शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे स्त्री-पुरुषाकडे आकर्षित होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. परंतु संशोधकांना असं आढळलंय की, आपल्या जोडीदाराची वा प्रियकराची संपत्ती नि आर्थिक वैभव ही बाबदेखील स्त्रियांना कामोदिप्त करणारी आहे.
मानवी कामजीवनासंबंधी नवनवे शोध लागत आहेत. त्यातून संशोधकांनी काढलेले निष्कर्ष चकित करणारे आहेत. शरीरसौंदर्य, मर्दानी जडणघडण, सद्गुणत्व, प्रामाणिकपणा, कर्तृत्वशीलता इत्यादी गुणांमुळे स्त्री-पुरुषाकडे आकर्षित होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. परंतु संशोधकांना असं आढळलंय की, आपल्या जोडीदाराची वा प्रियकराची संपत्ती नि आर्थिक वैभव ही बाबदेखील स्त्रियांना कामोदिप्त करणारी आहे.
‘युनिव्हर्सिटी ऑफ नुकास्टल’मधील दोन संशोधक थॉमस पोलेट आणि डॅनियल नॅटल हे दोन संशोधक या गोष्टीचा गेली काही र्वष मागोवा घेत होते. कामरंगातील उत्कर्ष गाठणे हा स्त्रियांचा विशेष गुण असला तरी त्यामागे काही तरी दडलेलं असायला हवं. या सूत्रानुसार हे दोघे शास्त्रज्ञ अभ्यास करीत होते. त्यांनी पाच हजार चिनी नागरिकांचे शास्त्रोक्त सर्वेक्षण घेतले. त्यात कामजीवन, संपत्ती व दैनिक जीवनाशी निगडित आणखी काही गोष्टींचा समावेश होता. या सर्वेक्षणात एक हजार ५३४ स्त्रियांचा समावेश होता. त्यांच्या जोडीदारांची वरील सगळी माहिती गोळा करण्यात आली होती. या महिलांतील १२१ जणींना कामरंगातला उत्कर्षक्षण नेहमीच अनुभवायला यायचा. ४०८ जणांना बहुधा तो आनंद मिळायचा. दुस-या ७६२ स्त्रियांना हे सुख कधी तरी प्राप्त व्हायचे आणि २४३ जणींना ते क्वचितच मिळायचे किंवा त्या सुखापासून त्या वंचित असायच्या. या पाहणीत संशोधकांना आढळले की, पैसेवाल्या जोडीदाराच्या स्त्रिया कामरंगातील सौख्य मोठ्या प्रमाणात लुटताना आढळल्या. ही केवळ चिनी महिलांची मक्तेदारी नाही, तर याआधी जर्मन आणि अमेरिकन स्त्रियांनीदेखील यास दुजोरा दिला होता. पुरुषाला कुशीत घेऊन, त्याच्या शरीराचा भार पेलताना, संसारातील घरखर्चाचे कसं होणार, याची चिंता स्त्रियांना पसंत नसावी, हेच खरं. ही गोष्ट सहजपणे निभावणाऱ्या जोडीदारांसोबत कामशय्या करताना स्त्रिया निर्धास्त असतात. त्यांचा कामरंग उफाळून येतो.
‘टेक्सास युनिव्हर्सिटी’चे मानसशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड बूस यांनी ‘कामवासनेची उत्क्रांती’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे- ‘मी तुझ्यासोबत खूप सुखी आहे व दुस-या पुरुषाची मी कल्पना करू शकत नाही,’ असं स्त्री जेव्हा पुरुषाला मनोमनी सांगते तेव्हा ती नकळत त्याला वचन देते की, मी तुझ्याशी प्रामाणिक आहे.’
त्यामुळेच एखाद्या तरुणावर अनेक मुली भाळतात. कारण तो प्रत्येक मुलीला हॉटेलात जेवायला नेतो. तिथे तो खुर्चीवर बसल्याबसल्या आवर्जून त्या मुलीला सांगतो, ‘तुला वाटते तेवढा मी उंच नाही. माझं पैशाचं पाकीट माझ्या पँटच्या मागच्या खिशात आहे, एवढंच!’
-जोसेफ तुस्कानो
Thanks
Kharay striya vaibhav baghtat paisa va rahaniman baghtat