in

महा – बी (ब्रिटिश नंदी)

आम्ही – नमस्ते अमिताभजी…. येऊ का ‘जलशा’त?

अमिताभजी – आँय? ये भी कोई पुछने की बात हुई? अमा आ जाओ यार! आँय!

आम्ही – अभिनंदन!

अमिताभजी – किस लिये? क्यु? का? व्हाय? आँय!

आम्ही – तुम्ही शेतकरी झालात!!

अमिताभजी – मी हाडमासाचा शेतकरी आहे! हड्डी का किसान! पहले भी मे खेती करता था, आज भी मै खेती करता हू, और कल भी मै…

आम्ही – ठीक ठीक! पण का हो अमितजी शेतात जाता का कधी तुम्ही?

अमिताभजी – शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे! अँक्टिंग साईड बिझनेस आहे!!

आम्ही – आँ? अहो, तुम्ही बिग बी आहात ना?

अमिताभजी – अफकोर्स! बिग बी याने महाबीज! बियाणं पेरून धान्य पिकवणारा मोठा शेतकरी म्हंजे बिग बी!! क्या समझे?

आम्ही – कुछ भी नही समझे! कठीण आहे!!

अमिताभजी – क्या कठीण है? काळ्या मातीत मातीत तिफण चालती.. हे गाणे कधी ऐकलंय का कधी?

आम्ही – (खचलेल्या आवाजात) ऐकलंय!

अमिताभजी – माझ्या आवाजात ऐका! चल शिरपा.. सुद्धा मी झकास म्हणतो! माझ्या बाराबंकीच्या शेतात मोट मारताना ही गाणे तोंडपाठ करुन टाकली मी!

आम्ही – (खोल आवाजात) हे सगळं कसं काय जमवता?

अमिताभजी – सोप्पंय! बी पेरायची आणि पावसाची वाट बघत बघायची! मधल्या काळात अँक्टिंग करायची!

आम्ही – उरलेल्या दिवसात काय करता?

अमिताभजी – तेवढा वेळ हाँस्पिटलांमध्ये अँडजेस्ट होऊन जातो!

आम्ही – छे! छे! भयानक चित्र आहे! तुम्ही मोटा मारतांय, जयावैनी बांधावरनं डोक्यावरनं झुणका भाकरीची दुरडी घेऊन चालत येताहेत! अभिषेक बैलांच्या शेपट्या पिरगाळतोय! कठीण आहे हो पचवणं!

अमिताभजी – मलाही! एकंदरीतच मला काहीही पचणं तसं कठीणच जातं! कचोरीसुद्धा!!

आम्ही – शेती करणं सोप्प नाही हां, महाराष्ट्रात!

अमिताभजी – ज्याला अभिनय येतो, त्याला काहीही सोपं आहे.

आम्ही – अहो आत्महत्या करायची पाळी आलीये आमच्या महाराष्ट्रात! शेती कसली करताय?

अमिताभजी – (खोल आवाजात) इन्कमटॅक्सवाल्यांपेक्षा शेती परवडते हो! आयकर भरा, नाहीतर नांगर धरा!! काय!

– ब्रिटिश नंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कासरा!

पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास