in

’झेंडा’ विडीओ

आपल्याला झेंडा हा चलचित्रपट कसा वाटला ते अम्हा सर्वांना कमेंट्स मधुन सांगा..

अवधुत गुप्ते दिग्दर्शीत ’झेंडा’. प्रोमोज तर जबरदस्त आहेत. पहा तुम्हाला हि नक्कि आवडेल.

जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना.. या शिवसेनेच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या आणि गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मतदारांसाठी प्रभावी ठरलेल्या प्रचारगीताचा सर्वेसर्वा प्रसिद्ध युवा संगीतकार अवधूत गुप्ते विधानसभेच्या रणधुमाळीत मात्र फारसा कुठे दिसला नाही. मात्र येत्या दोन आठवडय़ांत त्याने दिग्दर्शित केलेला ‘झेंडा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून खात्रीलायक सूत्रांनुसार त्यात उद्धव आणि राज ठाकरे यांतील जोरदार राजकीय संघर्षांचा संदर्भ आहे.
विधानसभेच्या रणसंग्रामात उद्धव आणि राज यांनी परस्परांवर केलेले टीकेचे शरसंधान एवढे जोरदार होते की, एरव्हीचा पक्षीय संघर्ष बाजुला पडून याच टीकायुद्धावर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले होते. याच पाश्र्वभूमीवर आता अवधूतचा ‘झेंडा’ येतो आहे. मात्र चित्रपटात उद्धव – राज संघर्षांचा भाग असूनही हा चित्रपट मतदानाआधी प्रदर्शित करण्यात आला नाही हे विशेष.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या कथासूत्रातून मराठी अस्मितेचा संदेश दिला गेल्याने त्याचा फायदा उघडउघड राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झाला होता. मराठी बाण्याचा या चित्रपटातील संदेश एवढा जोमदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता की, चित्रपटगृहांत राज ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा प्रेक्षकांकडून दिल्या जात. या पाश्र्वभूमीवर ‘झेंडा’ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी प्रदर्शित झाला असता तर त्याचा नेमका काय परिणाम झाला असता, हे गुलदस्त्यात ठेवून हा चित्रपट विधानसभा निवडणुकांनंतर प्रेक्षकांना सामोरा जाणार आहे.
या चित्रपटात उद्धव आणि राज यांच्या संघर्षांचा कोणता भाग आला आहे, असे अवधूतला विचारले असता त्याने या संदर्भात सूचक मौन पाळले. चित्रपटाची कथा चार तरुणांची असून गावाकडून मुंबईत आल्यावर या महानगरातील सामाजिक, राजकीय घडामोडींचा त्यांच्या प्रवासावर काय परिणाम होतो, त्यांच्या आयुष्यावर हे संदर्भ काय परिणाम घडवून जातात हे सारे चित्रपटात आले आहे, असे अवधूतने सांगितले.
महानगरात जगण्याच्या धडपडीत नेमका कोणाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा, ही तरुणांची द्विधा मन:स्थितीही या चित्रपटात आली आहे, असे अवधूतने सांगितले. याच मन:स्थितीवर आधारित ‘विठ्ठला घेऊ कोणता झेंडा’, असे एक गीतही या चित्रपटात आहे. हा विठ्ठल पंढरपुरचा की ‘मातोश्री’वरचा या प्रश्नावर ‘ते प्रेक्षकांनी ठरवायचे आहे’, असे अवधूत म्हणाला.

7 Comments

Leave a Reply
 1. zenda film shi me connected ahe indirectly thru its makin due to my husband who has worked as asst.art director for this film.i hope jevdi mehnat gheun saglyani hya film sathi pramanik panane kam kela ahe tevdhach prachand pratisad hya film la milava.its bad that people who work so hard day and night always go unhindered.i hope all the efforts of all the technical departments are praised this time thru this film.i feel proud to say that we r connected to marathi film industry all the best for this very special movie jhenda.

  • @समीपा

   या चित्रपटाचे प्रोमोज पाहुनच मी हा चित्रपट पाहण्यास उतावळा झालो आहे, माझ्या अपेक्षे प्रमाणे तर हा “सरकार” ला टक्कर देणारा चित्रपट ठरावा. आणि नक्किच हे नाकारुन चालणारच नाहि कि जेवढे श्रेय हे पडद्यावरच्या कलाकारांचे असते तेवढेच श्रेय हे पडद्या मागील कलाकारांचे हि असतेच असते. ८ जनेवारिच मि वाट पाहत आहे.

   आशिष कुलकर्णी,

   महाराष्ट्र माझा.

 2. zenda film chan ahe mi 1 mansainik ahe pan shevat changla nahi dila ani mi film ka changli ka bollo karan konitari mhatle ahe (nindkache ghar asave shejari)aamche raj saheb tase nahich

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)

आप्त ! (ब्रिटिश नंदी)