in ,

‘मराठी माणूस’ थोडासा नाराज आणि बराचसा शरमिंदा

राजसाहेब, तुमचा हा पवित्रा पाहून माझ्यासारखा ‘मराठी माणूस’ काहीसा नाराज आहे, पण त्याहूनही कितीतरी अधिक शरमिंदा झालेला आहे. आपण आमच्यासारख्या माणसांकडून ‘मराठी माणूस’च काय पण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणवून घेण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे.

अलीकडे लोकांना इतिहासाचा धांडोळा घेण्यापेक्षा वर्तनामानातील ताज्या वास्तवाची चर्चा आवडते. माझ्यासारख्या स्वत:ला थोडाफार बुद्धिजीवी मानणाऱ्या लेखक, कलाकार प्रकृतीच्या माणसाला कधी कधी इतिहासाच्या पानांत हरवून जायला आवडत असले तरी सर्वसामान्य माणसांना मात्र वर्तमानाच्या चौकटीत राहून भविष्याचा विचार करणे जास्त आवडते.

गेल्या काही दिवसांत देशभरातील लोकांनी मराठी माणूस हे नाव वारंवार ऐकले. दूरचित्रवाणीवरील सर्व वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये त्याची व्यंगचित्रे सगळ्यांनी पाहिली. मुंबई शहर कोणाच्या बापाचे? सारखे सवाल ऐकले. जळणाऱ्या बसगाड्या, रस्त्यावर उतरलेले लोक, दगडफेक पाहिली, नारेबाजी ऐकली. या सगळ्या चचेर्त सतत एका युवा नेत्याची छबीसुद्धा पाहिली. त्या छायाचित्रातील व्यक्तीच देशभरात चचेर्ला कारणीभूत ठरली. राज ठाकरे, हे त्या माणसाचे नाव. वयाने छोटेखानी वाटला तरी मुंबईतील नव्याकोऱ्या विरोधी पक्षाचा हा प्रमुख. त्यानेच भारतीय राज्यघटना, महाराष्ट्र सरकार या दोघांनाही आव्हान दिले-आ बैल मुझे मार!

हल्लीच्या राजकारणात हे असेच सुरू आहे. आपणही या सगळ्याला ‘रिआलिटी शो’ किंवा ‘रोड शो’ला मनोरंजनाचे नवे माध्यम मानायला लागलो आहोत. जोवर प्रत्यक्ष आपल्यावर हल्ला होत नाही तोवर या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. काश्मीरपासून केरळपर्यंत, गुजरातपासून ओरिसापर्यंत किंवा कर्नाटकपासून आसाम आणि मणिपूरपर्यंत घडत असलेल्या अशा कितीतरी लांच्छनास्पद घडामोडींना आपण ‘राजकारण’ मानून दुर्लक्ष करतो. एकट्या बिचाऱ्या ‘मराठी माणसाला’च आरोपीच्या पिंजऱ्यात कशाला उभे करावयाचे? शेवटी महाराष्ट्र हा ही देशाचाच घटक नाही का?

पण, थांबा जरा! राजसाहेबांच्या मते महाराष्ट्र हा जरी भारताचा घटक असला तरी येथे नोकरी-कामधंद्यासाठी बिहार आणि उत्तर प्रदेशातून लाखो लोक घुसखोरी करीत आहेत आणि यापुढेही घुसतच राहतील. त्यांना रोखण्याचे काम महाराष्ट्राच्या सरकारने केले नाही तर त्यांचा पक्ष रस्त्यावर उतरून ते करेल. त्यांच्या दृष्टीने हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्ान् आहे.

राजकारणात प्रत्येक घटना तिच्या नियोजित वेेळीच होते किंवा घडवून आणली जाते. आगामी काळ हा देशभरात निवडणुकांचा आणि म्हणूनच नेत्यांसमोरच्या आव्हानांचा आहे. सध्या महाराष्ट्रात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस यांंचे आघाडी सरकार आहे. त्या दोन पक्षांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. विरोधात शिवसेना आणि भाजप हे समोर उभे ठाकले आहेतच. इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघटना आपापल्या मतपेढ्यांची पुंजी घेऊन या मोठ्या पक्षांकडे जातील आणि त्यांना परस्परांवर बंदुका चालवण्यासाठी आपापले खांदे भाड्याने देतील.

अर्थात, यामुळे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या परिस्थितीत कायसा फरक पडणार? महाराष्ट्राची संस्कृती तसेच भविष्यातील विकास यावर काय परिमाण होईल? या सगळ्यामुळे महाराष्ट्राची ताकद वाढून दुनियेत महाराष्ट्राचे मोठे नाव होणार आहे का? संत-महंत, ज्ञानी-पंडित, वीर आणि त्यागी नेत्यांची ही महाराष्ट्राची कर्मभूमी हा नवा भार कसा काय पेलू शकेल? राज ठाकरे हे काही शिवाजी महाराज नाहीत किंवा संत तुकारामही नाहीत. ते जयंत नारळीकरही नाहीत किंवा सचिन तेंडुलकरही नाहीत. ते आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. बाळासाहेबांचा मुलगा नसल्याने शिवसेेनेचे सि

9 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

परीक्षा रेल्वे बोर्डाचीच!

‘सुपरफास्ट’ कॉम्प्युटर