दि. १३ एप्रिल २०१० हा सोनेरी दिवस आम्ही आजन्म विसरू शकत नाही. कारण या दिवशी एका आगळ्या वेगळ्या सेनेचा उदय झाला. ४४ वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे जे सागर मंथन केले. त्या मंथनातील वादळी विचारांचे थेंब हे महाराष्ट्रातच नाही तर उभ्या हिंदुस्तानातील जनमानसात शिंपडले गेले. आणि ह्या शिंपडलेल्या एकेका थेंबातूनच शिवसेनेच्या वादळी विचारांचा एक महासागर तयार झाला. याच विचार धारेच्या प्रवाहाने प्रेरित होऊन असंख्य तरुणाच्या गळ्यातले आजही ताईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या याच विचार धारेचे शिवधनुष्य पेलून त्यांच्या विचारांची महती त्रिखंडात इंटरनेट च्या माध्यमातून गाजवण्यासाठी ज्या सेनेचा १३ एप्रिल २०१० या दिवशी जन्म झाला ती सेना म्हणजे शिव माहिती व तंत्रज्ञान सेना.
दि. १३ एप्रिलला हा सोहळा ठरल्या प्रमाणे सेनाभवनामधील तिसर्या मजल्यावरील एका प्रशस्त हॉल मध्ये पार पडला. या मेळाव्याला पुणे, नागपूर व नाशिकसह विविध भागातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे हॉलच्या प्रवेश द्वारा जवळच संपर्कासाठी माहिती नोंद केली जात होती. बरोबर ५.३० pm च्या ठोक्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यासपीठावरची संचालनाची सर्व सूत्र श्री विशेष राणे यांनी आपल्या हातात घेतली. त्यानंतर लगेचच “शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेबांचे आगमन झाले आहे” असे श्री अमोल नाईक यांनी घोषणा करताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. मा विनायकजी राऊत साहेबांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला. आणि सर्वांच्या शिव गर्जनेने हॉल दणाणून गेला. आता पर्यंत श्री. राहुल खेडेकर, मा विनायकजी राऊत साहेब , मा मानकर साहेब या सर्व मान्यवरा व्यतिरिक्त श्री अमित चिविलकर, श्री अनुज म्हात्रे, श्री अमोल नाईक, नागपूरहून खास आलेले श्री सतीश पानपते तसेच महिला भगिनी मेघा गावडे, अक्षय महाडिक पुण्याचे श्री रोनक शहा हि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. ऑर्कुट समुदायाचे नियंत्रक श्री अमित चिविलकर यांनी सुंदर आशय पूर्ण प्रस्तावना सादर केली त्यात त्यांनी इंटरनेट वरील ऑर्कुट समुदायाच्या जन्मापासून ते आज पर्यंतच्या कार्याचा सर्व लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला. त्यानंतर श्री अमोल, श्री सतीश पानपते, अक्षया महाडिक, मेघा गावडे या सदस्यांनी हि आपली परखड मते सर्वांसमोर मांडली. त्यानंतर आम्हा सर्व ऑर्कुट समुदायातील कार्यकर्त्यांचे लाडके तसेच सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे, प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे मा. श्री जनार्दन मानकर साहेब यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेब यांनी त्यांच्या वक्तशीर अशा भाषणात खूप महत्वाचे मुद्दे या सभेत मांडले “एक अदृश्य शक्ती आज दृश्य स्वरुपात शिवसेना भवनात अवतरली आहे. एकमेकांचे चेहरेहि न पाहता, शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष न भेटता तुम्ही शिवसेनेचं काम एका निष्ठेने करत आहात, या दृष्टीने तुम्हीच खरे शिवसेना प्रमुखांचे खरे दूत आहात.” अशा शब्दात राऊत यांनी समस्त ऑर्कुट समुदायाशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच “रंग विकत घेता येतात पण त्या रंगातील लोकांची निष्ठा विकत नाही घेता येत!!” असा टोलाही त्यांनी हाणला. या अभूत पूर्व अशा सोहळ्याला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अभिजित पानसे तसेच मुंबई महापलिका स्थायी समिती अध्यक्ष मा. राहुल शेवाळे यांची उपस्तिथी लाभली. मा. अभिजित पानसे तसेच मा. राहुले शेवाळे यांनी आपले मार्गदर्शनपर मते सर्वांसमोर मांडली. माणसाला जर ध्यास, आत्मविश्वास असेल तर त्याला वय, स्थल, काल या कुठल्याच गोष्टी बंधन कारक नसतात. याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तसेच परदेशात राहून इंटरनेटच्या माध्यमातून शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करणारे मा. सुनील मंत्रीची उपस्तिथी या कार्यक्रमाला लाभली. तसेच शिवसेने बद्दल त्यांना एवढ्या अपेक्षा तसेच प्रेम का आहे या विषयी त्यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर श्री अमोल नाईक यांनी या मेळाव्याला उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांचे नम्रपणे आभार प्रदर्शन केले तसेच या मेळाव्याला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केलेल्या सर्व सहकारी, स्वयंसेवकांचे आभार मानायला श्री अमोल नाईक विसरले नाही. आभार प्रदर्शन प्रकट केल्यावर राष्ट्रगीताने या अभूत पूर्व अशा सोहळ्याची सांगता झाली.
या दिवशी मा. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच तसेच आदित्य ठाकरे यांची उपस्तिथी लाभणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उपस्थित असलेल्या समस्त शिवसैनिकांची इथे आम्ही नम्रपणे क्षमा मागतो.
थोडिशी हितगुज
४४ वर्षा पूर्वी इंटरनेट या माध्यमाचा कुठेहि मागमूस नव्हता. पण तरीही तेंव्हाच्या मोगल काँग्रेसी दडपशाही विरुद्ध आवाज जर कोणी उठवला असेल तर तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनीच. हजारोंच्या वरती त्यांनी सभा घेतल्या, उभा महाराष्ट्र त्यांनी पिजून काढला. लोकांच्या उरात मराठी बाण्याच्या, स्वाभिमानाच्या मशाली पेटवल्या आणि बघता बघता याच मशालींचा धगधगता भगवा वणवा तयार झाला आणि हाच वणवा आजतागायत जिवंत जळत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो!!! जर इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम उपलब्ध नसूनही जर मा. बाळासाहेब एवढा भव्य वणवा पेटवू शकतात तर आज हे इंटरनेट चे प्रभावी ब्रम्हास्त्र आपल्याकडे आहे, त्याचा सदुपयोग जर आपण केला तर ते आपल्यासाठी वरदान ठरू शकत पण त्याचा गैर उपयोग जर केला गेला तर तेच मध्यम आपला संहार करू शकत हे लक्षात असुद्या.
आई भवानी ची आन घेउनी गोंधळ घालूया
कास धरुनी माय मराठी हिंदू धर्म वाढवूया
आड आला परी कोणीही तरी तिथेच ठेचुया
शपथ आम्हाला शिवरायांची हि साद घालूया !!
आपला विश्वासू शिवसैनिक
प्रसाद कुलकर्णी.
far uttam, apratim vrutant aapn sadar kela aahe…
dhanyavad
jai maharashtra.