in

तो बाप असतो

…………… तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
………………..तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो
…………………………….तो बाप असतो

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
…………………………..तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
……………………………..तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
………………………………तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
“सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो
“बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो
………………………………तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
…………….तो बाप असतो

कवी: माहित असेल तर मला कळवा, आशिष कुलकर्णी

Written by Ashish

83 Comments

Leave a Reply
  1. आई वरील कविता बरया्च असतात, पण बापावरची ही कविता छान आहे! बापाची तळमळ कोणाला दिसत नाही!

      • दमलेल्या बापाची कहाणी (maze baba)
        वडील जाणून घ्यायचे आहेत ?
        चार मिनिटे वेळ काढून वाचाच !!
        *****************
        आलिशान दिवाणखान्यात ऐंशी वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले, पलीकडे डायनिंगवर त्यांचा चाळीस वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाष्टा करतोय. तिथेच दहा वर्षाचा नातूदेखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात खिडकीत एक कावळा येऊन बसतो.
        वृद्ध वडील आपल्या चाळीशीच्या मुलाला विचारतात, “तो कोणता पक्षी आहे ?”
        मुलगा चकित होतो, की वडिलांना इतके पण माहीत नाही ? की माझी फिरकी घेताहेत ?? पण जाऊ द्या, असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, “बाबा, तो कावळा आहे”
        ***
        दोन मिनिटे जातात. तो कावळा “काव काव” ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात, “तो कोणता पक्षी आहे ?”
        आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, “अहो ssss तो कावळा आहे”
        ***
        पाच मिनिटे जातात. पुन्हा वडील मुलाला विचारतात, “तो कोणता पक्षी आहे ?”
        आता हातातला पेपर बाजूला करून, मुलगा चिडून म्हणतो, “कितीदा सांगू ? की तो कावळा आहे म्हणून ? ”
        ***
        यावर पुन्हा दोन चार मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील मुलाला विचारतात, “तो कोणता पक्षी आहे ?”
        यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताड्कन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, “चार वेळा तुम्ही विचारलंय आणि मी सांगितलंय की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही ? की जाऊ बाहेर ?”
        ***
        वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते नेहमी लिहीत असलेली रोजची डायरी असते. त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो. आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील “ते” पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात….
        ***
        “सकाळी पेपर वाचत असताना आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला चोवीस वेळा विचारले की ते काय आहे ? कोणता पक्षी आहे ? आणि मीही हातातला पेपर बाजूला करून चोवीस वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा अर्धा तास खूप छान गेला !!”
        *****
        डायरीतील पुढची अक्षरे धूसर होत गेली. कारण चाळिशीतल्या त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते !!

        From =Arvind

  2. sahasa baapavar koni kavita karat nahi……… pan aai evadhich kimmat baapalahi aahe he lok visaratat……..

    YA KAVILA MAZA MANACHA MUJARA

    JAY MAHARASHTRA

  3. खूपच
    छान मित्रा ….

    आई वरील कविता खूप वाचल्या पण बापावर कविता आहे हे आत्ता समजलं.

    शेवटी आपल्याला घडवण्यात दोघांचेही कार्य महत्वाचे असते….

  4. खुप चांगली मराठी कवीता आहे

    !! महाराष्ट्र माझा !!

  5. संदीप खरे च्या काही ओळी आठवल्यात……

    आटपाट नगरात गर्दी होती भारी,

    दमलेला राजा करी लोकल ची वारी,

    सांगायचे आहे तुला सानुल्या फुला,

    दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला….

  6. aai che runn na fitnya sarkhe ahet…mhanun mhantat ki “swami tinhi jagacha AAI vina bhikari” pan aapan ya barobar babanna tr visarat nahi ka!!!!!!!

  7. khupach chaan kavita aahe.lihitana hi khup vivhar kela asel babanvishayi.

    hi kavita lihinara koni dukhhi bapach aahe ka??????

  8. Khup sunder.pan he sukh khupch kami jananchya nashibi aastey?                                                                    …………….aani te bhagywan Aastat.

  9. Punam Mane,

    Chhan Kavita ahe amha sarkhe jyana baba sodun khup dur gele ahet tyani sasari jatana hi kavita dolyasamor thevavi.

    ajun kahi babanchya kavita tayar kara.

  10. हो,

    कुठे तरी एकले होते कि आई पोराला तू काय आहेस ते सांगते आणि बाप तू काय व्यायचे ते सांगतो.

  11. sarvana visrlat tari chalel ani sarvanvrcha vishwas udala tri chalel………………..
    pn………………
    aaple aai-vadil sodun.

    AAI – VADILA NA KADHICH VISRU NKA.
    AAYUSHYAT SARV BHETEL PN TE PARAT NAHI BHETNAR…………..

  12. खरच खूप छान कविता आहे
    ह्र्दयस्पर्शी कविता आहे

  13. MAZE BABA ME 2 VARSHANCHA ASEL TEVHA GELT ME TYAN NEET BAGHITAL PAN NAHI . AAJ MALA EKA BHALYA MANASANE DATTAK GHETAL AAH. TE MALA POTCHYA MULA SARKHE SAMBHALATA. HI KAVITA VACHALI AANI MALA TYA BHALYA MANSACHI AATHAVAN ZALI . AAJ ME C.A AAHE TO TYACHYA MULE

  14. हि कविता ज्याने लिहीली त्याला
    कोटय़वधी नमस्कार
    I love my
    Dad & mom

  15. खुप छान खरच आई वडीलांना विसरू नका.बाप म्हणजे सावली

    • आई ही माऊली तर
      बाप हा सावली ।
      आई ही चंदन तर
      बाप घराचे स्पंदन ।
      आई ही ममता तर
      बाप हा राबता ।
      आई ही घराचा कामधंदा
      बाप उभ्या जगाचा पोशिंदा ।

  16. माझे बाबा मी लहान असताना गेले. मी शेजारी काकांकडे राहतो.माझ्या जीवनात मला बाबाँचे प्रेम खुपच कमी मिलले.समोर एखादी व्व्यक्ति व त्यांचा मुलगा यांच्यातील प्रेम भावना दिसली की मला माझ्या बाबांची खुप आठवन येते.miss you बाबा.

  17. i love this poem when i read it atomatically tears coma out from my eyes i just love my dad a lot thanks for this poem i realy love it…..

  18. Manacha mujra mazya babala
    Maharashtratil saglyach mulana mulina me ashi vianti karte… Nahi kahi zal potbhar j1 karayala naka deja pan bapala vrudhdhashramat naka jau deu kontyach aai vadilala to samor jar samajat kahi asach ghadat asel tyana samjun sanga vinvani Kara plz. …..

    Karn aaplyach aapala Maharashtra aapala desh samor nyaycha ahe. Maz evdhich echhhha naka gau tumhi aai vadilache godve pan trass naka deu khup sahan kelay tyanni aaplyasathi…
    Plz evdh Kara aapan ekatra evun parivar ghadvu Maharashtra ghadvu shakto desh ghadvu shakto

  19. Hi majhya mitrane lihileli kavita aahe…ji SHABDVEL ya instagram page var feature zhali hoti…
    Hrishikesh wadar naav tyache..post kelyabddl abhari

  20. घरी 80 वर्षी य बाप अथूना त पडलेला असला तरी मुलांवर काही संकट आले कि बाप म्हणतो मी तुझ्या सोबत आहे घाबरू नकोस

  21. आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,
    आयुष्यातील श्रद्धास्थान .
    आईवर खूप लिखाण आहे.मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.
    या कम्युनिटीत आपण वडीलांची थोरवी ,जशी आपल्याला जाणवली ती शब्दात मांडण्याचा प्रयत्न करू या.

    वडील

    त्यांच्या खांद्यावर बसून
    जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
    आयुष्यभर घरासाठी
    वडील होऊन राहतात कवच

    सावरण्यासाठीच असतात
    त्यांचे मजबूत हात
    असतात वडील तोवर
    जाणवत नाहीत आघात

    ऊन वारा पाऊस झेलत
    वडील लकाकी हरवून जातात
    उडून जातात पाखरं तेव्हा
    वडील एकाकी होऊन जातात

    दाटून येतो कंठ गळ्यात
    पण अश्रू पापणीतून गळत नाही
    आपण वडील झाल्याशिवाय
    मोठेपण त्यांचं कळत नाही

  22. kharach khup chan kavita ahe vachu dole bharun ale i love aai baba karan yanchya mule aapan janmala yeto yana kadhi dukvu nka

  23. तुम्हाला आणि तुमच्या कवितेला मानाचा मुजरा करतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

निखिल वागळे । IBN-लोकमत वर हमला.. लोकांच्या प्रतिक्रिया या अश्या..

“गुप्तरोग” म्हणजे काय?