in

माझे २०१० साठीचे संकल्प, अगदि कारणांसहित.

सध्या एक इमेल बराच धुमाकुळ घालत आहे. तोच आपल्या साठि इथे सादर करत आहे. आणि हो नुसते वाचु नका तर वाचुन झाल्यावर तुमचे नववर्षाचे संकल्प आम्हाला कळुदेत अगदि कारणांसहित.

माझे २०१० साठीचे संकल्प इथे देत आहेनुसते संकल्प सांगण्यात काय मजाम्हणुन त्याची कारणं पण देत आहे.
संकल्प . – सारेगमपाचं कुठलंही पर्व बघणार नाही.
कारण
. – पल्लवी जोशी – आपण तिच्या घरी आरतीला बसल्यासारखं ती टाळ्या वाजवायला लावतेएकदा गीतकारासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.मग संगीतकारासाठी टाळ्याझाल्या पाहिजेतमग गायक …. मग वादक…. मग प्रेक्षक….. मग श्रोते…… मग मान्यवर….. मग तीस्वत:….. असं नुसत्या टाळ्याच टाळ्या…. ! बर नुसत्या टाळ्यानाही तर जोरदार टाळ्यावाट्टेल ते मॅचिंग करुनवाट्टेल त्या गाण्याला,वाट्टेल त्या शब्दांनीतिला का ठो कळत नसतानामळमळेल इतकं कौतुक करतेअगदी कुणीढेकर जरी दिला तरी, “काय अप्रतिम ढेकरदिलास आणि माझ्या खुप आवडीच्या ढेकरांपैकी एक ढेकर दिलास म्हणुन तुझे विशेष आभार…. ” काय बोलयचं ह्यावर.. ?

. – अवधुत गुप्ते तिचा मोठा भाऊ – “अरे… अरे… अरे… काय भन्नाटसुसाटअचाट गायलास… मित्रा….. कानाचे पडदे पार फाडलेस बघअरे काय साजुक खाऊन नाजुकगळ्यातुन चाबुक ढेकर दिलास गड्या…. एक नम्बर.. माझ्या एकातरी गाण्यात हि हार्मनी वापरणार बघमी..

. बाळासाहेब मंगेशकर – (खयाल गायकीशोभा गुर्टुतंबोयाचा तारास्वातंत्र्यपुर्व काळज्ञानेश्वर महाराजआकाशवाणी अशा विविधविषयांवर बोलल्यानंतर सुमारेपावणे दोन तासांनी…) “…१९६३ मध्ये लताच्या रेकॉरडींगच्या वेळेस गाणं गाताना तिला असाच विलंबीत ढेकरआला होतात्यावेळेस मी तिच्याकडुन वरचा लावुन घेतलाआणि….. …………………………………………………..
…………………….. ………………………असो…. !

संकल्प
. – बायकोशी कधीही भांडणार नाही.
कारण – ह्याची सुमारे ६७ कारणं देऊ शकेन पण तुर्तास…..
. – ती तिच्या चुका मान्य करत नाही.
. – जीभेला हाड नसतंहे ती सिद्ध करते.
. – परवा तिनी तिचे सगळे दोष मान्य केले पण पुढे म्हणाली की, ” माझ्यात हे सगळे दोष आहेतच म्हणुनच तर तुझ्याशी लग्न केलयजरहे दोष नसते तर कुणीतरी बरानसता का मिळाला आणि एकदा जरा आरशात……..
……………असो…. !

संकल्प
. – खोटं बोलणार नाही.
(हे जरा अशक्य कोटीतलं होतय काबर मग … खोटं बोलुन ऑफीसला दांडी मारणार नाही.)
कारण
. – हयात व्यक्तींना मारल्यानी ब्रह्महत्येचं पाप लागतं.
. – ह्या दांडीची नोटीस देता येत नाही त्यामुळे सुट्टीची खातरी नसतेती मिळालीच तर पकडले जाण्याची भिती दिवसभर वाटत राहते.सुट्टीचा आनंद मिळत नाही.
. – नेमकं बॉसच्या हातुन पण त्याच दिवशी ब्रह्महत्येचं पातक घडले असल्यास तो तिथं थेटरात भेटण्याची दाट शक्यता असते. ..आणि दुःखविसरायला आलोय हे कारणत्याला पटत नाहीत्याचं तिथं येण्याचं कारण सांगायची त्याला गरज नसते.
. – खरच ती हयात व्यक्ती कधी गचकली तर जाणं अवघड होतं आणि मग नविन हयात व्यक्तीच्या हत्येचं पाप….
…………………असो…. !

संकल्प
. – दारु पिणार नाही.
कारण
. – तोल जातो.
. – पैसे जातात
. – चव जाते.
. – शुद्ध जाते.
. – दृष्टी जाते.
. – मजा जाते.
. – इज्जत जाते.

संकल्प
. – कितीही ओळखीची वाटली तरी समोरची बाई जोपर्यंत ओळख देत नाही, तोपर्यंत मी बघुन हसणार नाही.
कारण
. – तिच्याकडुन डाव्या गालावर
. – संधीसाधु समाजाकडुन सर्वांगावर….

संकल्प
. – पुण्यातल्या पीएमटी बसमध्ये पाऊल टाकणार नाही. (बसमध्ये बसणार नाहीअसे लिहले नाहीये कारण आजपर्यंत मलाकधीच बसायला मिळालेनाहीये.)
कारण
. – उरलेले सुट्टे पैसेचपला आणि सगळी हाडं परत मिळत नाही.
. – हव्या त्या स्टॉपवर उतरता येत नाहीजिथं उतरावं लागतं तिथं खाली कुणाची तरी दुचाकी असतेचतो जिथं सोडेल तिथुन परत (बसकरुनचयावं लागतं.
. – पुढुन चढुन देत नाहीतसर्कस करायचा अनुभव नसल्यास मागुन चढता येत नाहीड्रायव्हर तोंडात गुटका असल्याने बोलत नाहीकंडक्टरऐकत नाही.
. – तिकीट चुकवुन…. म्हणजे चुकुन राहिल्यास चेकर बापाचा उद्धार….
………………………..असो…. !

संकल्प
घड्याळ बघता, पिशवी घेता, सुट्टॆ पैसे घेता, वाईट मूड नसेल तर, अपमान पचवण्याची तयारी नसेल तर आणि दुसरा पर्याय असेल तरपुण्यातल्या पितळेबंधु मिठाईवाले ह्या दुकानात पाऊल टाकणार नाही.
कारण
. – गर्दीत ताटकळत उभं राहुन चक्कर येते पण आपला नंबर येत नाही.
. –  वाजला की काहिही झालं तरी दुकान बंद होते. (माग एकदा त्यांच्या दुकानाला आग लागली होती म्हणेआगीचा बंब पोहचता पोहचता वाजला तर ह्यांनी दुकान बंद केलंआणि म्हणाले आता वाजता या….  वाजता बंद म्हणजे बंद !! )
. – पिशवी विसरली तर ते देत नाहीतअंगुर बासुंदी पण ओंजळीत घ्या म्हणतातपिशवीचे पैसे देतो म्हणालो तर आमचा धंदा मिठाईचाआहेपिशव्या विकण्याचानाहीअसा आपमान करतात.
. – सुट्टे पैसे नसतील तर त्याच्या बदल्यात श्रीखंडाच्या गोळ्या देतात.

संकल्प
. – योगासनं आणि व्यायाम करणार नाही.
कारण
. – योगासनं करताना काही चूक झाली तर ते सोडवताना खुप त्रास होतोकाल डाव्या पायाचं तिसरं बोट मी उजव्या हाताच्या करंगळीतपकडल्यानंतर पाठीचा मणकामाकडहाडात अड्कुनच बसला हो…. बायकोनी पेकाटात लाथ घातली तेंव्हा…… असो
. – व्यायाम केला की खुप थकायला होतं…. गळुन जायला होतं…. चक्कर येते….. आजारी पडायला होतंतब्येत बिघडते.
. – इतकं करुन कुणी एक झापड जरी मारली तरी…..
………………………..असो…. !

संकल्प
. – हिमेश रेशमीयाच्या आवाजातलं गाणं आणि सुनील शेट्टीचा अभिनय ह्यांच्या वाटेला जाणार नाही.
कारण
. – डीप्रेशन येतं….
. – बीपी वाढतं….
. – डोकं फोडावसं वाटतं (स्वतःचं)
. – जीव घ्यावासा वाटतो (त्यांचा)
. – कपडे फाडावेसे वाटतात (पुन्हा)

नुसते वाचु नका तर वाचुन झाल्यावर तुमचे नववर्षाचे संकल्प आम्हाला कळुदेत अगदि कारणांसहित. (अहो कंमेंट्स मधुन)

4 Comments

Leave a Reply
 1. हा लेख मायबोली वर पहिल्यांदा वाचला होता. ओरिजिनल लेखक मायबोलीकर आहे . नांव आठवत नाही, पण एकदम बेस्ट पोस्ट!!

  • धन्यवार महेन्द्र,

   कुणालाहि जर मुळ लेखकाचे नाव माहित असेल तर त्वरित कळवा. पण महेन्द्र तुम्हि तुमचे नववर्षाचे संकल्प नाहि कळवले आम्हाला?

 2. कळवण्यास आनंद होत कि आपल्या एका “अनामिक” वाचकाने या सर्व संकल्पांचे, मुळ लेखकाचे नाव कळवले आहे,
  मुळ लेखकः धुंद रवी. (हे देखील एक टोपण नावच वाटत आहे), वरिल लेखाचे सर्व श्रेय महाराष्ट्र माझा धुंद रवी यांस देत आहे.
  आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

www.GoogleGoogleGoogleGoogle.Com

मोहमाया झाली वेडी