कोणे एके काळी म्हणे मुंबईत
मराठी माणूस होता.
मुंबईत त्याचा
बोलबाला होता.
मोडेन पण वाकणार नाही
अशी होती त्याची ख्याती
नसानसांत भिनलेली त्याच्या
रग मराठी मातीची
दादर परळ गिरगाव वस्ती त्याची
भाऊचा धक्का …
करारी होता पण दादा
वायच्याचा पक्का …
हळू हळू वस्ती लागलीया वाढू
मजल्यावरी मजले लागले चढू
चाळीतली माणुसकी हरवुन गेली
मराठी माणसे मुंबईतून हद्दपार झाली.
परप्रांतीयांचा लोंढा वाढतच गेला
मराठी माणूस कल्याण – बदलापुर
असा दिशाहीन झाला.
परवा परवा तर मुंबईच्या हद्दीत
अचानक एका मराठी माणसाचं प्रेत सापडलं
ताठ कण्याचा म्हणून तो मराठी असावा
असे परप्रांतीय पोलिसांच्या चौकशी अंती लक्षात आलं.
मात्र मुंबईच्या ह्द्दीत त्याचा एकही वारस न सापडल्याने
त्या शिलेदारांनी त्याला बेवारस मॄतदेह म्हणून घोषित केलं
– अजय शेलार
11 Comments
Leave a Reply