेल, एकंदरीत पासवर्ड सुरक्षित ठेवणे आज पर्यंत हे एक्दम खर्चिक काम होते. पण आपल्या सारख्या गरिब माणसाचा विचार करणारे लोकही या जगात आहेत हे मला समजले आहे. यांनी एक अशी मस्त टेकनीजक शोधुन काढली आहे कि त्या मुळे आपला पासवर्ड हा फक्त आपल्या पुरतेच मर्यादीत राहिल आणि तो ईतर लोकांना समजणे खुपच अवघड असेल (मी तर असे म्हणतो कि अशक्य असेल)

 तर काय आहे हि नवीन टे़क्नॉलॉजी? पहा स्वत:च..

१.) आपला पासवर्ड दुसर्यांपासुन लपवुन ठेवा.

अतिशय सोप्या आणि शास्त्रशुध्द पध्दतीने आपला पासवर्ड आपल्या हितशत्रुंपासुन लपवुन ठेवा. कोणत्याहि ट्रेनीगची आवश्यकता नाहि. शैक्षणिक पात्रता:- अट नाहि.

 

protect-password-01

२.) आपला पासवर्ड तसेच आपण काय बघतोय हेही सुरक्षित ठेवा.

फक्त पासवर्ड लपवणे हे आपल्या साठी पुरे नाहि? तर मग हि पध्दत आपल्या साठीच आहे. फक्त पासवर्ड नाही तर आपला संगणकाचा पडदा हि सुरक्षित ठेवा. ना दिसेल पासवर्ड ना दिसेल लॉगीन आयडी.

protect-password-02

३.) फक्त आपली ईलेक्ट्रॉनिक ओळखच नव्हे… तर आपली खरी ओळख हि लपवा.

आपला पासवर्ड सुरक्षित असणे हे आपल्या साठि पुरे नाही? तर हि टेकनिक आहे खास आपल्या साठिच. आपण आपली वयक्तिक ओळख हि लपवुन ठेवा. या मुळे लोकांना ना आपला पासवर्ड दिसेल, ना आपला लॉगीन आयडी दिसेल ना खुद्द आपण कोण आहात हे कुणाला दिसेल. अगदी फुल प्रोटेक्शन…

 protect-password-03

हे सुध्दा तसेच..

 protect-password-04

 मग कश्या वाटल्या या हाय्-फंडू टेकनिक्स?

Written by Ashish

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?

गुगलचे नवे ऑनलाइन न्यूज रीडर