in

मोहमाया झाली वेडी

पात्र परीचय :  श्री – ४० – ४५ वर्षांचे,           सौ : ४० वर्षांच्या

सौ : बाई! बाई! बाई! हे सगळे channels म्हणजे अश्लीलतेचे, बीभत्सपणाचे कळस आहेत. मुलांसमोर, मोठ्यांसमोर चुकून जरी लागले तरी थरकाप उडतो. आपली संस्कृती नष्ट करायलाच निर्माण झाले आहेत हे सगळे.

श्री :  अग त्याचं म्हणन असतं की मागणी तसा पुरवठा. लोकांनाच हे सर्व हवं आहे, असा ह्या channel वाल्यांचा दावा आहे.

सौ : काय हो, असं अश्लील सर्व कुटुंबासह बघायला कोण सांगत असतील? काय त्यांचे ड्रेस काय त्यांचे संवाद.

श्री : अग, मी पूर्वी बायकांना माया, ममता याचं रूप समजायचो. म्हणजे, मायावती आणि ममतादिदी नव्हे, खऱ्या माया ममता म्हणायचं आहे मला. पण एकता कपूरने सिद्ध केल आहे की बायका ह्या सर्व कट कारस्थानाच्या मूळाशी असतात. पुरुष हे फक्त घाण्याचे बैल असतात.

सौ : हो S S !! तुम्हा  पुरुषांना  एकता कपूर अगदी बरोबर सापडली आहे आम्हा बायकांना टोमणे मारायला.

श्री : अग ती एकता कपूर काय घेऊन बसलीस, सगळे news channels हेसुद्धा बीभत्स रसाचे पुजारीच आहेत, असं माझ ठाम मत झाल आहे. नाहीतर मिठी नदीच्या पुरात मरण पावलेल्या नातेवाईकांना त्यांनी “आपको कैसा लग रहा है” वा त्यांच्या घरी जाऊन “आईये देखते है इनके घरका माहौल कैसा है?” असे निर्बुद्ध प्रश्न विचारले नसते.

सौ : अरे पण हे असाच चालू राहिलं, तर आपली पातळीही त्यांच्यासारखीच होईल!! आणि लहान मुलाचं काय? किंवा टीन एजर्सच काय?

श्री : त्यावर एकाच तोडगा आहे, तो म्हणजे TV बंद करणे आणि वाचन संस्कृती वाढवणे.

सौ : हा निर्बुद्धपणा, चकचकीतपणा ९१/ ९२ नंतर सुरू झाला असं नाही वाटत तुला?

श्री : अगदी बरोबर. १९९१ च्या अगोदर आपला भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी world bank आणि IMF च्या दबावाखाली आपल्याला समाजवादाची कास सोडून भांडवलशाहीची वाट धरावी लागली. आणि भारतात शिरला भोगवाद, चंगळवाद, पेज थ्री संस्कृती. “In other words problem of plenty”.

सौ  : म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे?

श्री : सांगतो. १९९१ च्या अगोदर भारतात समाजवादावर आधारीत अर्थव्यवस्था होती. पंडीत नेहरूंच्या रूपात आपल्याला स्वप्नाळू पंतप्रधान लाभले. त्यांनी साम्यवादी भारताचे स्वप्न पाहीले, जिथे  कोणी उच्च नसेल, नीच नसेल. सर्व समान असतील. कसलाही भेदभाव नसेल. सर्वधर्मसमभाव असेल. भारत जागतीक शांतीचे प्रतीक असेल.

सौ : हो. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य, किती छान वाटत ऐकायला. असा समाज खरोखरच जर झाला तर सर्व किती सुखात राहतील नाही?

श्री : बरोबर. त्यांनी Karl Marx च्या साम्यवादावर आधारीत सरकारी कंपन्या काढल्या. सरकारने उद्योगधंद्यात पैसे ओतले.

सौ : ह्यामागे त्यांचा हेतू जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, सर्वजण सुखात राहावेत हाच होता.

श्री : मान्य आहे. पण साम्यवादी रशियात जे झालं, तेच भारतात झालं. कारण लालच, हाव, हा माणसाचा गुणधर्म आहे. साम्यवादामध्ये गधे  घोडे सब बराबर, हे महत्वाकांक्षी लोकांना मानवत नाही. त्यांना सर्वांपेक्षा जास्त, उच्च असं काहीतरी हवं असतं.

Scene 1 :  सरकारी अधिकारी गरीबाला नडतो आहे. पैशासाठी अडवणूक करत आहे. आणि तेव्हड्यात एक धनदांडगा तिथे येतो, त्याची हा सरकारी अधिकारी सरबराई करतो.

Scene 2 : बांगलादेशी घुसखोरांना राजकारणी  आणि रेशनिंगचे अधिकारी पैसे खाऊन संगनमताने रेशन कार्ड वाटत आहेत.

Scene 3 : न्यायाधीश लाच खाऊन, खऱ्या गुन्हेगाराला सोडून देतो आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते लोक हताशपणे रडत आहेत. गुन्हेगार खुनशी हसत वकील आणि

न्यायाधीश दोघांना पैशांनी भरलेल्या  ब्यागा  देतो आहे.

Scene 4: टेलीफोनचे ऑफिस : १५ वर्षांपूर्वी बुक केलेला फोन अजून का आला नाही हे विचारायला आलेल्या इसमाला अधिकारी सांगतो, अहो इतकी लाईन आहे, की अजून

पाच वर्षे विसरा. तो इसम टेबलाखालून ५०० रुपये सरकवतो. आणि तोच अधिकारी त्याला लगेच फोन देतो.

श्री : समतेच्या नावाखाली खाजगी धन्देवाल्यांवर भरपूर कर लादले होते, आणि मोठी  जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना तुटपुंजे पगार दिले जात होते. म्हणून हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर उभा राहीला.

सौ : म्हणजे तुला म्हणायचं आहे की जबाबदारी जितकी मोठी तितकाच पगारही मोठा हवा?

श्री : आणि भ्रष्टाचारात पकडलं गेल्यास, शिक्षाही जबर हवी. पण आपल्याकडे बक्षीसही कमी

आणि शिक्षाही मामूली. त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित पळवाटा ठेवलेल्या.  कुंपणच शेत खात आहे म्हटल्यावर काय बोलणार?

सौ : दुसराही एक मोठा दुष्परिणाम झाला. सरकारच्या साम्यवादी विचारसरणीमुळे, कामगारांना कायद्याचे मोठे संरक्षण होते. पण “अति तिथे माती” म्हणतात ना!! कामगार पुढाऱ्यांनी ह्या कायदेशीर संरक्षणाचा गैरफायदा घेतला

श्री : आणि सरकारने कामगार पुढाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याकडे, त्यांच्या गुंडगिरीकडे नेहेमीच दुर्लक्ष केलं. त्यामुळे काय झालं?

Scene 5 : एक कामगार ( गळ्यात सोन्याची चेन, हातात जेव्हढी बोटे तेव्हढ्या अंगठ्या, ब्रेसलेट घालून गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत दारू पिऊन तर्र होऊन नाचतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हा कामगार कामावर झोपतो. supervisor त्याला suspend करतो. लगेच कामगार पुढारी “मोडेन पण वाकणार नाही” “लाल बावट्याचा विजय असो”, अशा घोषणा देत संपावर जातात.

श्री : त्या कामगारांच्या राहणीवरून आपल्या लक्षात आलेच असेल, की समस्त कामगार मंडळींना व्यवस्थित पगार होते.

सौ : पण क्षुल्लक कारणांवरून त्यांनी संप केले, मारामाऱ्या केल्या. आणि बरेचसे कारखाने बंद पडले. आणि कामगार बेकार झाले. पण त्यांचे राजेशाही शौक मात्र कायम राहीले.

Scene 6 : कफल्लक कामगार दारूसाठी बायकोला त्रास देतो, मुलं रडताहेत. बायको म्हणत, मी १० घराची धुनी भांडी करून घरात पोटाला पैसा आणते, आणि तू, पोर बाळ काही न बघता दारूत सर्व पैसे घालवतोस.

श्री : अशा या संपकारणांमुळे, ८० – ९० च्या दशकात बरेचसे उद्योगधंदे बंद पडले. बर, subsidies तशाच चालू राहिल्या. आणि देशाच्या अर्थकारणाची पार वाट लागली.

सौ : आणि मग सरकारच्या लक्षात आलं की, शास्त्रज्ञांना सैबेरियात डांबणाऱ्या आणि लाखो लुळ्या पांगळ्या आणि म्हाताऱ्यांना मारून टाकणाऱ्या स्टालिनच्या रशियाचे अंधानुकरण आता थांबवलं पाहिजे.

श्री  : १९९१ साली भारत  नाईलाजाने म्हण किंवा बळजबरीने म्हण, भांडवलशाहीकडे वळला. नंतर ५/६ वर्षात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, “संप करणे बेकायदेशीर आहे”. मग काय?  सर्व भांडवलदारांची टोटल ऐष सुरु झाली.

Scene 7 :  गुजराथी/ मारवाडी मालक, मराठी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची बळजबरी करतो. मराठी कामगार १० – १२ लाख रुपये घेऊन बाहेर पडतो. दुसऱ्या दिवसापासून बिहारी, बांगलादेशी अनाडी मजूर कंत्राटी कामगार म्हणून येतात. महिना रु. २००० ची बोली ठरते. मजूर जी हुजूर करतो. मजूर गेल्यावर मालक छद्मी हसतो. घणो फायदो!  घणो फायदो! असे चित्कारतो.

Scene 8 : दोन गुजराथी कारखानदार पार्टीत दारू पीत बसले आहेत. संवाद : मराठी मामाने VRS आपी दी. हवे भैया अने बांगलादेशी गुलाम “बे हजार रुपया महिना मा काम करेछे. हवे बऊ फायदो ठाये छे. बे वरस मा हू nariman point मा पाच घर लिदो. अने हावे मारी पासे ८ luxury car छे. तेव्हढ्यात अजून एक धनदांडगा धावत येतो, म्हणतो, “ओये मेरे गड्डी के नीचे अभी आते वखत चार पाच मजदूर कुचल गये. तिघे छद्मी हसतात. आणि म्हणतात, मुक्ती मिली सालोको. CHEERS!!!

Scene 9 : Officers सकाळी ९ ते रात्री १० पर्यन्त राबताहेत. पगार बक्कळ, पण त्याचा उपभोग घ्यायला वेळच नाही. बायकाही नोकरी करताहेत. त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही. couch potato मुले TV बघताहेत. आईवडील घरी आल्यावर मुले  त्यांच्याकडून वेळ  नाही तर  पैसे वसूल करतात. ICE CREAM, hotelling, credit  card, car लोन यामुळे कर्जाचा विळखा पडतो आहे. आणि उधाराची सूज शेवटी उरतेच.

श्री : काही विशिष्ट लोकांकडे लांड्या लबाड्या, भ्रष्टाचार करून पैसा एकवटणे. ते लोक त्यामुळे माजून जाणे; त्यांनी इतरांना भिकारी समजणे. हे बरोबर आहे का? ९०% लोकांकडे पैसे नसणे हे बरोबर आहे का?

सौ :  नाही, मुळीच नाही.

श्री : आणि त्या मजूरांबद्दल काय वाटत?

सौ : अरे कार्ल मार्क्सने असेच चित्र १५० – २०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये बघितले.

श्री : बरोबर. वैज्ञानिक आणि वैचारिक reneissance मुळे  युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. तिथल्या मजुरांना भांडवलदारांनी १८ – १८ तास राबवले होते, तुटपुंजे पगार दिले होते. मुंबई सारखी तिथेही झोपडपट्टी त्यावेळी युरोपात अस्तित्वात होती.

सौ : मजुरांचे हाल कार्ल मार्क्स ला बघवले नाहीत. त्याने “दास कॅपिटा” हा ग्रंथ लिहिला. आज त्याच्याच मुळे आपल्याला ८ तास काम, रविवारची सुट्टी व minimum  wages मिळत आहेत.

श्री : आणि ह्याच गोऱ्या भांडवलदारांनी त्यांच्या सरकारच्या सहाय्याने अख्ख्या जगाला गुलाम केलं. का? तर ह्यांच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल आणि कारखान्यातील उत्पादनासाठी बाजारपेठ हवी होती. त्याकरता त्यांनी अख्ख्या जगावर वरवंटा फिरवला. आपापसात दोन महायुद्ध लढले.

सौ : त्या पापाची फळे त्यांची आजची पिढी भोगते आहे. भणंग अवस्थेत चरस पिऊन कुठेही पडीक असण. लग्न नाही, संसार नाही, अनौरस मुळे, कुमारी माता, एड्स, पुरती बोम्ब आहे पाश्चिमात्य देशात.

श्री : आणि म्हणूनच तिथले सुसंस्कृत लोक, भारतीय संस्कृती, विवाह संस्था, परिवारातील ऋणानुबंध  संस्कार ह्यांचे गोडवे गातात. आणि आपण काय करतो आहोत?

सौ : पाश्चिमात्यांच्या वाईट गोष्टींचे अंधानुकरण. फुटकळ कारणांवरून घटस्फोट.  नवरा बायकोमध्ये समता आली हे चांगले झाले, पण त्याचा अर्थ नवऱ्याबद्दल किंवा  बायकोबद्दल आदरभावना न ठेवणे असा होत नाही.

श्री : अग! घटस्फोट हा आपल्या पिढीचा प्रश्न झाला. आता आपल्याकडे नवीन फॅडस आली आहेत. लिव  इन रिलेशनशिप, कुमारी माता, gay marriage .दळभद्री लक्षणे  नाही तर काय? आपली पवित्र, शुभ, मंगलमय संस्कृती सोडायची, आणि अभद्र, अमंगळ, कुलक्षणी भोगवाद, चंगळवाद घ्यायचा. स्वतःच्या मोहासाठी, लोभासाठी जगायचे आणि त्यातच मरायचे.

सौ : बर, अशांना काही सांगायला जावं तर ते आपल्याकडे कोणीतरी गावन्ढळ  असल्यासारखे पाहतात. आणि म्हणतात आमचा विश्वास नाही धर्मावर. धर्म वैगेरे its all क्राब. वेद काय भानगड आहे? लग्न, बंधन वगैरे बुरसटलेले विचार आम्ही मानत नाही.

श्री : हे राम! हे  काय चाललय? आणि हा बदल इतक्या झपाट्याने होतो आहे? २० वर्षांपूर्वी दारू पिणे हे असभ्य, असंस्कृत मानले जायचे. आता drinks चे विविध प्रकार त्यावरील चर्चा आणि त्याचे सेवन हे सभ्यतेचे “नवे” लक्षण झाले आहे. पुढच्या पिढीबद्दल भीती वाटते ग! आज पाश्चात्य भोगवाद काही लोकांपुरता मर्यादित आहे. पण अख्ख्या समाजात हा भोगवाद,  चंगळवाद पसरला तर काय होईल.

सौ : काय व्हायचंय? अनिर्बंध समाज, भोगी, उन्मत्त समाज. “माज असेपर्यन्त भोगी; अति भोग भोगून झाल्यावर माज उतरतो, आणि मग उरतो, रोगी; मानसिक आणि शारिरीक.

श्री : आणि असा बेताल, माजोरडा, चंगळवादी, उन्मत्त समाज पहिला की समजत की, आपल्या किंवा कोणत्याही धर्माने जी बंधने घालून दिली होती, ती समाजाच्या स्वास्थ्याकरता, कल्याणाकरता होती.

सौ :  अगदी माझ्या मनातलं बोललास. त्यातलं पहिलं बंधन होत, “मौजी बंधन” वयाच्या ७ वर्षांपर्यंत  लहान मुलांना खेळू, बागडू द्यावं; त्यांना थोर लोकांच्या गोष्टी सांगाव्या.

अजाणतेपणे चांगले संस्कार करावे. कारण लहान वयात केलेले संस्कार हे ओल्या मातीवर झाल्याने पटकन होतात आणि कायम टिकतात. ७ वर्ष पूर्ण झाल्यावर “मुलामुलींच्या” मजेवर बंधन आणून, म्हणजेच त्यांची मुंज करून, त माया ममता बाजूला ठेऊन सर्व मुलांना  गुरूगृही जावे लागे. मुलीही त्याकाळी शिक्षण घेत. त्याही कर्तुत्ववान असत. पण पुढे भारतावर झालेल्या अनेक आक्रमणांमुळे, मुलींना संरक्षित ठेवण्याच्या “माये” मुळे पुढे स्त्री शिक्षण बंद झाले.

श्री : आज ही ब्रह्मचर्याश्रमाची प्रथा सुरू करायला हवी. कारण आज आई, वडील नोकरी करतात. त्यामुळे मुलांवर  संस्कार करायला घरी आजी आजोबा नसले, तर कोणीच नसतं.  आणि त्यामुळे मुलं TV  बघत बसतात, आणि त्यातून नको त्या गोष्टी पटकन घेतात. त्यापेक्षा त्यांना मुंज झाल्यावर “चांगल्या” बोर्डिंग शाळेत टाकणच योग्य. त्यामुळे मुलांचे “अतिलाड” ही  कमी होतील.

सौ : पूर्वी गुरूगृही सर्व समान असत. राजाचा मुलगा असो वा गरीबाचा. “स्वावलंबन”, “समता”, “बंधुत्व”, “एकमेकांना मदत करून सत्कार्य करणे”, हे गुण अगदी नकळत, सहजतेने, NATURALLY मुलांच्या अंगात भिनायचे.

श्री : हो वेदकाळात जातीभेद नव्हता. हल्ली आहे त्याप्रमाणेच शिक्षण व आवड यावर आधारीत चातुर्वर्ण निश्चितपणे होता. चातुर्वर्ण जन्मावर आधारीत नव्हता. जन्माधिष्ठित जातीव्यवस्था ही नंतर काही स्वार्थी मंडळींनी नंतर काळाच्या ओघात रूढ केली.

सौ : गुरुकुलात सूर्य नमस्कार, योगाभ्यास, युद्ध शास्त्र, कृषिशास्त्र, वेदाभ्यास, राजकारण, गणित, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र इत्यादी विषय “वानप्रस्थी” गुरुजन, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शिकवत. मुलं “मानसिक”, “शारीरिक” आणि “व्यावहारिक” दृष्ट्या सक्षम बनत. ज्ञानाने परिपूर्ण होत.

श्री : अशी शिकून प्रगल्भ झालेली  मुलं “गृहस्थाश्रमात” प्रवेश. ते एका पवित्र  “विवाह बंधनात” बांधले जात. अग्निसाक्षीने एकमेकांना जन्मभर  “आदरपूर्वक” साथ देण्याची शपथ घेत. “कामवासना” ही नैसर्गिक असून, पवित्र विवाह बंधनात राहून एकाच जोडीदाराबरोबर कामवासनेचा उपभोग घ्या. पशूप्रमाणे वासनामय होऊ नका हा उपदेश असे.

सौ : असे जाणते, विद्याविभूषित स्त्री व पुरुष कर्तव्यरत होत. अगदी आजच्यासारखेच. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा सर्वार्थाने उत्कर्ष  साधत. राजाचा २५% कर देत. आणि शिवाय १० % देवळात देत असत.

श्री : ह्या पैशातून “नालंदा”, “तक्षशीला” सारखी विद्यापीठे, गरिबांसाठी अन्नछत्रे, वाटसरुंकारता धर्मशाळा चालवल्या जात असत. आज किती जण १० % त्याग करतात?

सौ  : हल्ली आपण सगळे “स्वकेंद्री” झालो आहोत. शेतकरी आत्महत्या करतोय. पण आम्हाला अन्नपदार्थ महाग मिळताहेत. ह्याचा अर्थ मधले दलाल, राजकारण्यांच्या आशीर्वादाने दोघांना नाडताहेत, तरी आम्ही गप्प. राजकारण्यांना जाब नाही विचारणार. मला काय त्याचे? मुंबईबाहेर लोड शेडींग आहे. मला काय त्याचे? मी भरपूर TV पाहणार. वीज जाळणार.

सौ  :  हा त्यागाचा वसा ख्रिश्चन लोक नेमाने पाळतात. ते लोक १० % नेमाने चर्चला देतात. त्यातूनच जगभर मिशनरी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये उभी राहतात. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

श्री : तर थोडक्यात,   गृहस्थाश्रमात अर्थार्जन करत, कौटुंबिक सुख घ्यायचं, कुटुंबाची वृद्धी, समृद्धी,  पालन पोषण करायचे आणि समाजासाठी १० % त्याग करायचा. आज आपण सर्वांनी ठरवलं,  की समाजासाठी १० % त्याग करायचा, तर किती चांगल्या गोष्टी घडू शकतील.

सौ : गृहस्थाश्रमानंतर ५५ – ६० वयाची माणसे वानप्रस्थी  होत.

Scene 10 : ६० वर्षांचे  पुरुष व त्यांच्या ५५ वर्षांची बायका  म्हणताहेत :

आजवर फक्त १० % त्याग केला. यापुढे  ५० % संपत्ती मुलामध्ये समान वाटून, ५० % संपत्ती समाजासाठी वापरणार.

एक जोडपं म्हणत : आम्ही गुरुकुलात शिकवायला जाणार.

दुसर जोडपं म्हणत : आम्ही ग्रंथालयाची व्यवस्था, लेखन  करायला जाणार.

तिसर जोडपं म्हणत : आम्ही धर्मशाळेची व्यवस्था बघायला जाणार.

चौथ जोडपं म्हणत : आम्ही रुग्णालयात सेवा करायला जाणार.

आमचं ज्ञान, अनुभव, पुढच्या पिढीला समाजाला उपलब्ध करून देणार. चांगले आदर्श पुढच्या पिढीच्या डोळ्यासमोर ठेवणार. त्यांना चांगले संस्कार देणार. ज्याने समाजाचे कल्याण होईल   आणि त्याच बरोबर आमच्या हातून सत्कर्म घडल्याचे समाधान आम्हाला मिळेल. स्वार्थाची कास हळू हळू सुटेल ज्यामुळे आमची पावले मुक्तीच्या मार्गाकडे वळतील.

श्री : अस २० – २५ वर्ष ज्ञानदान, लिखाण, सेवा इत्यादी सत्कर्म केल्यावर माणस ७५ व्या वर्षी संन्यास घेत.

Scene 11 : ७५ वर्षांचे स्त्री पुरुष म्हणताहेत :

आजवर आम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी व समाजासाठी जगलो. ह्यापुढे आम्ही  ईश्वर भक्तीत लीन होणार सर्वांसाठी “शांती, समृद्धी, स्थैर्य आणि आरोग्य याची प्रार्थना करणार. ध्यानधारणा करणार. कुंडलिनी शक्तीचा अनुभव घेत ईश्वरशक्तीमध्ये विलीन होणार.  मृत्यूपूर्वीच  सगळ्या इच्छा सोडून देणार. कारण मृत्युनंतर आत्म्याला देह  नसला तरी   त्याच्याबरोबर इच्छा मात्र तशाच राहतात. पण शरीर नसल्याने आत्मा इच्छा पूर्ण करू  शकत  नाही. आणि आत्म्याची  तडफड होते. ह्यालाच नरक यातना म्हणतात. आणि अशा नरक यातना भोगायची आमची इच्छा नाही, म्हणून आम्ही संन्यस्त होत आहोत.

श्री : असे वयोवृद्ध, तपोवृद्ध ऋषीमुनी तप करताना “ज्ञान कोष”, “विज्ञानमय कोषात” जात. कणादाला अणुरेणुचे कोडं अशाच ध्यानमग्न अवस्थेत सुटलं. आर्य भट्टला भूमितीची प्रमेय अशीच उलगडली. पाणिनीना व्याकरण असाच स्फुरलं. पतंजली मुनींना योगशास्त्र असच स्फुरलं.

सौ :  किती उच्च विचार. स्वतःचा उत्कर्ष करायचा, कर्तुत्व गाजवायचं, पण स्वार्थ साधल्यावर परमार्थही साधायचा. त्याग करायचा. स्वतः कधी माजायाचे नाही, दुसऱ्याला कमी लेखायचे नाही. “अर्थ”, “काम” हे पुरुषार्थ साधायचेच. पण त्याबरोबर धर्म आणि मोक्षही साधायचा. अशा रीतीने चारही पुरुषार्थ साधून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावायचा.

श्री : हिंदु धर्मात सांगितलेल्या चार चतुष्कांपैकी आपण तीन पाहिली १. चार वर्ण, २. चार आश्रम ३. चार पुरुषार्थ. चौथ चतुष्क म्हणजे चार ऋण १.मातृ – पितृ ऋण. २. ऋषी  ऋण, ३.समाज ऋण ४. देव ऋण सर्व कर्तव्य बजावत, ऋण फेडत, कृतार्थ राहत जीवन व्यतीत करून शेवटी अनंतात विलीन व्हायचे.  हाच खरा वेदीक धर्म हाच खरा हिंदू धर्म.

सौ : आपल्या धर्मात इतकं शास्त्रशुद्ध आणि practical ज्ञान सांगितलं होत. कस जगायचं?  चार आश्रमात आणि चार वर्णात; का जगायचं?     चार पुरुषार्थ गाजवत. कोणासाठी जगायचं? चार ऋण फेडण्यासाठी जगायचे.

श्री : हो पण नंतरच्या काळात धर्माच्या नावाखाली जातीयवाद, सतीची चाल, कर्मकांड हे काही स्वार्थी लोकांनी रूढ केलं.

सौ : महाराष्ट्रात  तसेच  भारतात अन्य ठिकाणी गेल्या ८०० – ९०० वर्षात अनेक संत झाले. त्यांनी लोकांना ह्या अनिष्ट प्रथांपासून दूर व्हायला सांगितले. मानवता/ माणुसकी म्हणजेच धर्म हे सांगितले.

श्री : अशा खऱ्या   वेदीक धर्माचे आजच्या युगात पालन करणारे लोक भरपूर आहेत. श्री वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, आगरकर, वीर सावरकर, गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, बाबा आमटे, स्वामी विद्यानानंद.

सौ : ह्या लोकांनी स्वार्थापेक्षा परमार्थाला, समाजाला, देशाला जास्त महत्व दिलं. म्हणूनच ही लोकं अमर आहेत.

श्री : वेदीक धर्म हा भांडवलशाहीतील कर्तव्यतत्परता, कार्यकुशलता   ज्ञान, विज्ञान, सुबत्ता ह्यांना पूजतो, त्याचबरोबर समता, बंधुता ह्या साम्यवादी विचारांनाही पूजतो. आणि म्हणूनच, तो capitalism  आणि communism ह्यामधला सुवर्णमध्य आहे. आजच्या कोलाहलात तोच एकमेव उपाय आहे.

सौ : दोन्ही “isms” मधल्या चांगल्या गोष्टी ज्याच्यात अंतर्भूत आहेत. आणि ह्या दोहोतील वाईट गोष्टी माहित असून त्यावरील उपाय सांगणारा वेदीक धर्म.

श्री : सबळ, सशक्त सन्माननीय शांतीचा भोक्ता वेदीक धर्म. भ्रष्टाचार व भोगवादावरील उपाय वेदीक धर्म.

सौ : परस्त्री मातेसमान मानणारा वेदीक धर्म, परधान लालसेला पाप मानणारा वेदीक धर्म. पाप पुण्याचे, योग्य, अयोग्य यांचे विश्लेषण देणारा वेदीक धर्म. बुद्धीला सन्मार्गाचे , सत्कर्माचे, समाजाभिमुखतेचे वळण लावणार वेदीक धर्म.

मनोज लोंढे

७२, क्लेमेंट कोर्ट, अमरहिंद मंडळासमोर,

गोखले रोड, दादर ( पश्चिम) ,

मुंबई ४०० ०२८

Written by Ashish

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझे २०१० साठीचे संकल्प, अगदि कारणांसहित.

एक मेळावा “मराठी ब्लॉगर्स” चा.