in

यू-ट्युब वर आता संपुर्ण चित्रपट

यू-ट्युब
यू-ट्युब

बॉलिवुड चे आघाडिचे चित्रपट निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी नुकतेच जाहिर केले आहे कि त्यांचा चित्रपट ३-ईडिअट्स हा यू-ट्युब वरती पुर्ण डाऊनलोड साठी उपलब्ध करुन देण्यात येईल.थ्री-इडिअट्स हा यू-ट्युब मधुन डाऊनलोड करुन घरी पाहता येऊ शकेल.

अता पर्यंत यू-ट्युब वरुन आपण विडिओज डाऊनलोड करु शकत असु पण काहि तरि “गोची” करुन, पण प्रथमच अगदि कयदेशीर पद्धतीने आपण आता  यू-ट्युब वरुन विडिओज डाऊनलोड करु शकतो यू-ट्युबला योग्य ती फी देऊन. जरी चित्रपट निर्मात्यांनी अजुन हे सांगीतलेले नाहिए कि ह चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी किती रूपए आकारण्यात येणार आहे, डाऊनलोड चा आकार किती असेल (कारण स्लो कन्नेक्शन वर डाऊनलोड करणे खुप अवघड जाणार) आणि इतर काय नियंत्रणे असतील हेही गुलदस्त्यातच आहे.
 जर हा “पे-पर-डाऊनलोड” प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात आपणास आणखिन अनेक चित्रपट या पद्धतीने यू-ट्युबवर पहायला मिळतील. या पद्धतीने चित्रपट निर्मांत्यांस जगातल्या प्रत्येक कोपर्यात पोहचता येईल आणि नक्किच त्यांची कमाई सुद्धा वाढेल.

थ्री ईडिअट्स हा सिनेमा सद्ध्या सर्वत्र झळकला आहे आणि लोकांनी त्यास खुप पसंतिही दिली आहे, पण यू-ट्युब वरती हा सिनेमा १२ आठवड्याने उपलब्ध करुन देण्यात येईल त्यामुळे सध्यातरी चित्रपटगृहांना आणि त्यातुन होण्यार्या कमाईवर कोणताहि परिणाम होणार नाहि हे तरी खरे.

३-ईडिअट्स

8 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुणं कसं वाटलं?

एकांकिका- “लक्ष्मी हरवली आहे”