in

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”

गणेश राजाराम शिंदे
रा. सावरगाव (गुरवाचे)
ता. पारनेर जि. अहमदनगर.

वरिल कविता गेणेश शिंदे यांनी महाराष्ट्र माझास पाठवली, आपण हि आपले लेख/कविता महाराष्ट्र माझासाठी पाठवु शकता: संपर्क साधा.

Written by Ashish

23 Comments

Leave a Reply
  1. Saglayni ekach lakhat theva.Raje hote mhanunach aaj aapan aahot, nahitar aapalyala sudha mughalanchi GULAMGIRI karayala lagali asati….
    Aani aaj aapan part tyanach madat karatoy..

  2. Hote raje mhanun he swarajya ubha rahila…………raje naste tar aaplyala hi tya moglanchi gulam giri karawi lagli asti………Jai Bhavani Jai Shivray……..

  3. शिवाजी या नावाचा कधी उलटा विचार केलाय का , ” जीवाशी” जो आयुष्यभर मराठ्यांसाठी स्वताच्या जीवाशी खेळला असा राजा मिळन हे मराठयांच भाग्यच आहे . आम्हाला अभिमानाच नाही तर माज आहे , मराठी असल्याचा . छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मनाचा मुजरा.

  4. अतिशय उत्तम कविता…..
    शिवरायांची थोरवी वर्णावी तितकी कमीच आहे…
    गणेश शिंदे यांचे मनापासुन आभार, त्याच बरोबर तुमचे पण आभार…
    जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे ||

  5. bharat maa ke charantalo par kamal phul chadhane wala sher shahaji ka schava tha
    are, he aisa koi duja jaisa mera shivaji raja tha ……..asel himmat tar advun dakhav

  6. य़ा मावळ्या चा मानाचा मुजरा फक्त माझ्या राज्यांना जय शिवराय

  7. राजे तुम्ही होतात म्हणुव कपाळी आमच्या भगवा गंध आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचा छंद

  8. Manto ki Majya rajyacha…
    Mandir nahi paan Ajj Maharashtrat…
    Sagle Mandir Majya rajya muhle..
    Sukhruup ahet…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वरभास्कर गेले, पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण आदरांजली

आई फ़क्त तुझ्यासाठी.

आई फ़क्त तुझ्यासाठी…