‘ कामसूत्रा ‘ च्या माध्यमातून सा-या जगाला सेक्सचे धडे देणा-या भारतात आजही हा ‘ विषय ‘ खुल्या मनाने स्वीकारला जाताना दिसत नाही. म्हणूनच याहू आणि मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्यांनी भारतातल्या युझरसाठी गुप्तपणे फिल्टर लावले आहेत.
गेल्या महिन्याभरात याहूने आपल्या सर्च इंजिनमध्ये, याहूच्याच फ्लिकर या फोटोशेअरिंग साइटमध्ये तसेच मायक्रोसॉफ्टने आपल्या बिंग या सर्च इंजिनमध्ये केलेल्या बदलामुळे सेक्सविषयक मजकूर वगळला जाणार आहे. अश्लीलतेला आळा घालणा-या माहिती तंत्रज्ञान कायदा-२००० च्या आधारे हे बदल करण्यात आल्याचे या कंपन्यानी म्हटले आहे.
भारताप्रमाणेच सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया या आशियाई देशांमध्येही ही बंदी लागू होणार आहे. एकीकडे या मोठ्या कंपन्यांनी ही सेक्सबंदी सुरू केली असली तरी त्यातून पळवाटा निघणारच नाहीत, याची खात्री मात्र कोणालाच देता येत नाही.
2 Comments
Leave a Reply