मराठी सुविचार
- ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते>
- जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात
- जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही
- मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे
- समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे अहंकार, धनाचे गर्व ते काय कामाचे?
- समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय
- विषयाचे चिंतन हा भोग आहे. इश्वराचे चिंतन हा योग आहे
- आईच्या प्रेमळपणाने पाठीवरुन हात फिरवुन केलेला उपदेश सार्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो
- आपल्यातुन सर्वत्र आनंदाचा वर्षाव करता आला पाहिजे. आपल्या कार्यातुन तो व्यक्त झाला पाहिजे
- अंहकाराचा नाश तेथे सुखाचा वास. तुमच्या चांगल्या – वाईट कॄत्यांची नोंद परमेश्वराजवळ आहे
- परोपकारी सज्जन त्यांचा विनाशकाळ आला तरी त्यांचा सस्वभाव सोडत नाहीत. तुटता तुटता चंदन कुर्हाडीलाही सुंगंधीत करते
- श्रम, विश्रांती व पुजा या मनवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत, असे प्रत्येक धर्म सांगतो
- समाधान म्हणजे मनाची संपत्ती. ज्याला ती गवसली तो सुखी
- ज्यावेळी अहंकार नाहिसा होतो, त्यावेळी आत्मा जागृत होतो
- आत्मविश्वास हि यशाची गुरुकिल्ली आहे
- योग्यता कामावर अवलंबुन नसते, ती काम करणार्यावर व कामावरिल त्याच्या प्रेमावर असते..
- क्रोध म्हणजे गांधीलमाशीच्या मोहळावर फेकलेला दगड
- मान ज्याने पचवला तो सत्पुरूष झाला
- काम थोडे करा किंवा जास्त करा ते कधी फुकट जात नसते, करणार्याची वॄद्धीच होत असते
- अनुभव हा उत्तम शिक्षक आहे मात्र तो मोबदला जबरदस्त घेतो
- माणसाचे मोल डोक्यावरील मुकुटाने आणि गळातल्या जडजवाहिर्यांनी होत नाही, तर त्याच्या अंतःकरणातील माणुसकीत आणि मनगाटातल्या पराक्रमांनी कळते
- आपल्या छोट्या घरात सुद्धा सुखामॄत भरलेले असताना बाहेरिल सुखाच्या मॄगजळामागे जो धावतो तो एक मुर्ख होय
- सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतु:सुत्री आहे
- स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःला कमी लेखणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे होय
- कॄतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलासारखे भासतात, काट्यांची मखमल होते
- जो नेहमी दुसर्यांवर टिका करतो, तो दु:खीच होतो, ज्याचे मन सदा धर्मरत राहतं, त्याला देव देखील नमस्कार करतो
- वाचन हा जसा आचाराचा सारथी, तसा प्रयत्न हा विधीचा म्हणजे दैवाचा सारथी
- माता आणि मातॄभूमी यांचा विसर पडू देऊ नका
- खोटे बोलण्याने माणुस काही मिळवेलच असे नाहि, पण स्वतःवरिल लोकांचा विश्वास तो गमावून बसतो
- गर्विष्ट मनुष्य आपली स्तुती स्वतःच गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते
- माणुस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे
- ईश्वराचे भय हे सर्व रीतीने मूळ आहे
- कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते
- कोणताही भार आनंदाने उचलला म्हणजे तो हलका होतो
- निंदकाची खोड मोडण्यास दुसरे औषध नाही, मात्र उत्तर करू नये व हसण्यावर घालवावे
- यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाशी गाठ पडलीच
nice
खुप सुदंर लेख आहे
लय भारी आहे
Very nice
click here for more info Bitniex.com lowest fees