आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात ’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले. भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने केली आहेत. यावरून अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या. अर्थातच हिंदूंनी हवा तसा विरोध केला नाही. नेमाडे काय आणि चिदंबरम काय, दोघेही हिंदूच. हे हिंदूंचे दुर्दैव. आपलेच लोक आपल्या धर्मावर टिका करतात. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टिका करत नाही. कारण ते संघटित आहेत, आक्रमक आहेत. हिंदू हे अतिसहिष्णू आहेत. गृहमंत्र्यांनी जर “हिरवा आतंकवाद” असे म्हटले असते, तर ह्या हिरव्यांनी त्यांची लूंगी उचलून त्यांच्यावर कोणता प्रसंग आणला असता? याची परिपूर्ण जाणीव चिदंबरम यांना होती. म्हणूनच त्यांना भगव्या आतंकवादाचा साक्षात्कार झाला असावा, असो.
ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना बायबल आणि कुराण हे बाळकडू म्हणून पाजले जाते. तसे हिंदूंमध्ये होत नाही. हिंदूंना मुळात धर्मशिक्षणच मिळत नाही. म्हणूनच आज हिंदूंमध्ये ब्राम्हण द्वेष वाढत चालला आहे. काही स्वघोशीत ईतिहास संशोधक जन्माला येत आहेत. त्यांनी तर ब्राम्हणांना धारेवरच धरले आहे. मग दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसतात. समर्थ रामदास शिवरायांना कधी भेटलेच नसतात. ते औरंगझेबाचे हेर असतात. अशा काही भूलथापा हे नव-ईतिहास संशोधक मारत अहेत. रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे दोन्ही महापुरुष ब्राम्हण होते. म्हणूनच त्यांच्यावर असले आरोप होत आहेत. या ईतिहास संशोधकांना इतकेच सांगायचे आहे की त्यांनी भारताच्या ईतिहासाचा सखोल आभ्यास करावा. परकिय आक्रमणांनी हिंदूस्तानात सर्वात जास्त कत्तल ब्राम्हणांची केली. कारण त्यांना ठाऊक होते की ब्राम्हण हे हिंदू धर्माचे तारक आहेत. आज महाराष्ट्राच्या एक टक्का लोकसंख्या सुद्धा ब्राम्हण समाज राहीला नाही. ही हिंदूंची शोकांतिका आहे. इथे इतकेच सांगावासे वाटते की आर्य चाणक्यांपासून ते सावरकरांपर्यंत देशासाठी त्याग करणारे ब्राम्हण होते.
गांधी-नेहरू कुटूंबांनी हिंदूस्तानची सूत्रे हातात घेतली आणि हिंदूस्तानचा इंडिया कधी झाला कळलेच नाही. आज हिंदूंवर पक्षपाती असण्याचा आरोप होत आहे. भारताचा राष्ट्रपती मुसलमान होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान होतो आणि तरीसुद्धा हिंदू हे पक्षपाती कसे? कधी विचार करून पहा, “बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले” अहो विचार काय स्वप्न सुद्धा पडणार नाही. जगात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात. ख्रिश्चन हे पहील्या क्रमांकावर असून त्यांची अनेक राष्ट्रे आहेत. मुस्लिम हे दुसर्या क्रमांकावर असून त्यांचीही अनेक राष्ट्रे आहेत. बौद्ध हे तिसर्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे सुद्धा काही देश आहेत. हिंदू हे चौथ्या क्रमांकावर असूनही त्यांचा एकही देश ह्या भूतलावर नाही. होय, आपण इंडियात राहतो, हिंदूस्तानात नव्हे. हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहीजे.
जगातील बावन्न मुस्लिम राष्ट्रांपैकी असे एकही राष्ट्र नाही जे हज यात्रेसाठी विशेष सवलती देते. पण भारतात मुस्लिमांना अनेक सवलती आहेत. १९४७च्या फाळणीनंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज केवळ १ टक्का उरले आहेत. बांगलादेशात ३० टक्के असलेले हिंदू आज फक्त ७ टक्के इतकेच आहेत. याउलट भारतात मुस्लिमांची संख्या वाढतच आहे. कसाब आणि अफ़जल गुरुला सरकार पोसत आहे आणि एकिकडे हिंदू धर्माभिमानी साध्वी प्रग्न्यासिंग यांचा छळ होत आहे. बदोद्दात रस्ता रुंदीकरण्यासाठी बारा मंदिरे पाडली. तोपर्यंत सर्वे शांत होते. पण दोन दर्गे पाडायला जाताच दंगे उसळले. तरीसुद्धा आम्ही हिंदू पक्षपाती कसे हो? कारण आम्ही सहीष्णू आहोत म्हणून?
हिंदूंमध्ये अनेक जाती असल्यामुळे ते संघटीत होऊ शकत नाही. ही परधर्मीयांनी मारलेली थाप आहे आणि आपण ती वस्तुस्थिती मानत आलो अहोत. लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये ६४० जाती आहेत आणि ख्रिश्चनांमध्ये २४२ पंथ आहेत. तर मग हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अशी बोंब का? ख्रिस्ती धर्मात जाती नाहीत, अशी म्हणणारी मदर टेरेसा, जाती-निहाय आरक्षण मागासवर्गीय ख्रिस्त्यांना मिळावा म्हणून उपोषणाला बसली होती. हा इतर धर्मीयांचा डाव आपण ओळखला पाहीजे.
जगाच्या ईतिहासात हिंदूंनी आपला धर्म कधीच कुणावर लादला नाही. जग जिंकण्याचाही अट्टाहास कधी केला नाही. हिंदू धर्म पसरावा म्हणून मिशनरी, मदरसे उभारले नाहीत. जो कुणी हिंदू नाही तो काफ़र आहे, असे कधीच मानले नाही. उलटपक्षी त्याला आपला बंधूच मानले आहे. त्याचे स्वागतच केले आहे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा इतर धर्मीयांनी नेहमीच फायदा घेतला आहे. हिंदूंचा छळ केला आहे. यावर एकच अमोघ उपाय “हिंदू संघटन”.
इथे विंदा करंदीकरांची एक कवीता आठवते “माझ्या मना बन दगड”. करंदीकरांच्या कवीतेतलं मन हे जणू हिंदू मन आहे असे वाटते. खरेच हिंदूंना आता कणखर व्हायलाच हवे. विंदा करंदीकरांच्या शैलित सांगायचे झाले तर, हिंदू मना बन दगड…….हिंदू मना बन दगड…….
लेखक: जयेश मेस्त्री
संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
हा लेख महाराष्ट्र माझा साठी जयेश मेस्त्री यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा.
हिंदू धर्मगुरूंनी धर्मप्रसार बेरजेच्या पद्धतीने केला नाही त्याची ही फळे आहेत. माझा धर्म माझ्या स्वतःपुरता आणि “माझ्या” माणसांपुरता अशी मानसिकता ठेवली. धर्माच्या वाढीकरिता धर्मात अन्य लोकांना सामावून घेण्याचा जो द्रष्टेपणा ख्रिश्चन धर्मगुरूंनी दाखविला आणि धर्मप्रसारक नेमले तसे हिंदू धर्मात केले गेले नाही. याउलट “धर्मातून काढून टाकणे” म्हणजे काहीतरी ग्रेट केले अशी त्यांची मानसिकता होती. तसेच, काही विशिष्ट जन्मसंस्कार फक्त ठराविक वर्गापुरते मर्यादित ठेवले. उदाहरणार्थ गळ्यात जाणवे घालणे, मुंज करणे हे हिंदू संस्कार सर्वांना लागू केले नाहीत. धर्मिक कार्य करण्याचा मान सुद्धा फक्त ठराविक जातीकडेच गेला. त्यात सर्वांना सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे “आम्हीच खरे हिंदू व बाकी सगळे केवळ म्हणण्यापूरते हिंदू” असा संदेश बहुजन समाजात गेला. परिणामी हे बाकीचे लोक हिंदू धर्मापासून अलिप्त होत गेले (मग त्यातील असंख्य जणांना ख्रिश्चन धर्मियांनी आपलेसे केले).
स्वातंत्र्यलढ्यामध्ये सुद्धा सुरवातीला ब्राह्मण समाजाचे वर्चस्व होते. कारण त्यायोगे ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरण करून घेता येईल व त्यानंतर राजकीय वर्चस्व आपलेच राहील ही नीती होती. यासाठीच बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यात सामावून घेतले गेले नाही. तो पिचेलेलाच राहिला. महात्मा गांधीनी ह्या समाजाला जागे केले व चळवळीत सक्रीय केले. त्यामुळेच मग ह्या वर्गाच्या पायाखालची वाळू सरकू लागली. गांधींमुळे मूळ मनसुब्यांनाच असा सुरुंग लागल्याने पुढे गांधीहत्या झाली. याच कारणास्तव महात्मा गांधींची हत्या करण्याचे प्रयत्न त्यापूर्वी पण केले गेले होते. पण पाकिस्तान निर्मितीला देण्यात येणारा पैसा हे केवळ निमित्त ठरले आणि ही हत्या घडवली गेली. असो. अर्थात हा सगळा इतिहास झाला.
तात्पर्य, हिंदू धर्मगुरूंनी द्वेषमुलक वृत्ती सोडून सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवला असता तर आज खूप वेगळे चित्र पाहायला मिळाले असते.
हिंदू धर्मा बद्दल तुमचा खूपच वैचारीक गोंधळ उडालेला दिसतो. हिंदू धर्मा मद्दे काही वाईट प्रकार आहेत, हे मान्य. पण कोणत्या धर्मात नसतात?. हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे. भारताचा स्वातंत्र्य ईतिहास सुद्दा तुम्हाला माहीत नाही. गांधी आणि नेहरुंमुळे बर्याचशा आपत्तींना सामोरे जावे लागले. भारताचा स्वातंत्र्य ईतिहास, प्राचीन आणि अर्वाचीन ईतिहासाचा व्यवस्थित, निपक्षपातिपणाने आभ्यास करावा. काही अडल्यास लेखाच्या खाली माझा संपर्क आहे. संपर्क साधावा. आणि हो… मी सुद्दा बहूजन वर्गाचा आहे. धन्यवाद
जयेश मेस्त्री
barobar lihla aahes mitra tujha wishleshan barobar aahe…keep it upp!!
THANKS NAMSEV
** हिंदू धर्मा बद्दल तुमचा खूपच वैचारीक गोंधळ उडालेला दिसतो.
=> गोंधळ आपला उडाला आहे म्हणूनच “बन दगड” असली विधाने आपण करीत आहात. मी मांडलेले विचार स्पष्ट व तर्कशुद्ध आहेत. कसलाही गोंधळ त्यात नाही. फक्त परखडपणे मांडलेले आहेत. परखड परीक्षण मान्य नसेल तर “मना बन दगड” म्हणून गळा काढण्यात पण काही अर्थ नाही.
** हिंदू धर्मा मद्दे काही वाईट प्रकार आहेत, हे मान्य. पण कोणत्या धर्मात नसतात?
=> “दुसरा माझ्यापेक्षा जास्त चोरी करतो म्हणजे मी थोडी चोरी केली हे योग्यच आहे” असे म्हणणे किती बरोबर ?
** हिंदू धर्म समजण्यासाठी पात्रतेची जरुरी आहे.
=> अगदी ह्याच मानसिकतेमुळे हिंदू धर्म आज रसातळाला जायची वेळ आली आहे. माझी पोष्ट नीट वाचा.
** भारताचा स्वातंत्र्य ईतिहास सुद्दा तुम्हाला माहीत नाही. गांधी आणि नेहरुंमुळे बर्याचशा आपत्तींना सामोरे जावे लागले.
=> गांधींच्या पूर्वीचा स्वातंत्र्य लढा पहा. गोखले आगरकर टिळक. बहुजन समाजाला त्यात किती स्थान होते? ह्याचे उत्तर देऊन पहा. मग “गांधीमुळे बऱ्याच आपत्तींना
सामोरे जावे लागले” असा इतिहास तुम्हाला शिकविला गेला आहे तो बरोबर आहे का पहा.
** भारताचा स्वातंत्र्य ईतिहास, प्राचीन आणि अर्वाचीन ईतिहासाचा व्यवस्थित, निपक्षपातिपणाने आभ्यास करावा. काही अडल्यास लेखाच्या खाली माझा संपर्क आहे. संपर्क साधावा.
=> इतिहासाचा निपक्षपातिपणाने अभ्यास करणे म्हणजे काय हो? तर तो ज्यांनी लिहिला आहे ते बरोबर आहेत असे समजून चालणे, अशी एकंदर तुमच्या लिखाणावरून तुमची समजूत झालेली दिसते. “गांधी आणि नेहरुंमुळे बर्याचशा आपत्तींना सामोरे जावे लागले” अशी अनुमाने काढणे ही आपली निपक्षपातिपणाने अभ्यास करण्याची कल्पना आहे का? असो. इतिहास हा आंधळेपणाने न वाचता स्वत:ची तर्कशक्ती जागृत ठेऊन विचार केला तर काही अडतही नाही वा कुणाला संपर्क करण्याची पण गरज भासत नाही. प्रयोग करून पहा. आपल्या इतिहास संशोधन कार्यास शुभेच्छा.
** आणि हो… मी सुद्दा बहूजन वर्गाचा आहे.
=> असाल. आणि “सुद्धा” म्हणजे? कारण मी तर नाही आहे.
nemkay hyach mansikate mule hindu chi pichehat zali.
kuthlya maanasikate mule?
Apan Hindu lok aplya aplyatach Bhandat aahot……..HINDU SANGHATAN mahatvache aahe jyane Desh Shaktishali hoil…….Jati ani junya chuka (mistakes) bajula theuyat ani SARV HHINDU EK HOUYAT…..!!!!
atishay kami knowladge ahe tumhala itihasa baddal. jara nahi khupach abhyas karava lagel tumhala.
@Ashish.. आपला फारच गैरसमज झालेला दिसतो आणि इतिहासाचा अभ्यासही कमीच दिसतो म्हणून अशी विधाने केली आहेत… जर कोणत्या एका वर्गाने इतिहास स्वत ला पाहिजे तसा लिहिला असता तर मग बाकीच्या कुणाचे नाव पण त्या इतिहासात आले नसते…इतिहासामध्ये सर्व जातीच्या लोकांची नवे आहेत तसेच काही इतर धर्मीयांची पण आहेत. तसेच गांधींनी आणि नेहरूंनीच देशाची पूर्ण वाट लावली आहे. जरा डोळे उघडून नेहरूंच इतिहास बघा..सरदार वल्लभ भाई पटेल हेच कोन्ग्रेस कडून पंतप्रधान म्हणून निवडून आले असताना फक्त गांधींमुळे नेहृला पंतप्रधान केले गेले…गांधी मुस्लिमांसाठी वाटेल ते करायला तयार होते.. पण मुस्लीम अजिबात त्यांना मानत नवते..गांधी म्हणाले होती कि भारताचे तुकडे होण्या आधी माझे तुकडे करावे लागतील .. पण असे काही झाले नाही तरी पण गांधी मुस्लिमांसाठी पाकिस्तान साठी ५५ कोटी रुपये देत होते… हिंदुंवर पाकिस्तानात इतके अत्याचार झाले त्याविषयी त्यांना काही वाटले नाही…गांधी मेले त्यानंतर पाकिस्तान ने म्हणाले कि भारतातील एक हिंदूंचा नेता गेला… त्यामुळे हिंदूंनी एकत्र होण्याची गरज खूप गरज आहे..
agdi sahmat ahe tumchya mhanyala
namaskar varil vidhane vachli far vait vat te,ki lok aplyala mahi nastana kahihi boltat.thoda nahi saglach abyas kela pahije yani.tilak ani goghle yanich mahatma phule yana shala suru karnyasathi jaga dili hoti,he swataha phule ni lihile ahe ani MARATHITACH vachata yeil saglyana.ek udaharandeto——Shivaji maharajani Ashta pradhan mandalat brahmin lok ghetle tyacha tyana fayda zala pan tyanchya maghari sambhaji maharajani hi paddhat band padli tyamule kay zale he sangaychi garaj nahi.ani ho brahmin lokanich magas vargiyana tyancha haakk milave mhaun prayant kela,savarkar he tyatilach ek. bhartachya itihas ha sudha brahmin lokanich gajavla.mangal pande,tatya tope,peshwe,tilak ,savarkar,goghle, sane guruji, chandrashekhar azhad,bhagatsingh,rajguru,zashichi rani,ajun kiti nave sangu brahmin lokanchi.ani ha purava bhartabaheril lokani dila ahe bar ka…..ani brahmin lokani itihas lihla ase jar aste.tar shivaji maharaj kon hote he sudha kalale naste. brahmin lok he annyaya virdha ladhtat..ani hya bakichya jati ahet tya fakta swatachya faydyasathi padlya ahet .vastvik hindustanat fakt hinduch pahijet bakiche have kashala????????ani gandhi hatya navti toVADH HOTA VADHJA jar te jivant rahile aste tar goa evdhi jaga milali asti kinvha kay sangta yet nahi.itar sanghatna brahmin samajya virudhha kahi lihitat.pan ek lakshat thevnya sarkhe ahe ki ha samaj atishay shant ahe.khun darode balatkar hyat brahmin kuthech nasto.ani ho deshpande,kulkarni hyani bombphot kela ashi batmi aj parenta kadhi vachi ahe ka???????jativad ha vegla ani national vishay ahe. pan hindustanat fakta hinduch hote baki koni nahi. hi sagle londhe baherun ale ahet tyana ata haklnyachi garaj ahe.tevha sarya hindustanatil lokani ekatra yene garjeche ahe.
hindu dharamat jati prata hotya bal vivah padat hoti stree la shikshanacha adhikar navta jag jheva pragati karat hota theva amhi jati palat hoto
jagat barech dharm ahet .bhrtatil saskurti hindhu dharmpasun japali jate .hindhu dharma prtek dharmache palan karto .parantu dharmn madhe andhsradha asalyne lokanch dharmakade bhagnycha drushtikon vegala zalela ahe ,maza mate jagacha padhewar yekach dharm ahe to manje manus .mansacha manuspan ashel tarach sarwa dharm sama bhawa hoil .
AVDHUT TU ETIHASABADDA KHUPACH MAGAS DISTOS.
TU MHANTOS BHAGATSING BRAMHAN HOTA. ARE TO SHIKH HOTA. KAHITARI FEKU NAKOS. ANI JYANA GANDHI- NEHRUCHA PULAKA AHE TYANI”फाळणीचा दिवस” PUSTAK WACHA. AKKAL WADHEL
Hindu religin is under threat. Hindu spritual leaders are defamed intentionally. hari Om.