in

भारतातील सर्वोत्तम – आपत्कालीन गर्भनिरोधक किंवा स्त्रियांसाठी जन्म नियंत्रण गोळ्या

emergency-contraceptive-pills
emergency-contraceptive-pills

आपण अनियोजित गर्भधारणेबद्दल काळजीत आहात? होय, कधीकधी सर्व नियमित खबरदारी घेतल्यानंतरही, आपल्या गर्भनिरोधक पद्धती अयशस्वी होतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा मॉर्निंग आफ्टर पिल्स असे ह्यांना म्हणले जाते. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या ह्या असुरक्षित लैंगिक संभोगानंतर, अवांछित किंवा अनियोजित गर्भधारणा रोखण्याचा एक मार्ग आहे. ह्या सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या आणि चर्चिल्या गेलेल्या गर्भनियंत्रक गोळ्या आहेत. गर्भधारणा टाळण्यासाठी, जबरदस्तीने किंवा अनियोजित संभोगामुळे झालेल्या गर्भधारणेसाठी किंवा काही वेळा पुरुष वापरत असलेले गर्भनिरोधक म्हणजे कंडोम फाटल्यास आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या वापरतात.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या अशा लोकांसाठी आशीर्वाद आहेत जे वर उल्लेख केलेल्या आपत्कालीन परिस्थितीची चिंता करतात. खबरदारी घेण्याची दुसरी पद्धत विसरल्यास किंवा ती कार्य करण्यास अयशस्वी झाल्यासच या ईसी गोळ्यांचा वापर करावा.

सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या आपत्कालीन गोळ्यामध्ये लेव्होनॉर्जेस्ट्रल संप्रेरक असते, ज्यामुळे गर्भाशयात अयोग्य वातावरण तयार होण्यास मदत होते जी गर्भधारणा रोखते किंवा अंडाशयातून अंडी सोडण्यास प्रतिबंध करते. सामान्यत: संभोगानंतर आपण गोळ्या किती वेळात घेतल्या यावर 90% प्रभावीपणाची खात्री दिली जाते. आपण जर लवकर गोळी घेतली तर त्याची कार्यक्षमता जास्त असते. आपण हे संभोगाच्या 72 तासांच्या आत वापरू शकता. असुरक्षित संभोगानंतर 24 तासांच्या आत हे जेव्हा वापरले जाते तेव्हा हे सर्वात प्रभावी (सुमारे 95%) असते.

पण चुकू नका

जर गर्भधारणा झाली असेल तर आपत्कालीन गोळी प्रभावी ठरत नाहीत. नावानुसार ही एक “आणीबाणी” गोळी आहे ज्याचा उपयोग केवळ आपत्कालीन परिस्थितीतच जसे कि जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्यास, कंडोम ब्रेक इत्यादी साठीच केला पाहिजे. ही गोळी गर्भपातासाठी वापरली जाऊ शकत नाही.

या गोळ्या वापरण्यापूर्वी आपणास उलट्या, मळमळ, थकवा, डोकेदुखी, स्तनामध्ये दुखणे, निद्रानाश इ. सारख्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल माहित असले पाहिजे. सर्वात वाईट म्हणजे या गोळीतील संप्रेरकांमुळे आपल्या मासिक पाळीत देखील व्यत्यय येऊ शकतो. परिणामी अनियमित रक्तस्त्राव किंवा मासिक पाळीत विलंब हे त्रास होऊ शकतात.

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर गर्भवती होण्याची 20% शक्यता असते, तर नियमित गर्भनिरोधक पद्धतींच्या बाबतीत हा दर केवळ 1% असतो. त्यामुळे सामान्य गर्भनिरोधक पद्धतींचा वापर केला पाहिजे आणि कोणताही पर्याय शिल्लक नसेल तरच आपत्कालीन गोळ्या वापराव्यात.

ह्या गोळ्यांमुळे लैंगिक आजारांपासून संरक्षण मिळत नाही.

भारतात उपलब्ध असणाऱ्या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या

बाजारात अनेक आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. बरेच लोक गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये आणि आपत्कालीन गोळ्यांमध्ये गल्लत करतात. गर्भनिरोधक गोळ्या अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी घेतल्या जातात.

भारतामध्ये उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय आपत्कालीन गोळ्या खाली सूचीबद्ध केल्या आहेत.

आयपिल

भारतात उपलब्ध असणाऱ्या आपत्कालीन गोळ्यांपैकी ही एक गोळी आहे जी गर्भधारणा टाळण्यासाठी असुरक्षित लैंगिक संबंधानंतर 72 तासांच्या आत घेतली पाहिजे. आय-पिल एक हार्मोनल गोळी आहे जी अंडमोचन / गर्भाधान / फलित अंडी रोपण न करता गर्भधारणा होऊ देत नाही. ही तोंडाने घेण्याची गोळी आहे जी काहीतरी खाल्यानंतर पाण्याबरोबर घ्यावी. ही गोळी असा दावा करते की हे स्तनपान देणाऱ्या मातांसाठीही सुरक्षित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही स्थानिक वैद्यकीय दुकानातून आय-पिल खरेदी करता येते. असुरक्षित संभोगानंतर 12 तासांच्या आत सेवन केल्यावर ह्या गोळीने 80-90% प्रभावीपणा दर्शविला आहे. ही गोळी 25 ते 45 वर्षे वयोगटातील महिलांसाठी सुरक्षित आहे.

आपण आय-पिल ऑनलाइन खरेदी  असलेल्या काही वेबसाइट पाहू शकता, परंतु आम्ही कोणतीही वैद्यकीय गोळ्या ऑनलाईन विशेषत: आय-पिल खरेदी करण्याची शिफारस करत नाही कारण वेळ महत्वाचा आहे. दुसर्‍या दिवशी एखाद्या वितरण करणाऱ्या मुलाने ह्या गोळ्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याची वाट पाहू नये. जवळच्या दुकानामध्ये जाणे कधीही चांगले, गोळी विकत घ्यावी आणि लगेच त्याचे सेवन करावे.

किंमत

भारतात आय-पिलची किंमत प्रति गोळी 100 रुपये आहे.

अनवॉन्टेड -72

अनवॉन्टेड-72 हे एक ओटीसी औषध आहे जे कोणत्याही वैद्यकीय दुकानामधून खरेदी केले जाऊ शकते. यात लेव्होनॉर्जेस्ट्रेल 1.5 मिग्रॅ असते आणि असुरक्षित संभोगानंतर 3 दिवसांच्या आत ही गोळी घेणे आवश्यक आहे. अनवॉन्टेड -72 आणि आय-पिलची तुलना केल्यास तुलनेने अनवॉन्टेड-72 चे दुष्परिणाम कमी आहेत. अनवॉन्टेड-72 ही गोळी संप्रेरक एलएच आणि एफएसएचच्या क्रिया अवरोधित करते. मेंदूचे संप्रेरक अंडी परिपक्व होण्यास मदत करतात, गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार करतात, स्त्रीबिजांचे रोपण करतात. थोडक्यात, अनवॉन्टेड-72 गर्भधारणेस अनुकूल अशी परिस्थिती अवरोधित करते. 72 तासांच्या आत वापरल्यास, गर्भधारणा रोखण्यासाठी अनवॉन्टेड-72 गोळीची कार्यक्षमता 85% आहे. लैगिक संभोगानंतर लवकरात लवकर ही गोळी वापरल्यास  परिणामाचा अधिक उच्च दर साध्य होऊ शकतो. अनवॉन्टेड-72 गोळी घेतल्यानंतर 2 ते 3 तासांपर्यंत उलट्या होणे हा एक चुकलेला डोस मानला जातो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

किंमत

भारतात अनवॉन्टेड-72 ची किंमत प्रति गोळी 80 रुपये आहे.

प्रीव्हेंटॉल

यात तोंडाने घेण्याच्या 2 गोळ्या असतात ज्यात लेव्होनॉर्जेस्ट्रेल बी.पी. 0.75 मिग्रॅ असते. प्रीवेन्टॉल ही भारतातील सर्वात उत्तम आपत्कालीन जन्म नियंत्रण गोळ्यांपैकी एक आहे, जी गर्भधारणा रोखण्यासाठी 72 तासात (3 दिवसात) घेतली पाहिजे. प्रीव्हेंटॉल ही लेव्होनॉर्जेस्ट्रेल ची एकच गोळी असल्याने त्याचे दुष्परिणाम कमी आहेत. जरी प्रीव्हेंटॉल अनेक वेळा सुरक्षितपणे घेतली जाऊ शकते, परंतु त्याच मासिक पाळीत अनेक वेळा वापरल्यास गोळ्याची कार्यक्षमता कमी होते.

येथे असुरक्षित लैंगिक संबंधानंतर प्रथम गोळी शक्य तितक्या लवकर घ्यावी आणि दुसरी गोळी प्रथम गोळी घेतल्यानंतर 12 तासांनी घ्यावी. ही आपत्कालीन गोळी वाजवी दारात उपलब्ध आहे आणि या गोळीने 85% -90% प्रभावीता दर्शविली आहे. गोळ्या जितक्या लवकर घेतल्या जातात तेवढेच अवांछित गर्भधारणेपासून संरक्षण चांगले मिळते.

किंमत

भारतात प्रीव्हेंटॉलची किंमत 2 गोळ्यांसाठी 50 रुपये आहे.

ट्रस्टन 2

ट्रस्टन 2 हा दोन गोळ्यांचा पॅक आहे ज्यात लेव्होनोर्जेस्टेल ०.75 मिग्रॅ आहे, फार्मास्युटिकल कंपनी, व्ही केअर फार्मा लिमिटेड यांनी हे निर्मित केलेले आहे. या कंपनीचा असा दावा आहे की या गोळीचे शून्य दुष्परिणाम आहेत आणि वेळेवर सेवन केल्यावर 80% पर्यंत प्रभावी आहे. उपरोक्त सूचीबद्ध केल्याप्रमाणे, ही गोळीसुद्धा प्रथम असुरक्षित संभोगानंतर लवकरात लवकर सेवन केली पाहिजे, शक्यतो 24 तासांच्या आत आणि दुसरी गोळी पहिल्या गोळीनंतर 12 तासांनी घावी.

किंमत

ट्रस्टन 2 गोळ्या अत्यंत किफायतशीर आहेत आणि भारतातील त्याची किंमत 60 रुपये आहे.

टी पिल 72

संभोगानंतर 72 तासांच्या आत वापरल्यास टी पिल 72 प्रभावी आहे. टी पिल 72 ही 1.5 मिग्रॅ गोळी आहे जी प्रोजेस्टेरॉनच्या परिणामास प्रतिबंधित करते, जे गर्भधारणा टिकवण्यासाठी आवश्यक असे एक नैसर्गिक मादी संप्रेरक आहे. या संप्रेरकाशिवाय, मासिक पाळीप्रमाणे गर्भाशयातील अस्तर (एंडोमेट्रियम) तुटते आणि गर्भधारणेची शक्यता टळते. असुरक्षित संभोगानंतर 3 दिवसांच्या आत घेतल्यास ही गोळी 80% प्रभावी असल्याचे ज्ञात आहे.

किंमत

भारतातील टी-पिल -72 ची किंमत सुमारे 68.50 रुपये आहे.

भारतातील वर उल्लेख केलेली आपत्कालीन प्रभावी गोळ्यांची यादी निर्दिष्ट आहे आणि जवळच्या कोणत्याही वैद्यकीय दुकानातून त्या खरेदी केल्या जाऊ शकतात. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर काही आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या म्हणजे नॉर्लेवो, ईसी, शी -२२, ह्यान, ओह! गॉड, ऑप्शन ७२ इ.

हे लक्षात घ्या, बाजारात या आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांची सहज उपलब्धता आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही असुरक्षित संभोगानंतर प्रत्येक वेळी या गर्भनिरोधक गोळ्या वापराव्या. याच्या नावाप्रमाणेच आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीतच याचा वापर करा. नेहमी संरक्षणाची किंवा नियमित गर्भनिरोधक पद्धती वापरण्याची सवय लावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महिला दिन - स्त्री शक्ती

स्त्री शक्ती