बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी…….
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
एअरपोर्ट वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण…गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं…
त्या विमानातलं एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं…
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो…..
थांबवून हुंदका कसाबसा मी..
बैलन्स संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस…
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस…
इथे रोज पिझ्झा आणि बर्गर खाताना…
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते…
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
“आई चहा दे गं ” अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच…
घर अगदी भकास भकास वाटू लागतं…
चहा पिण्याची इच्छा जाते मरून…
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा…गोंजारणारा हात शोधत राहतं…
सोडून तुला नाही जाणार..पुन्हा कधीही मी परदेशी…
कवी: अनामिक
18 Comments
Leave a Reply